|| जीजिविषा

आपला पैसेवाला मित्र रोज पार्टी करतो म्हणून आपणही पैसा उडवावा किंवा तो आपले रोज बिल भरतो म्हणून त्याला भरू द्यावे; हे दोन्हीही चुकीचे. आपली रिअ‍ॅलिटी आपल्याला स्वीकारता यायला हवी. तुम्ही कितीही डोळे झाकले तरी तुम्हाला या गोष्टींना सामोरे जावेच लागते.

pune sassoon hospital marathi news
पुणे: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ससूनमध्ये अधीक्षकांचे ‘खुर्चीनाट्य’
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

जीजिविषा प्रिय वाचक मित्र,

या आठवडय़ात यंदाचे बजेट प्रस्तुत केले गेले. तुमच्यापैकी किती जणांनी बघितले, न बघितले माहिती नाही; पण वेळ मिळेल तसे जरूर त्याबद्दल जाणून घ्या. ‘पैसा’ हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याबद्दल माहिती असणे हे कोणत्याही वयात चांगलेच. तुमच्यापैकी अनेक जण सध्या ‘पॉकेटमनी’ घेत असावेत, काही जणांनी आपले गाव सोडून शिक्षणासाठी हॉस्टेल लाइफ स्वीकारली असेल, तर काही जणांनी आता करिअरचे रस्ते पकडले असतील. कोणत्याही टप्प्यावर पैसा हा तरीही महत्त्वाचाच.

शाळेत असताना परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पालक आम्हाला ‘पार्टी’ला पैसे देत असत. तेव्हा ५० रुपयांत जवळच्या केक शॉपमध्ये किंवा मग दाबेलीवाल्याकडे जाऊन आम्ही ‘जंगी’ पार्टी करायचो. त्याव्यतिरिक्त आमच्याकडे ‘इमर्जन्सी’साठी १० ते २० रुपये असायचे. तर एकदा असंच शाळेत दहावीचे एक्स्ट्रा क्लासेस असताना मध्ये गॅप होती. आम्हाला सगळ्या जणींना खूप भूक लागली होती. सगळ्यांचे एक्स्ट्राचे डबेसुद्धा संपलेले. मग न राहून आम्ही नवीन उघडलेल्या एका छोटय़ा साऊथ इंडियन हॉटलमध्ये गेलो. खाल्लय़ावर जेव्हा बिल मागवले तेव्हा प्रत्येकाकडेच १० रुपये, १२ रुपये, कुणाकडे तर ७ रुपये असे निघाले. मग काय, कोणी बॅगमध्ये हात घालून घालून एकेक रुपया शोधून काढू लागले, तर कोणी कम्पास पेटीत काही मिळतंय का शोधू लागले. तरीही कसेबसे पैसे जमवूनही ८ रुपये कमी पडत होते. हिंमत करून शेवटी हॉटेलवाल्या काकांना जेव्हा सांगू असे ठरवले तेव्हा अचानक आमच्यासमोर एक मिनी इडलीची प्लेट आली. आधीच पैसे कमी, त्यात हे कोणी आता मागवले असा विचार करत आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. काकांना आमच्या चेहऱ्यावरचे भाव कळले आणि हसून त्यांनी सांगितले की, आत्ता शेजारच्या टेबलवर जे आजोबा होते, त्यांनी तुमचे बिलही भरले आणि हे वरून तुम्हाला त्यांच्याकडून खाऊ आहे. त्या आजोबांना ‘दुवा’ देत आम्ही पाच मिनिटांत ती प्लेट फस्त केली. नंतर असे लक्षात आले की, पैसे कमी पडले, कारण प्रत्येकीनेच कधी वडापाव खा, कधी आइस्क्रीम घे असे करत ते खर्च केलेले होते.

तुम्ही म्हणाल, की जीजि, पण मुद्दा काय आहे? तर एवढी लांबण लावण्याचे कारण हे की, तेव्हा समजा, प्रत्येकीने मिळालेल्या दर २० रुपयांतले ४ रुपये प्रत्येक आठवडय़ाला वाचवले असते तर आम्ही सहज बिलही भरू शकलो असतो. वर आम्हीच अजून एक मिनी इडली प्लेट खाऊ  शकलो असतो. आता समजा, हीच वेळ तुमच्यावर आली, म्हणजे ऐन वेळेस गाडीत पेट्रोल टाकायला पैसेच उरले नाहीत किंवा नेमक्या ४ कॉफी जास्त झाल्याने इमर्जन्सीमध्ये आता मोबाइल रिचार्जलाच पैसे उरले नाहीत किंवा तुमच्यापैकी काही जणांना जाणवेल म्हणजे आलेला पगार उडवला आणि आता भाडे भरायला पैसेच उरले नाहीत. मग काय करता? मग मित्रांकडे मागा, उधाऱ्या ठेवा, आईवडिलांना काही तरी खोटे कारण सांगून पैसे घ्या, अशा गोष्टी आपण करू लागतो.

पैसा ज्याच्या हातात असतो, त्याला पैसे हाताळण्याची अक्कलही हवी. म्हणजे पूर्वीच्या जनरेशनसारखे अगदी दात कोरून पोट भरा, असे मी अजिबातच सांगत नाही. मी स्वत: मजेसाठी अनेक वेळा पैसा खर्च करते, पण लहानपणापासून मी एक नियम नक्की पाळते. हातात १० रुपये पडले तर ४ रुपये जणू काही मिळालेच नाहीत, असे समजून बाजूला काढायचे. उरलेल्या ६ रुपयांत पहिले प्राधान्य म्हणजे ४ रुपये आपल्या खर्चाचे आणि मग २ रुपये मौजेला. म्हणजे ४०% सेव्हिंग्ज, ४०% खर्च आणि २०% मौज. हा माझा हिशोब माझ्या पगाराप्रमाणे. बऱ्याचदा वाढत्या वयात, जेव्हा पहिल्यांदाच आपल्या हातात पैसा येतो तेव्हा आनंदाच्या भरात आपण हे विसरून जातो; पण तुम्ही आज जर का या सवयी स्वत:ला लावल्या तर आयुष्यात त्या नक्कीच उपयोगी पडतील. तुमच्यापैकी बरेच जण माझ्यासारखे आपले शहर/गाव सोडून दुसऱ्या शहरात, मोठय़ा शहरात किंवा बाहेरच्या देशात राहायला जातील तेव्हा याच सवयी तुम्हाला कामी येतील.

आज तुम्ही यंग आहात, अनेकांच्या खांद्यावर कोणतीही जबाबदारी नसेल. मित्रांकडे उधारी ठेवतानादेखील काही वाटत नसेल; पण आज न उद्या हे चित्र बदलेल. आज १००-२०० रुपयांच्या उधाऱ्या चालून जात असतील, पण जेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात जबाबदाऱ्या येतील तेव्हा आज जसे ते मदत करतायेत तसे तेव्हाही करूच शकतील असे नाही. आपला पैसेवाला मित्र रोज पार्टी करतो म्हणून आपणही पैसा उडवावा किंवा तो आपले रोज बिल भरतो म्हणून त्याला भरू द्यावे; हे दोन्हीही चुकीचे. आपली रिअ‍ॅलिटी आपल्याला स्वीकारता यायला हवी. तुम्ही कितीही डोळे झाकले तरी तुम्हाला या गोष्टींना सामोरे जावेच लागते.

मित्रांनो, असे अजिबात समजू नका की, मौज महत्त्वाची नाही. मी तर म्हणेन, मौज हीसुद्धा एक गरजच आहे आणि म्हणूनच त्यासाठीसुद्धा पैसा बाजूला काढायला हवा. काटकसर करायलाच लागते, पण म्हणून ‘एन्जॉय’ करणे थांबवू नका. कारण शेवटी आयुष्यभर जबाबदाऱ्या काही संपणार नाहीत. म्हणून आपण मजाच करू नये असे नाही; पण आयुष्यात कोणता प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही आणि त्यातून बाहेर काढायला दर वेळेस शेजारच्या टेबलवरचे आजोबा असतीलच असे नाही.

जाता जाता आजची टीप (आजची टीप ही फूड टीप आहे बरं) – पार्ले जी गार पाण्यात बुडवून ट्राय करा किंवा ज्यांनी वडा सँपल खाल्ले असेल त्यांना मी आवर्जून इडलीवर मिसळ आणि फरसाण घालून खायला नक्कीच सुचवेन. नक्की ट्राय करा आणि मला कळवा.

कळावे, जीजि