20 January 2021

News Flash

फॅशनेबल हुडहुडी

यंदाच्या विंटर कलेक्शनमध्ये जोर आहे तो कॅज्युअल, इंडोवेस्टर्न आणि एथनिक फॅशनची

छाया सौजन्य : अ‍ॅमेझॉन फॅशन

गायत्री हसबनीस

या वर्षभरात फॅशन करायला फारसा वाव मिळाला नाही याचं कारण होतं लॉकडाऊन; परंतु लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी फॅशनची कास सोडली असं काही झालं नाही. उलट, जसं अनलॉक झालं तशी फॅशनही पूर्ववत झालेली पाहायला मिळाली. यावरून थोडक्यात लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे आपण सगळेच थोडय़ाफार प्रमाणात फॅशनप्रेमी आहोत. दैनंदिन व्यवहार कसेही असले तरी फॅशन ही आपल्यासाठी दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते, हे आता बऱ्यापैकी अधोरेखित झालं आहे. लॉकडाऊननंतर बऱ्याच महिन्यांनी आपल्या सर्वाचंच रूटिन सुरू झालं आहे आणि फॅशन प्रयोग करण्यासाठी हुडहुडी भरवणारी थंडी आणि नाताळचा सण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. विंटर कलेक्शनमध्ये भर आहे ती आपल्या सध्याच्या परिस्थितीला धरून सजलेल्या फॅशनची. यंदाच्या विंटर कलेक्शनमध्ये जोर आहे तो कॅज्युअल, इंडोवेस्टर्न आणि एथनिक फॅशनची. या सर्व फॅशनमध्ये आपल्या रूटिन लाइफला शोभेल अशी फॅशन बाजारात आली आहे. या विंटर फॅशनची ही खास झलक..

रंगसंगती

शहरात राहणाऱ्या मुली सध्या बऱ्यापैकी फिकट रंगांना प्राधान्य देत आहेत. सर्वसामान्यपणे आणि विशेष करून ऑफिसला जाणारा प्रत्येक वयोगटातील स्त्रीवर्ग हा पांढऱ्या रंगसंगतीतील कपडय़ांना पसंती देतो आहे. यामध्ये ट्राऊझर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, केप्री, कुर्ता-पायजमा आणि फॉर्मलवेअर आहेत. कोविड-१९ साथीमुळे अजूनही वॉशेबल कपडे परिधान केले जात आहेत, तशाच पद्धतीचे फॅब्रिक निवडले जात आहेत आणि मग तसेच रंग. उदाहरणार्थ, ऑफिस वेअरसाठी मरून कॉटन शर्ट्स, प्लेन कुर्ती, क्रीम रंगांचे ट्रॅडिशनल अटायर्स, स्ट्राइपचे कॅ ज्युअल टॉप्स जे वॉशेबल असतात ते सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. रंगांच्या पॅटर्नमध्येही गडद रंग आहेत, पण त्यात फारच मोजक्या रंगांना पसंती दिली जाते. उदाहरणार्थ, हिरवा, मरून आणि ब्राऊन. या रंगांमध्ये कॅज्युअल वेअर्सही खूप प्रकारचे उपलब्ध आहेत. या विंटर कलेक्शनमध्ये डिझायनर आणि ओव्हर डेकोरेटेड कपडे टाळण्याचा प्रयत्न के ला असून सेमी-डिझायनर आणि हॅण्डक्राफ्टेड कपडे घालण्याक डे जास्त कल आहे.

कॉटनला मागणी

वर म्हटल्याप्रमाणे कॉटन फॅब्रिकचा ट्रेण्ड अव्वल ठरला आहे. सध्या मुंबईचा पारा कमी होत असला तरी प्रदूषण आहे आणि म्हणूनच दिवसाची फॅशन आणि सूर्य मावळतानाची फॅशन गरजेनुसार वेगळी के ली जाते आहे. संध्याकाळ ते रात्रीच्या वेळी थोडे स्टायलिश असे कपडे म्हणजेच फेदर  किंवा वूलनचे कपडे घालण्याकडे जास्त कल आहे; पण दिवसा मात्र कॅज्युअल, फॉर्मल आणि कॉटन फॅब्रिकचे कपडे घालण्यास जास्त पसंती मिळते आहे. कॉटनच्या कपडय़ांशिवाय लखनवी आणि चिकनकारी कपडेदेखील सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. सध्या विंटर कलेक्शनमध्ये भर पडली आहे ती एथनिक आणि इंडोवेस्टर्न लुकची. या लुकमध्येसुद्धा एथनिक कॉटन सूटची मागणी आहे. यात प्रामुख्याने फ्लोरल आणि  सिंपल पेस्टल शेड्स असलेले ड्रेस पीस मिळतील. खरं तर फ्लोरल ट्रेण्ड हा काही विंटरमध्ये फारसा दिसत नाही, पण यंदा तो विंटर कलेक्शनमध्ये आला आहे आणि तोही एथनिकमध्ये ही बाब फार विशेष आहे, कारण सध्या सीझनली विचार केला तर फ्लोरल एथनिक वेअर हे कोणत्याही ओकेजनला सुटेबल आहेत. इंडोवेस्टर्न लुकमध्ये ए-लाइन ड्रेसेस आहेत ज्यात ग्रे आणि काळा रंग जास्त पाहायला मिळेल. त्याचसोबत बरेच इंडो लुक असलेले लॉन्ग गाऊन्स आणि लॉन्ग कॉटनचे इंडो लुक जॅकेट्स आहेत.

जम्पसूट, कूलोट्स आणि स्निकर्सचा ट्रेण्ड

जम्पसूटचा ट्रेण्ड सध्या जोरदार आहे. ऑफलाइन खरेदीला तुम्ही गेलात तरीसुद्धा तेथे जम्पसूट जास्त प्रमाणात दिसून येतील. यामध्ये सध्या तरी मल्टिकलर स्ट्राइप्सची फॅशन आहे. नाही म्हटलं तरी अजूनही जम्पसूटची खरेदी जोरदार सुरू आहे. यात अजून एक गोष्ट म्हणजे मुलींना जम्पसूटला पर्याय म्हणून कूलोट्स जास्त पसंत आहेत. याला कारण या कूलोट्सवरती कुठल्याही रंगाचा आणि स्टाइलचा टॉप तुम्ही परिधान करू शकता. उदाहरणार्थ, रफल टॉप, टी-शर्ट, फू ल हॅन्ड टी आणि झिपरसुद्धा. कूलोट्समध्ये सर्व तऱ्हेचे रंग ट्रेण्डमध्ये आहेत, फक्त  फंकी रंग, लाल आणि नियॉन रंग सोडून. एक सर्वात क्लासी लुक मिळेल तो स्निकर्सचा, कारण हल्लीच्या युनिसेक्स फॅशनचं वेड विंटर कलेक्शनमध्येही पाहायला मिळतयं. यंदा यात स्निकर्स फॅशन आहे. मुळात स्निकर्सची फॅशन ही मुलं आणि मुली आपापल्या परीने ठरवतात. सध्या जीन्स किंवा डेनिमपेक्षा रूटिन लाइफमध्ये कॅज्युअल वेअरची भर पडली आहे, त्यामुळे टीज् आणि थ्रीफोर्थ-केप्री फॅशन विंटर कलेक्शनमध्येदेखील आली असल्याने यावर स्निकर्स घालून मिरवण्याचा स्वॅग आहे. याव्यतिरिक्तदेखील हिल्स आणि बूट्स ट्रेण्डमध्ये आहेत.

मेन्सवेअर

मुलांसाठी सध्या हूडी आणि झिपर ट्रेण्डमध्ये आहेत. स्वेटरच्या ट्रेण्डमध्ये चेक्सचे स्वेटर मुलांसाठी उपलब्ध आहेत. बॉम्बर जॅकेट्स हे नेहमीप्रमाणे मुलांसाठी ट्रेण्डमध्ये आहेत, कारण सध्या टी-शर्टवर घालायला असे जॅकेट्स मुलांना फार जास्त कम्फर्टेबल जातात, त्यामुळे सध्या थोडे मरून, मेंदी कलर आणि काळ्या रंगाचे बॉम्बर जॅकेट्स ट्रेण्डमध्ये आहेत. या जॅकेट्ससोबत जीन्स, थ्री-फोर्थ आणि ट्राऊझर्स ट्रेण्डमध्ये आहेत. युनिसेक्स फॅशनचा विचार केला तर येथे स्वेटशर्ट्स आहेत, पण मुलांसाठी वेगळं असं बाइकर जॅकेट्स, कॅज्युअल शर्ट्स आणि डेनिम जॅकेट्स ट्रेण्डमध्ये आहेत.

अ‍ॅक्सेसरीज

यंदा बऱ्याच चांगल्या प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात तुम्हाला हेअर अ‍ॅक्सेसरीज दिसतील. जास्त हेडबॅण्ड, हेड गिअर, पोनी आणि हेड टरबन दिसतील. याशिवाय हॅण्डबॅगमध्ये क्लच आणि वन साइडेड बॅग ट्रेण्डमध्ये आहेत. गळ्यात घालण्यासाठी चोकर, थ्री लेअर चेन आहेत. डायमंड इयरिंग्स आणि ब्रेसलेट्सदेखील बाजारात उपलब्ध आहेत. एकंदरीत ट्रेण्ड हा जास्त कॅज्युअल आणि सिंपल आहे. त्यामुळे ऑफलाइन आणि ऑनलाइन खरेदीला नक्कीच वाव आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 12:30 am

Web Title: article on fashion in winter abn 97
Next Stories
1 ‘केश’रंगी रंगले!
2 मौज अनलॉक!
3 सदा सर्वदा स्टार्टअप : मार्केटिंग माहात्म्य
Just Now!
X