News Flash

आहे मनोहर तरी..

फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर सध्या शॉर्ट व्हिडीओजचा काळ आहे.

विशाखा कुलकर्णी 

इन्स्टा, फेसबुकपासून ते विविध सोशल मीडियावर डीआयवाय म्हणून प्रदर्शित होणाऱ्या किंवा काही गमतीशीर, गंभीर आशयाच्या अशा सगळ्याच व्हिडीओजना ऑडली सॅटिस्फाइंग असं नाव दिलं जातं. ऑडली का? तर अशा व्हिडीओमध्ये फार वेगळं, क्रिएटीव्ह असं काहीही नसतं, तरी हे व्हिडीओ बघून कधी बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. या व्हिडीओची उपयुक्तता काय?, हा प्रश्नही आपल्याला पडत नाही, उलट आपण ते पाहण्यात गुंगून जातो. क्षणिक आनंद देणाऱ्या या व्हिडिओत किती काळ गुंतायचे?, हा खरा प्रश्न आहे.

फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर सध्या शॉर्ट व्हिडीओजचा काळ आहे. रिल्स, स्टोरीजच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ बघायला लोकांना आवडते. हे व्हिडीओज अगदी कसलेही असू शकतात, बरं का.. म्हणजे कुणीतरी रस्त्याने चालता चालता केलेल्या टिकटॉक व्हिडीओपासून, मेहनतीने कष्ट घेऊन तयार केलेल्या एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाच्या व्हिडीओपर्यंत कु ठलाही कन्टेन्ट या व्हिडीओवर पहायला मिळतो. ‘क न्टेन्ट इज किंग’ म्हणून लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी अनोख्या कल्पना लढवत त्यावर हातातल्या मोबाइलच्या मदतीने व्हिडीओ तयार करणे, तो एडिट करणे, त्याला जास्तीत जास्त वूज कसे मिळतील याकडे लक्ष देत आकर्षक क न्टेन्ट तयार करण्याच्या प्रयत्नात असे अनेक कल्पक व्हिडीओ तयारही होतात. लोकांसमोर येतात आणि त्यांना अनेक वूज मिळतातही, परंतु सोशल मीडियावर येणारे हे सगळेच व्हिडीओ काही उपयुक्त असतात असे नाही. यात अनेक व्हिडीओज अगदीच निर्थक असतात, उदाहरणार्थ फळे चिरण्याचा एखादा व्हिडीओ, एरवी अशा व्हिडीओमध्ये बघण्यासारखं, वेगळं असं काहीही नाही, असं वाटू शकतं, पण खरंतर अगदी सारख्या आकाराचे फळांचे तुकडे कसे करायचे हे दाखवणारा व्हिडीओ, त्या व्हिडीओमध्ये फळं कापणाऱ्याच्या हातातील धारदार चाकू आणि चॉपिंग बोर्डचा आवाज या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चित्रित के लेल्या असतात की आपण त्या व्हिडीओकडे सहज आकर्षित होतो. कु ठेतरी एखाद्या गावात रस्त्याच्या कडेला जम्बो सॅण्डविच बनवणाऱ्याचा व्हिडीओ, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याचे व्हिडीओ, मेकअपपासून रिलेशनशिपर्यंत सल्ले देणारे असे व्हिडीओ उगाच  बघावेसे वाटत राहतात आणि  एकदा फेसबुकसारखे समाजमाध्यम आपण हाताळायला लागलो की त्यावर एकापाठोपाठ एक येणारे असे व्हिडीओ बघण्यात आपले तासन्तास कसे निघून जातात हे आपल्याला कळतदेखील नाही.

‘डीआयवाय’ (डु इट युवरसेल्फ) नावाने किं वा रिल्स-इन्स्टा स्टोरी म्हणून समोर येणाऱ्या, उगाचच बघायला आवडणाऱ्या, मनाला कसलंतरी समाधान देणाऱ्या, बघायला गेलं तर अनेकदा निर्थक पण ते बघून रिलॅक्स वाटतील अशा या व्हिडीओजना ‘ऑडली सॅटिस्फाईंग व्हिडीओज’ असं देखील म्हटलं जातं. लाकडाचे अगदी सराईतपणे तुकडे करणे, फोम कापणे, स्लाइम कापणे अशा आशयाचे व्हिडीओज यात आपल्याला अनेकदा दिसतात. पण खरंतर एखादी जागा स्वच्छ झाडून काढणे, एखाद्या गाडीवर साचलेला बर्फ साफ करणे या दैनंदिन म्हणाव्यात अशा अ‍ॅक्टिव्हिटीज चित्रित करणारे व्हिडीओही यात असतात. असे व्हिडीओ बघून आपल्याला एक अनामिक समाधान मिळतं, मात्र तरीही या सगळ्याच व्हिडीओजना ऑडली सॅटिस्फाईंग असं नाव दिलं जातं. ऑडली का? तर अशा व्हिडीओमध्ये फार वेगळं, क्रिएटीव्ह असं काहीही नसतं, तरी हे व्हिडीओ बघून कधी बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. अशा व्हिडीओजचा ट्रेन्ड सगळ्यात पहिल्यांदा २०१० मध्ये आला होता. ‘रेडिट’ या सोशल मीडिया साइटवर ‘ऑडली सॅटिस्फाईंग व्हिडीओज’ या २०१३ मध्ये सुरू झालेल्या चॅनेलला  आज पन्नास लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हे फक्त रेडिटचे, पण फेसबुक, इन्स्टाग्राम, युटय़ूब अशा वेगवेगळ्या साईट्सवरून अनेक युजर्स असे व्हिडीओ डाउनलोड करत असतात. यातील वेगवेगळे रंग, ग्लिटर असलेले ‘स्लाइम’ व्हिडीओज लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

या व्हिडीओजमध्ये असं काय असतं?,  असे व्हिडिओ बघणाऱ्याला त्यात इतके कसे गुंतवतात?,  याबद्दल माईंडफुलनेस टीचर (सुगत  आचार्य) डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, ज्याप्रमाणे सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं, त्याचप्रमाणे हे व्हिडीओ अशा पद्धतीने तयार केलेले असतात की ते कोणाच्याही मनातील कुतूहल शमवतील. माणसाच्या मनात अगदी लहानपणापासून नवनवीन गोष्टींचं कुतूहल असतं. एखादी गोष्ट वेगळेपणाने कशी करता येईल?, याचा विचार करणं दैनंदिन धबडग्यात आपल्याला सहजशक्य होत नाही. मात्र या व्हिडीओजच्या माध्यमातून आपल्याला याचं प्रात्यक्षिक समोर दिसतं आणि आपल्या मनात हे शक्य आहेची नोंद होते. आपलं कु तूहल शमतं. एखादी गोष्ट पाहताना आता पुढे काय होईल?, कशा पद्धतीने के ले जाईल?,  ही उत्सुकता या व्हिडीओजमध्ये माणसाला गुंतवून ठेवते. हे व्हिडीओज ताणतणाव खरोखर दूर करतात का?, हे सांगताना मात्र डॉ. बर्वे म्हणतात, हे व्हिडीओज खरेतर मनासाठी डिस्ट्रक्शन असतात, ते फक्त मन एखाद्या ठिकाणी गुंतवून ठेवण्याचं काम करतात, त्यामुळे हे ताणतणाव दूर करणार नाहीत, पण मनाला क्षणिक आनंद नक्की देऊ शकतील. या व्हिडीओजची सवय लागणे मात्र चांगले नाही, हे त्यांनी आवर्जून स्पष्ट के ले.

तर, असे व्हिडीओज तुम्हीही नक्की पाहिले असणार, नाही का? नसतील पाहिले तर नक्की पहा, आपले कुतूहल  फक्त लहान मुलांनीच शमवावे, असे थोडीच आहे! मोठय़ांनाही खिळवून ठेवणारे असे व्हिडीओज तुम्हाला नक्की आवडतील! मात्र कु ठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो आणि या व्हिडीओजची सवयही अशी सहज लागते. त्यामुळे क्षणिक आनंदासाठी हा शब्द कायम लक्षात ठेवत या व्हिडीओजचा निखळ आनंद लुटायला हरकत नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:22 am

Web Title: article about video gives momentary pleasure zws 70
Next Stories
1 नवं दशक नव्या दिशा : जल-वायूवरची सफर
2 वस्त्रान्वेषी : नाद शिरोभूषणांचा..
3 ‘फिजिटल’ फॅशन वीक
Just Now!
X