गायत्री हसबनीस

कॉपी करणं हा प्रकार फॅशनमध्ये होऊ शकतो, पण त्याचा प्रभाव फार कमी प्रमाणात लोकांना माहिती असतो. अनेकदा काही वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांचा फॅ शनवर चांगलाच प्रभाव पडतो. त्यांचे राहणीमान, त्यांचे उठणे-बसणे, कपडे, एकूण वावर सगळ्याचीच कॉपी होते. या फॅशन इन्फ्लूएन्सरबद्दल थोडंसं..

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Developed an innovative method to diagnose Parkinson in the first stage Mumbai
मुंबई: कंपवाताचे पूर्वनिदान करता येणार
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

फॅशनमध्ये स्थिर असं काहीच राहत नाही. सतत वेगवान गतीने बदल या क्षेत्रात होत असतात. हीच बदलणारी फॅशन एके काळी म्हणजे अठराशेच्या काळात बऱ्याच अंशी स्थिर होती. म्हणजेच त्या वेळी कोणत्याही प्रकारचा प्रभाव कोणावर नव्हता. कारण जे पूर्वापार चालत आलं होतं तेच आणि तसंच पुढेही चालत राहिलं. उदाहरणार्थ, युरोपातील फॅशन, अमेरिकेतील

फॅशनही त्या त्या भागापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे एखाद्या देशाची स्वतंत्र ओळख म्हणजे त्या काळातील त्यांची वस्त्रपरंपरा. त्या वेळी चित्रपट हे माध्यम नव्हते. त्यामुळे छायाचित्रांच्या स्वरूपात आपल्याला त्या काळातील व्यक्ती, त्यांची जीवनशैली, राहणीमान, त्यांचे प्रस्थ आणि एकूणच त्यांचे समाजातील स्थान लक्षात घ्यावे लागत होते. उच्चभ्रू व्यक्तिमत्त्वांचे समाजातले स्थान खूप मोठे होते आणि त्यांच्या पेहरावातील श्रीमंती लक्षवेधक असायची. त्या काळातील पेहराव हे आजच्या आपल्या आधुनिक जीवनशैलीशी जोडता येणारच नाहीत. त्या काळी बदलाचा वेग मंद होता. एके काळचे भलमोठे गाऊन्स, जड हॅट्स यांची जागा हळूहळू सिंगल पीस, स्कर्ट आणि टी शर्ट यांनी घेतली. हॅट्सची साइज कमी झाली. त्याऐवजी छोटय़ा आकाराच्या टोप्या आल्या. हे असे ऐतिहासिक बदल झाले ते १८०० च्या टप्प्यानंतर प्रभावी ठरलेल्या आणि अतिशय बुद्धिमान अशा फॅशन डिझायनर्सचा उगम झाल्यानंतरच.. त्यासाठी शंभर वर्षांचा काळ जावा लागला. लोकांची जीवनशैली बदलली तशी फॅ शनझपाटय़ाने बदलत गेली. १८५० च्या दशकात औद्योगिक क्रांती झाल्यावर तर मोठमोठय़ा मशीन्स आल्या आणि वेगाने बदल घडत गेले.

हा इतिहास सांगण्याचा उद्देश असा की, या काळाचा प्रचंड प्रभाव आजही आपल्यावर आहे, मात्र आजचे फॅ शनडिझायनर्स या काळातील फॅ शनचा पुर्नविचार करताना दिसत आहेत. त्या काळातील फॅशन डिझायनर्सवरती असा कोणता किंवा कोणाचा प्रभाव होता, याचा शोध घेत ठरावीक चौकटीतील फॅ शनला न मानता, तिला स्वतंत्र विचार, रूप द्यायचे हा विचारच आजच्या काळातील फॅ शनडिझायनर्सना खूप आकर्षित करतो आहे. फक्त फॅ शनडिझायनरच नाही तर राजघराण्यातील नामांकित व्यक्ती, लेखक, चित्रकार यांच्या विचारांतील बदल, आपल्या व्यक्तित्वातून त्यांनी परखडपणे मांडलेली मतं, त्यांच्या राहणीमानातला बंडखोरपणा, समानतेचा विचार, जीवनातला संघर्ष या सर्व गोष्टींमुळे त्या काळात अशी काही मंडळी मोठय़ा प्रमाणात ‘इनफ्लूएन्सर’ म्हणून नावारूपाला आली. या इन्फ्लूएन्सर्सचा फॅ शनवर खूप जास्त प्रभाव पडला आहे.

२०१३ मध्ये इटालियन ब्रॅण्ड ‘डोचे अ‍ॅण्ड गबाना’ यांनी फ्रिदा काहलो या मेक्सिकन महिला चित्रकाराच्या पेहरावापासून (१९ व्या शतकातील) प्रेरित होऊन ती घालत असलेले रेड बूट्स तसेच्या तसे परत बनवले. ज्यावर चायनीज पद्धतीची एम्ब्रॉयडरी असून त्यावर एक जिंगल बेल आहे. हा प्रयोग एका मॅक्झिनमध्ये छापून आला तेव्हा त्यांनी फ्रिदा काहलोची एकूणच जीवनशैली, तिचा पेहराव याचा त्या काळीही किती प्रभाव होता आणि त्यातून तिच्याशी साधर्म्य साधणारे असे फोटोशूट १९९८ साली फोटोग्राफर एरिस ब्रोश यांनी एका मॅक्झिनसाठी कशा पद्धतीने केले होते, ही सगळी माहिती छापली. फ्रिदाने तिची स्वत:ची अशी स्वतंत्र फॅशन विकसित केली होती. तिच्यात वाखाणण्याजोगे सौंदर्य नसले तरी ते इतरांपेक्षा निश्चितच वेगळे होते. तिच्या भुवया एकत्र होत्या, तिच्या केसांत फुलांचा भरगच्च गठ्ठा असायचा, ओठांची ठेवणही वेगळी होती. अंगावर सतत ढगळ कपडे, लूज आणि मोठा ब्लाऊज, लांबलचक स्कर्ट असा तिचा पेहराव असायचा. तिच्यावर बऱ्याच शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. त्यामुळे स्वत:ला दररोज ‘डेकोरेटेड’ ठेवण्यावर तिचा भर होता. तिच्या पेहरावात नेहमी चायनीज एम्ब्रॉयडरीचा समावेश असायचा. तसेच फ्रिल्ड शर्ट्स, जेड आणि कोलर ज्वेलरी, पाइन्ड फ्लॉवर्स यावर तिचा भर होता. तोरसो आणि तेहूआना ड्रेस हे तिच्या पसंतीचे होते. तेहूआना ड्रेसचं वैशिष्टय़ं असं की, हा ड्रेस मेक्सिकोमधील ऑक्साका या राज्यात ‘इसथमस ऑफ तेहूआनटेपेक’ या शहरातील मातृसत्ताक समाजात घातला जातो. तिच्या एकूणच फॅशनमधून प्रभावित होण्यासारख्या अनेक गोष्टी आज प्रत्येक भारतीय आणि भारताबाहेरील सामान्य तरुणींच्या फॅ शनमध्ये भर घालू लागल्या आहेत. आज तरुण मुली टॉप आणि स्कर्ट, गाऊन हे ट्रॅडिशनल आणि मॉडर्न लुक म्हणूनही सहज घालतात. ज्यातही फ्रिदाच्या पेहरावातला प्रभावीपणा सहज आत्मसात होण्यासारखा आहे आणि तसे आऊ टफिट्सही बाजारात उपलब्ध होत आहेत. वेस्टर्न फॅशनमध्येही फ्रिदाच्या फॅशनसारखे टॉप्स, स्कर्ट्स, गाऊन्स, ब्लाऊ ज उपलब्ध आहेत. फ्रिदाचा चेहरा हा आज सध्या एक मोठा फॅशनट्रेण्डमार्क ठरला आहे. सध्या सगळ्या अ‍ॅक्सेसरीजमध्येही फ्रिदाचा चेहरा दिसतोय. शूजवर, ब्रूचवर, टी-शर्टवर, बॅग या सगळ्यावर तिचा चेहरा दिसतो. एक मेक्सिकन चित्रकार जी सेल्फ-पोट्र्रेट्स काढण्यात माहिर होती आज जगभरात ती तिच्या फॅशनमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. २०१३ पासून ते आत्तापर्यंत फ्रिदाने फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून वेगळीच जादू निर्माण केली आहे. म्हणजे जवळपास २०१० चे दशक हे ‘फ्रिदा काहलो इफेक्ट’ म्हणून ओळखले जात आहे.

फक्त फ्रिदाच नाही तर याआधीही फॅशनवर प्रभाव पाडणारी अशी अनेक उदाहरणे समोर आहेत. यात प्रामुख्याने स्त्रिया आहेत, ज्यांनी मोठय़ा प्रमाणात फॅशनला उभारी दिली आहे. कोको शनेलपासून, मर्लिन मन्रो, प्रिन्सेस डायना अशी काही विशिष्ट उदाहरणे देता येतील. कोको शनेलने जागतिक पातळीवर फॅशन विश्वात एक वेगळा इतिहास रचला होता. कोको एक फ्रेंच डिझायनर होती आणि तिची स्वत:ची एक अशी फिलॉसॉफी होती. शनेल नं. ५ या परफ्यूमपासून सुरुवात करून त्यापुढे तिने तिच्या स्वत:च्या सिग्नेचर स्टाइल्स विकसित केल्या. तिने काही ब्रॉडवेच्या नाटकांसाठीही कॉश्च्यूम डिझाईन केले होते. दुसऱ्या महायुद्धाशी तिचा जवळचा संबंध होता. तिची फॅशनही मोनोक्रोमॅटिक आणि लक्झरिअस होती. तिच्या फॅ शनमध्ये नेहमीच स्ट्राइप्स आणि पोलका डॉट्सचा समावेश होतो ज्याचे आज जगभरात कलेक्शनवर कलेक्शन निघतात. तिचा लोगो आज प्रत्येक आऊटफिटवर, बॅग्सवर आणि बेल्ट्सवर असतो. मर्लिन मन्रोने ज्या पद्धतीने लॉन्ग कोट्स परिधान केले होते, ती पद्धत तिच्यापूर्वी कोणीच अवलंबली नव्हती. ती स्वत: ग्लॅमर विश्वात असल्याने त्या काळी ती एक सेक्स सिम्बॉल म्हणून ओळखली गेली. तिचे हिल्स, केशरचना, उडणारा गाऊन हे फक्त तिच्यासाठी होतं. त्याचा फॅशन विश्वावर खूप मोठा इन्फ्लूएन्स झाला. प्रिन्सेस डायना तिच्या निळ्या आयलायनरसाठी प्रसिद्ध होती आणि तिच्या बॉयकटसाठीही तिचा विशेष उल्लेख होतो. या दोन्ही गोष्टी आज मोठय़ा प्रमाणात इन्फ्लूएन्सिंग ठरल्या आहेत. तिचं ब्लू आयलायनर आज कित्येक ब्रॅण्ड्सनी पुढे आणलं आहे. डायना कट म्हणून तिचा लुक किती तरी स्त्रिया फॉलो करतात. आज फ्रिदा असो किंवा मर्लिन या फॅशन विश्वात पुन्हा एकदा इन्फ्लूएन्सर म्हणून परतल्या आहेत. त्यांच्यातील तीच बंडखोरी, एक्स फॅक्टर आताच्या डिझायनर्सना आणि खास करून तरुणाईला आकर्षित करतो आहे.

फॅशनचे एक वर्तुळ पूर्णझाले आहे!

viva@expressindia.com