जीविषा काळे

लहान मुलांना गंमत म्हणून आई कधी फ्रॉक घालून किंवा नुकत्याच आलेल्या मऊ  टकलावर उगवलेल्या चार केसांचे ‘बो’ बांधून, अगदी काजळ लावून फोटो काढून घेते. पण त्याच मुलाला वयात आल्यानंतरही समजा साडी नेसाविशी वाटली तर जणू काही त्यांच्यावर आभाळच कोसळते. एखाद्या मुलीला समजा शर्ट-पॅण्ट , स्पोर्ट्स शूज असेच कपडे घालावेसे वाटत असेल तर जरा ‘मुलीसारखी’ राहा हे अगदी तिला सहज येता-जाता ऐकवले जाते.

‘शब्द, कपडे, मेकअप, केशभूषा, पॅटर्न्‍स या सगळयाच गोष्टी मनुष्याने बनवलेल्या आहेत आणि त्यानेच त्यांना काहीएक लैंगिक स्वरूप दिले आहे. या गोष्टींना स्वत:चे असे काही लिंग नाही. आज जर आपण त्यांना ठरावीक लिंगाने संबोधत असू तर ते आपण त्यांना (आपल्या भाषेच्या सोयीसाठी आणि समजण्यासाठी) दिलेले स्वरूप आहे. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात असलेले लिंगाचे नियम व भूमिका हे संपूर्णत: मनुष्यघटित असल्याने हे नियम काळानुरूप बदलले जाऊ शकतात.’

हा संदर्भ वाचनात आला आणि त्याची फॅ शन, तिची फॅशन यापलीक डेअ‍ॅण्ड्रोगिनस (उभयलिंगी) फॅशनकशा पद्धतीने मूळ धरते आहे किंवा त्यामागचा विचार नेमका कसा आहे हे लक्षात घ्यावेसे वाटले. अ‍ॅण्ड्रोगिनस फॅ शनम्हणजे पुरुष व स्त्री या दोन्ही लिंगांची वैशिष्टय़े असलेले पेहराव. जसे स्कर्ट्स, घागरा, साडी हे स्त्रियांचे तर चौकोनी खांद्यांचे शर्ट, जाड पट्टय़ांचे घडय़ाळ, बो-टाय इत्यादी पुरुषांचे अशी वैशिष्टय़े पूर्वापार आपल्या मनात रूढ आहेत.

इंग्रजीमध्ये एक जुने पण अजूनही वापरात असलेले गमतीशीर प्रसिद्ध वाक्य आहे, ‘हु वेअर्स द पॅण्ट्स इन युअर रिलेशनशिप?’ ज्याचे भाषांतर करायचे झाले तर असे म्हणता येईल की,  ‘घरातला पुरुष कोण आहे?’ १९व्या शतकात जन्माला आलेलं हे वाक्य अजूनही वापरात आहे. त्या काळी बायका स्कर्ट्स घालत असत. नुकतंच लग्न झालेला किंवा प्रेमात पडलेला मित्र जेव्हा त्याच्या बायको/ प्रेयसीच्या मताला किंमत द्यायला सुरुवात करत असे किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयात त्यांचे मत विचारात घेई तेव्हा त्याला खिजवण्यासाठी मित्र हा प्रश्न विचारत असत. अर्थातच असे का? याचे उत्तर सोपे आहे. कारण महत्त्वाचे निर्णय घेण्याचे हक्क त्या वेळी पुरुषांनाच असायचे अणि पुरुष काय पोषाख घालत असत तर, पॅण्ट्स. ‘ती’चे मत घेतले म्हणजे लेका तुमच्यात तीच पुरुष आहे वाटतं, हाहा! असे म्हणून एकमेकांना टाळ्या दिल्या जात असत. समाजमनाची ही मानसिकता फॅ शनमध्येही त्याच पद्धतीने घट्ट रुजलेली होती.  १९१०च्या दशकात प्रसिद्ध फॅशन डिझायनर कोको शनेल यांनी पहिल्यांदाच बायकांना ‘पॅण्ट्स’च्या रूपात एक भेट दिली जी आज जगभरात स्त्रिया वापरत आहेत. आपल्याकडेही ‘नेसणे’ प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे. धोतर असो वा साडी ते नेसलेच जाते. असे जरी असले तरी आपल्या मेंदूने आणि समाजाने आपल्याला असे घडवले आहे की आपण प्रत्येक गोष्ट लिंगांच्या चौकटीत बसवतो. अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचीही यातून सुटका होत नाही. मुलगा झाला तर निळा अणि मुलगी झाली तर गुलाबी कपडय़ांपासून डायपपर्यंत सर्व मग त्याच रंगात रंगून निघतं. लहान मुलांना गंमत म्हणून आई कधी फ्रॉक घालून किंवा नुकत्याच आलेल्या मऊ  टकलावर उगवलेल्या चार केसांचे ‘बो’ बांधून, अगदी काजळ लावून फोटो काढून घेते. पण त्याच मुलाला वयात आल्यानंतरही समजा साडी नेसाविशी वाटली तर जणू काही त्यांच्यावर आभाळच कोसळते. एखाद्या मुलीला समजा शर्ट-पॅण्ट , स्पोर्ट्स शूज असेच कपडे घलावेसे वाटत असेल तर जरा ‘मुलीसारखी’ राहा हे अगदी सहज तिला सहज येता-जाता ऐकवले जाते.

मात्र या चौकटी भेदण्याचे काम हळूहळू होते आहे. फॅशन इंडस्ट्रीत तर ते वेगाने केले जाते आहे. अभिनेतारणवीर सिंगने केलेले फॅशनचे प्रयोग आपण पाहातच असतो. बऱ्याचदा त्याला या प्रयोगांसाठी ट्रोल व्हावे लागले आहे किंवा त्याला अतरंगी नाव देऊन त्याची टिंगलटवाळीही केली जाते. परंतु जेव्हा एक ‘माचो’ प्रतिमा असलेला, प्रसिद्ध अभिनेता त्याला मनाजोगे कपडे घालून मीडियासमोर येतो, तेव्हा त्याला फॉलो करणाऱ्या माझा बऱ्याच मित्रांना देखील त्यांना हवे तसे पेहराव करायची हिंमत मिळते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. माझ्यासह ओळखीतल्या अशा अनेक मुली आहेत ज्या मुलांच्या सेक्शनमधून अनेकदा शॉपिंग करतात.

मुलींचे कपडे त्यांना निसर्गाने दिलेल्या आकाराला खुलवण्याचे काम प्रामुख्याने करतात. परंतु प्रत्येक मुलीला हे असे कपडे आवडतीलच असे नाही. मला स्वत:ला साडी नेसणे, ड्रेसेस घालणे जितके आवडते, तितकेच चौकोनी खांद्यांचे शर्ट, बूट आणि केस टाईट बनमध्ये बांधून बाहेर पडणेही आवडते. आपल्याला ज्या कपडय़ात कम्फर्टेबल वाटेल, ज्यात आपल्याला आपण असल्यासारखे वाटू, आरशात बघितल्यावर आपल्याला आनंदी वाटेल; अशा प्रकारचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य ही अ‍ॅण्ड्रोगिनस फॅ शनआपल्याला देते. या विषयावर एका कॉस्च्यूम डिझायनर मैत्रिणीशी बोलत असताना ती म्हणाली, ‘ऑल्वेज कीप वन थिंग इन माइंड. वी वेअर द क्लोथ्स, क्लोथ्स डोंट वेअर अस.’ सोप्प्या शब्दांत सांगायचे झाले तर आपण जसे आहोत तसे आपले कपडे असले पाहिजेत, कपडय़ांनुसार आपण बदलता कामा नये.

खरं तर जगात आपण अनेक गोष्टी इतरांना आवडाव्यात यासाठी करत असतो. मात्र कपडे ही अशी एक गोष्ट आहे जी आपण आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी करू शकतो. आपल्या कामाच्या आयुष्यात कदाचित हे करणे कठीण आहे मान्य, पण आशा आहे की भविष्यात तिकडेही पेहरावाचे नियम लादणे बंद होतील. कदाचित मॉल्समध्ये मेन्स आणि वुमेन्स असे सेक्शनही राहणार नाहीत आणि हा काळ फार लांब नाही..!

viva@expressindia.com