||वेदवती चिपळूणकर

२० वर्षांपूर्वी मुंबईने पहिल्यांदा ‘लॅक्मे फॅ शन वीक’ हा सोहळा अनुभवला. पहिल्या वर्षी आठवडाभराच्या असलेल्या या सोहळ्याने हळूहळू आपलं रूप पालटत हे सेलिब्रेशन पाच दिवसांचं केलं आणि नवनवीन थीम्स घेऊन हा फॅ शन वीक आपल्यासमोर यायला लागला. फॅ शन क्षेत्रात होत असलेले नवनवीन प्रयोग आणि येत असलेले नवनवीन ट्रेण्ड्स शोकेस करण्यात ‘लॅक्मे फॅशन वीक’ कायमच अग्रेसर राहिलेला आहे. यंदाच्या सीझनची थीम ‘बेटर इन थ्रीडी’ ही अशीच फ्युचरीस्टिक थीम असणार आहे. ‘लॅक्मे फॅ शन वीक समर रिसॉर्ट २०२०’ हा आतापर्यंत बदललेल्या आणि भविष्यात बदलणाऱ्या फॅ शनची झलक घेऊन येणार आहे.

‘थ्रीडी मेकअप कलेक्शन’ ही या सीझनची खासियत असणार आहे. ‘एचडी मेकअप’ आणि ‘थ्रीडी मेकअप’ ही गेल्या काही वर्षांंत उदयाला आलेली नवीन मेकअप टेक्निक्स आहेत. स्क्रीनवर व फोटोजच्या प्रिंटमध्ये छान दिसणारा एचडी मेकअप आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रत्यक्षातही वेगवेगळे इफेक्ट्स देऊ शकणारा थ्रीडी मेकअप हे सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. चेहऱ्याच्या प्रत्येक बारीकसारीक डिटेल्सना हवं तसं बदलू शकण्यासाठी हे थ्रीडी टेक्निक वापरलं जातं. या इफेक्ट्ससाठी फाउंडेशनच्या वेगवेगळ्या शेड्स एकाचवेळी वापरल्या जातात. लिपस्टिकच्या शेड्स बदलून आणि लायनिंग करून त्यांना हवा तसा उठाव दिला जातो, कॉलरबोनला वेगवेगळ्या शेड्सनी कॉन्टय़ोरिंग केलं जातं. या थ्रीडी मेकअपसाठी वापरली जाणारी मेकअप प्रॉडक्ट्स हीदेखील अनेकदा थ्रीडी प्रिंटिंग आणि असेम्ब्लिंग या तंत्राचा वापर करून बनवली जातात. थ्रीडी मेकअपला मदत करणारी मेकअप प्रॉडक्ट्सची रेंज यावेळच्या ‘लॅक्मे फॅशनवीक’मध्ये लॉन्च होणार आहे. ‘लॅक्मे’चे हेड ऑफ इनोव्हेशन्स असलेल्या अश्वथ स्वामिनाथन यांनी सांगितलं, ‘मॅट आणि शाईन या दोन इफेक्ट्सच्या कॉम्बिनेशनमधून हे कलेक्शन आकाराला आलं आहे. चेहऱ्याच्या सौंदर्याचे सगळे बारकावे उठावदार बनवण्याच्या उद्देशाने हे कलेक्शन तयार झालं आहे’.

आऊटफिट्सच्या डिझाइनमध्ये नॅचरल आणि मॅनमेड यांच्या एकत्र प्रयोगाने थ्रीडीच्या थीमशी जुळवून घेणारी डिझाईन्स सादर होतील. ‘लॅक्मे फॅ शनवीक समर रिसॉर्ट २०२०’ च्या ग्रँड फिनालेमध्ये आपलं कलेक्शन सादर करणाऱ्या अमित अगरवालने सांगितलं, ‘डिझाइन्समध्ये नॅचरल मोटिव्हजचा पॅटर्न आहे. मात्र ती साकारण्यासाठी रिसायकल्ड प्लॅस्टिकसारख्या घटकांचा वापर करण्यात आला आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही एलिमेंट्सचं एकत्रीकरण हे यापुढच्या फॅ शनचं चित्र असेल’. या डिझाईन्सचं वैशिष्टय़ म्हणजे एम्ब्रॉयडरीजमधून थ्रीडी इफेक्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यंदाची कलर पॅलेटही आयव्ही ग्रीन, डस्की मौव, थिस्ल् वायोलेट, बेरी रेड अशी असणार आहे. ही कलर पॅलेट के वळ समर आऊटफिट्स नव्हे तर सीझनच्या फेस्टिव्ह कलेक्शनलाही वापरण्यात येणार आहे. डिझायनिंगमध्ये वॉटर फिनिश्ड फॅब्रिक म्हणजे पाणी किंवा डाग धरून न ठेवणारा कपडा, स्ट्रेचेबल शिफॉन आणि ऑर्गान्जा अशा पद्धतीचे फॅब्रिक आणि फ्रंट झिप्स, रिप्ड टय़ूल्स, अशा पॅटर्न्‍सचा प्रभाव दिसणार आहे.

यावेळच्या ‘लॅक्मे फॅ शनवीक समर रिसॉर्ट’ने केवळ थीम आणि कलेक्शनमध्येच नव्हे तर संकल्पनेतही नावीन्य आणलं आहे. केवळ फॅ शन शो हा एकच उद्देश नसून फॅ शनच्या बाबतीतील सर्वच मुद्दय़ांवर चर्चा घडवून आणणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. फॅ शन शोच्या व्यतिरिक्त ‘स्टुडिओ’ ही संकल्पना ‘लॅक्मे फॅ शनवीक’ने यापूर्वीच आणली होती जिथे कलेक्शन सादर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करता येत होते. यावेळी ‘अ‍ॅटलियर’ ही नवीन स्पेसदेखील ओपन केली जाणार आहे ज्यात प्रत्येक डिझायनरला वेगवेगळ्या तांत्रिक प्रयोगांच्या मदतीने कलेक्शन सादर करता येतील.

‘लॅक्मे फॅ शनवीक’च्या विसाव्या वर्षांत येणारा ‘समर रिसॉर्ट’ हा पहिलाच सीझन आहे. त्यामुळे साहजिकच नवनवीन मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी एक्स्पर्ट्स, चॅलेंजेस घेण्यासाठी नवीन डिझायनर्स आणि फॅ शन शोसाठी नवीन स्पेसेस तयार होत आहेत. आतापर्यंत लहान वयात असलेल्या लॅक्मे फॅ शन वीकने विशी गाठल्यानंतर आणि नवीन दशकाच्या सुरुवातीच्या पाश्र्वभूमीवर अजून काय काय तांत्रिक, वैचारिक आणि कलात्मक बदल अनुभवायला मिळतील ही निश्चितच कुतूहलाची बाब आहे.