वेदवती चिपळूणकर

सिनेमॅटोग्राफर म्हणून ती इंडस्ट्रीत २०१४ पासून काम करते आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच मुली असलेल्या या क्षेत्रात सुरुवातीला असिस्टंट म्हणून काम करणारी अपूर्वा आता स्वतंत्रपणे काम करू लागली आहे. केवळ मराठीच नाही तर तेलुगू चित्रपट आणि चायनीज अ‍ॅक्शन फिल्मचंसुद्धा शूटिंग तिने केलं आहे.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

कोणतीही तांत्रिक बाब म्हटली की, ‘मुलींना काय जमणार’ हा त्यातला मोठा प्रश्न असतो. अनेकदा हा प्रश्न मुलींनाच आधी पडतो आणि त्या कोणत्याच तांत्रिक गोष्टीच्या वाटेला जात नाहीत. त्याहूनही ज्या आवड म्हणून आणि हिंमत करून अशा क्षेत्रात उतरायचं ठरवतात, त्यांना सर्व शक्तिनिशी विरोध केला जातो. त्यातही जिद्दीने खंबीर राहून स्वत:चं करिअर घडवणाऱ्या फार थोडय़ा स्त्रियांमध्ये अपूर्वा शाळीग्राम हिचा समावेश होतो. सिनेमॅटोग्राफर म्हणून ती इंडस्ट्रीत २०१४ पासून काम करते आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच मुली असलेल्या या क्षेत्रात सुरुवातीला असिस्टंट म्हणून काम करणारी ती आता स्वतंत्रपणे काम करू लागली आहे. केवळ मराठीच नाही तर तेलुगू चित्रपट आणि चायनीज अ‍ॅक्शन फिल्मचंसुद्धा शूटिंग तिने केलं आहे.

महिलांनी घराबाहेर पडून काम करण्याची सुरुवातच मुळात पुरुषांच्या नंतर केलेली असल्याने साहजिकच प्रत्येक क्षेत्र पुरुषप्रधान आहे. त्यातूनही तांत्रिक बाजू सांभाळायची म्हणजे अनेक समजुतींना गैर ठरवत पुढे जाण्याची कसरतच! तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याआधीही अपूर्वा डॉक्युमेंट्री बनवत होती. जशी तिची आवड तिला समजली तशी तिने शिक्षणासाठी ‘व्हिसलिंग वूड्स’मध्ये अ‍ॅडमिशन घेतली. तिथल्या शिक्षणापासून ते संपूर्ण कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये एकटय़ा स्त्रीने काम करण्यापर्यंत अनेक अनुभव अपूर्वाच्या गाठीशी आहेत. ‘चौदा-पंधरा मुलांच्या बॅचमध्ये मी एकटी मुलगी होते. सुरुवातीला तो अभ्यासक्रमही मला जड जात होता. जेव्हा लक्षात आलं की, यात केवळ आर्ट नाही तर गणित आणि फिजिक्ससुद्धा आहे, तेव्हा मात्र मला टेन्शन आलं. सगळ्या वातावरणात अ‍ॅडजस्ट होऊन अभ्यास करायला मला सहा महिने लागले. सुरुवातीचे सहा महिने मी कसेबसे ढकलले. चौदा तास क्लासेस, त्यानंतर प्रत्यक्ष काम आणि त्यात मुलगी म्हणून इतरांची असलेली वेगळी दृष्टी.. या तिन्ही गोष्टींनी सुरुवातीला मला खूप त्रास दिला. सामान्यत: त्रास होतोय असं लक्षात आल्यावर मुली सोडून देऊन निघून जातात. मात्र मी ठाम होते की, मला हे करायचंच आहे. माझा कोणताही बॅकअप प्लान वगैरे नव्हता आणि मला दुसरं काही आवडतही नव्हतं. त्यामुळे मी ते हट्टाने पूर्ण केलं आणि माझी पहिली इंटर्नशिप कोक स्टुडिओसोबत केली,’ असं ती सांगते.

केवळ शिक्षणातच नव्हे तर प्रत्यक्ष कामातही अपूर्वाला या ‘मेल डॉमिनन्स’चे असंख्य अनुभव आले. एक स्त्री तांत्रिक बाजू सांभाळतेय, तिला त्यातलं कळतंय आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती आपल्याला सांगते तसं आपल्याला काम करावं लागणार आहे, या गोष्टी पचवणं या क्षेत्रात अनेक पुरुषांना जड जातं. त्यामुळे आपोआपच त्यांच्याकडून बारीकसारीक गोष्टींना विरोध केला जातो. या सगळ्यातून तावून-सुलाखून निघालेली अपूर्वा सांगते, ‘एका कॅमेरा टीममध्ये साधारणत: वीस ते पंचवीस लोक असतात. मुख्य डीओपी, त्याच्या खालोखाल फर्स्ट एसी म्हणजे असिस्टंट कॅमेरा असतो. त्याच्या हाताखाली फोकस पुलर – म्हणजे जे फोकस अ‍ॅडजस्ट करण्याची कामं करतात आणि गॅफर – जे प्रत्यक्ष लाइट्सची सगळी अरेंजमेंट करतात. त्या गॅफरच्या हाताखाली दहा-पंधरा लाइट्समेन असतात. त्यामुळे सगळी मिळून टीम मोठी होते. या सगळ्यात अभावानेच एखादी स्त्री असते. त्यामुळे तिच्या हाताखालच्या माणसांना मग त्याचा जाच वाटायला लागतो,’  असं अपूर्वा सांगते. स्त्रियांना या क्षेत्रात मुळातच संधी पटकन मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी त्या खूप कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला स्वत:ला सिद्ध करायचं असतं. आसपासच्या लोकांचा असहकार, काम परफे क्ट करण्याचं प्रेशर आणि टिकून राहण्याची धडपड या सगळ्यासाठी स्वत:मध्ये खूप शक्ती आणावी लागते. ज्यांना ती शक्ती आणता येते त्या टिकतात, ज्यांना जमत नाही त्या मधूनच स्विच करतात, असे अनुभवाचे बोल ती ऐकवते.

ज्या क्षेत्रात स्त्री म्हणून प्रचंड स्ट्रगल आहे त्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी एक वैचारिक पाया आणि तत्त्वांचं फ्रेमवर्क असावं लागतं. अपूर्वाने आसपासच्या परिस्थितीचं संवेदनशीलतेने निरीक्षण करून स्वत:साठीचे वर्क  एथिक्स बनवले आहेत. ती म्हणते, ‘जेव्हा मी स्ट्रगल करत होते तेव्हा माझा साधारण प्रयत्न असायचा की, मी रिकामी बसले नाही पाहिजे. त्यासाठी मी कोणाकडे जाऊन विदाऊट पेमेंट काम करायचे, असिस्ट करू का म्हणून स्वत:च विचारायचे, पण काम थांबू नाही द्यायचे. अर्थात त्यासाठीही कोणाचं काय ऐकून घ्यायचं याला एक सीमारेषा असलीच पाहिजे. स्त्रियांना या क्षेत्रात राहणं याचमुळे कठीण जातं की, त्या स्वत:साठी स्टॅण्ड घेऊ  शकत नाहीत. माझी कामं कोणती आहेत आणि मी किती मर्यादेपर्यंत समोरच्याची अरेरावी सहन करायची हे प्रत्येक व्यक्तीला स्वत:च ठरवावं लागतं. तिथे अनेक स्त्रिया कमी पडतात, मग त्यांना मानसिक त्रास होतो आणि मग त्या यातून बाहेरच पडतात, असं सांगतानाच आदर हा दोन्ही बाजूंनी एकमेकांना दिला पाहिजे. तुम्हाला कोणी तरी हलक्यात काढतंय आणि तरीही तुम्ही सहन करताय, तर तुमची प्रगती कधीच होऊ  शकणार नाही, असंही ती ठामपणे सांगते. एवढेच नाही तर स्त्रियांनी किती खंबीरपणे वावरायला हवं हेही ती स्पष्ट शब्दांत सांगते, ‘मेल इगो जपत राहायचा प्रयत्न के ला तर तुमचं स्वत:चं काही शिल्लकच राहणार नाही. हे सगळं सांभाळून त्याच इंडस्ट्रीत राहायचं असेल तर कोणत्या घटनेवर कसं रिअ‍ॅक्ट करायचं हे पक्कं केलं पाहिजे. कारण इथे बीइंग परफेक्शनिस्ट अ‍ॅण्ड बीइंग वुमन, बोथ अ‍ॅट अ टाइम, इज हार्ड!’

अपूर्वाने नुकतीच एक चायनीज अ‍ॅक्शन फिल्म शूट केली. त्यासाठी सलग पस्तीस दिवस एकही सुट्टी न घेता तिने काम केलं आणि त्यातले जवळजवळ बारा ते पंधरा दिवस हे अ‍ॅक्शन शूटचे होते. अ‍ॅक्शन शूट करताना खांद्यावर प्रत्यक्ष दहा किलोचा कॅमेरा घेऊन सगळं शूटिंग करावं लागतं. त्या प्रोजेक्टमध्ये मात्र तिच्या क्षमतेवर शंका घेणारं कोणीही तिला भेटलं नाही. प्रचंड मेहनतीने जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते तेव्हा तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं ही त्या व्यक्तीसाठी प्रचंड मानसिक ताण देणारी परिस्थिती असते. मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याची गरज ओळखून अपूर्वा म्हणते, ‘इथे कोणीही व्यक्ती कोणाच्या पेरोलवर नसते. त्यामुळे रोज तुमच्याकडे काम असेलच असं होत नाही. काही वेळा तुमच्या क्षमतेबद्दल इतरांना प्रश्न पडल्याने काही कामं नाकारली जातात किंवा काही कामं मधूनच सोडून द्यावी लागतात. या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये मानसिक संतुलन राखणं खूप गरजेचं असतं. माझ्याकडे जेव्हा काम नसतं तेव्हा मी माझी शारीरिक ताकद वाढवण्याकडे लक्ष देते, कारण खांद्यावर कॅमेरा घेऊन दिवसाचे पंधरा-अठरा तास शूटिंग करताना, बाहेरगावी जाऊन शूटिंग करताना शरीर थकतं. त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष देते. स्वत:ला स्टेबल ठेवण्याची गरज या काम नसलेल्या काळातच अधिक असते. त्यामुळे त्याकडे खूप जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे.’

मानसशास्त्रामध्ये ‘ग्लास सीलिंग इफेक्ट’ नावाची एक संकल्पना आहे. काम करणाऱ्या, प्रगती करू इच्छिणाऱ्या सर्वच स्त्रियांना सामान्यत: याला तोंड द्यावं लागतं. तुमच्यात क्षमता आहे, तुम्हाला तुमचं ध्येय दिसतं आहे, पण केवळ स्त्री आहात म्हणून तुम्हाला तिथे पोहोचू दिलं जात नाही, याला ‘ग्लास सीलिंग इफेक्ट’ म्हणतात. अशा प्रतिकूल वातावरणातही ठामपणे स्थिरावणाऱ्या अपूर्वासारख्या अनेक स्त्रियांची जिद्द प्रेरणादायी आहे.

माझ्या दृष्टीने जे आपल्याला येत नाही असं वाटतं ते शिकत राहणं हेच महत्त्वाचं सूत्र आहे. अर्ध्या ज्ञानातून भविष्यात काहीच उत्तुंग घडू शकत नाही. आपल्या कामातले बारकावे आपल्याला माहिती असायलाच हवेत. सिनेमॅटोग्राफरला सेटची रचना, त्याचे रंग, लाइट्स, कलाकारांचे कपडे, त्यांचे रंग, सगळ्या अँगलचे कॅमेरे अशा अनेक गोष्टी बघायच्या असतात. एका सेकंदात बारा ते चोवीस फ्रेम्सचा विचार करायचा असतो. जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण ज्ञान नाही तोपर्यंत आपण हे करू शकत नाही. ज्ञान घेण्यात आणि काम करण्यात कोणत्याच गोष्टीचा अडथळा आपण मानता कामा नये असं माझं मत आहे. ज्या क्षणी आपण या सगळ्यापेक्षा पर्सनल गोष्टींना प्राधान्य देतो, त्या क्षणी आपल्या करिअरच्या प्रगतीचे चान्सेस एकदम कमी होऊन जातात.

– अपूर्वा शाळीग्राम

viva@expressindia.com