07 March 2021

News Flash

प्रिय मित्रास..

ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डेचा असतो. नवीन नवीन कॉलेज सुरू झालेलं, मित्र-मैत्रिणींचे नवे ग्रुप झालेले, शिवाय जोडीला रिमझिम पावसाचे दिवस..

| July 31, 2015 01:07 am

ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डेचा असतो. नवीन नवीन कॉलेज सुरू झालेलं, मित्र-मैत्रिणींचे नवे ग्रुप झालेले, शिवाय जोडीला रिमझिम पावसाचे दिवस.. फिर क्या.. फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स बनतातच. आता हे सेलिब्रेशन दोन दिवसांवर आलेय. आपल्या बेस्ट फ्रेंडला काय गिफ्ट द्यायचं आणि त्याच्याकडून आपल्याला काय मिळेल याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. बाकी सगळ्यांसाठी फ्रेंडशिप बँड आणि बेस्ट फ्रेंडसाठी काहीतरी खास. मग ते खास नेमकं काय? दीर्घकाळ स्मरणात राहील असं काहीतरी गिफ्ट असलं पाहिजे. त्यासाठी या काही गिफ्ट आयडियाज्..
* आपला आणि मित्र किंवा मैत्रिणीचा फोटो असलेला मग गिफ्ट करू शकता. तो मग मेमोरेबल गिफ्ट असेल. प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्हाला आठवून होईल किंवा तो मग कप शो पीस म्हणूनही छान दिसेल. तुमच्या ग्रुप पीकदेखील मगावर छापून तुम्ही आठवण म्हणून एकमेकांना गिफ्ट करू शकता.
* कप किंवा मगऐवजी आपले फोटो असलेले घडय़ाळ, उशी, वॉल हँगिंग, किचेन्स असे पर्याय आहेत.
* तुमचा फ्रेंड खवय्या असेल आणि तुम्ही चांगले कुकअसाल तर त्याच्या आवडीची डिश तुम्ही स्वत:च्या हाताने बनवून त्याला देऊ  शकता. याने तुमच्या गिफ्टचा खर्चही वाचेल आणि तुमचा मित्र खूशही होईल.
* तुमचा पॉकेटमनी संपला असेल किंवा जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही ‘डू इट यूवसेल्फ’ वेबसाइट्वर सर्च करून घरातल्या काही टाकाऊ  वस्तूंपासून टिकाऊ  वस्तू बनवून फ्रेंड्सना हे हँडमेड गिफ्ट देऊन सरप्राइझ देऊ शकता. तुमची कलात्मकता दाखवायला यातून चान्स मिळेल.
* सर्वात सोपं आणि झटपट होणारं गिफ्ट म्हणजे तुम्ही स्वत:च्या आणि मित्रांच्या फोटोंचे कोलाज करून व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी ठेवू शकता. शिवाय हेच कोलाज फ्रेम करून त्यांना गिफ्ट करू शकता. कोलाजऐवजी तुमचे सगळे फोटो एकत्र करून छोटी फिल्म बनवू शकता. ती अपलोडही करता येईल.
* तुम्हाला थोडंफार शिवणकाम येत असेल तर किंवा क्विलिंग वायरने तुम्ही होम मेड फ्रेंडशिप बँड्स तयार करू शकता.
* बाजारातून एक प्लेन मोबाइल कव्हर आणून त्यावर स्वत:च्या हाताने नक्षीकाम करून तेदेखील गिफ्ट करायला काहीच हरकत नाही.
* खरं तर फ्रेण्डशिपडेला फ्रेण्डशिप बँड्स बांधून दुसऱ्या दिवशी ते टाकून देण्यापेक्षा कायम स्वरूपी  मित्र-मैत्रिणींच्या लक्षात राहील असं काहीतरी द्यावं. एक छोटंसं रोपटं देऊन किंवा बिया देऊन हा दिवस साजरा केला तर? ते रोप वाढवण्याचा संकल्प फ्रेंडशिप डेला केला तर पर्यावरण हिताच्या दिशेने एक पाऊलसुद्धा पडेल आणि त्याच रोपटय़ासोबत एक सेल्फी काढून तुम्ही सोशल नेटवर्कवर अपलोड करून फ्रेंडशिप डेचं हटके सेलिब्रेशन करू शकता.
ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर फ्रेण्डशिप डे सेल
भारतातल्या आघाडीच्या इ कॉमर्स कंपन्यांनीसुद्धा यंदा फ्रेंडशिप डे जोरदार साजरा करण्याचं ठरवलेलं दिसतंय. २ ऑगस्टच्या फ्रेंडशिप डेला ३० ते ५० टक्के डिस्काउंट देण्याचं बऱ्याच शॉपिंग साइट्सनी जाहीर केलंय. ऑनलाइन डिस्काउंट्सचा फायदा घेत खालील गोष्टी मित्रांना गिफ्ट करता येतील.
लॅपटॉप बॅक – हे गिफ्ट म्हणून देण्यासाठी एक चांगला पार्याय होऊ  शकतो. मुंबईला लॅमिंग्टन भागात एक चक्कर मारतील तर लेटेस्ट ट्रेण्ड्सचे लॅपटॉप बॅक डिझाइन्स दिसतील. त्यासाठी अंदाजे ८०० ते ९०० रुपयापर्यंत मिळतात. पण अ‍ॅमॅझॉन आणि इन्फिबिम या वेबसाइट वर फ्रेंडशिप डेनिमित्त ४०० ते ५०० रुपयांपर्यंत लॅपटॉप बॅक मिळतील.
पुस्तक-आपला मित्र किंवा मैत्रीण पुस्तकाचे निस्सीम भक्त असतील, म्हणजेच त्यांना वाचायला आवडत असेल तर मराठी किंवा इंग्रजी पुस्तके देऊ  शकता. ऑनलाइन बाजारात पुस्तकही सवलतीच्या किमतीत मिळताहेत. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर पुस्तकरूपी गिफ्ट्सची रेंज बघायला मिळेल.
मोबाइल रिचार्ज-ऐकायला विचित्र वाटलं ना! पण सदासर्वकाळ बॅलन्स नाही म्हणून ओरडणाऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला याद्वारे एक छानसं फ्रेंडशिप डे गिफ्ट होऊ  शकेल.  फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ‘पेटीएम’ने १०० पेक्षा जास्त रुपयांचा रिचार्ज केल्यास १०० टक्के कॅशबॅक मिळू शकेल असं जाहीर केलंय. ‘फ्री का माल’ या नावाप्रमाणे वेगळ्या वाटणाऱ्या साइटवर रिचार्ज गिफ्टवर १० टक्के ऑफर जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:07 am

Web Title: best friend gifts on friendship day
Next Stories
1 ट्रेण्डिंग : #नावीन्याचे प्रयोग
2 मॉडर्न इंडियन क्युझीन
3 क्लिक : मनीष नारकर
Just Now!
X