vn18सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
या आठवडय़ाच्या टॉप ट्रेिण्डगमध्ये होता बॉलीवूड हंगामा. ट्रेलर रिलीज, वन इयर सेलिब्रेशनपासून ते न्यू इयर सेलिब्रेशनपर्यंतचे ट्रेण्ड्स चच्रेचा विषय ठरले.
 viva08
 
‘दिल धडकने दो’ रॉक्स
कास्ट- प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर, अनिल कपूर. दिग्दíशका- झोया अख्तर, गाणी- जावेद अख्तर, म्युझिक – शंकर एहसान लॉय.. बॉस इतने सारे बडे बडे नाम और उनकी कलाकारी.. मग अनेकांच्या दिल की धडकन वाढली तर नवल ते काय? ‘दिल धडकने दो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज व्हायच्या आधीपासूनच सोशल मीडियावर त्याची सॉलिड चर्चा रंगली होती. तो रिलीज झाल्यावरही ‘ट्विटर’, ‘फेसबुक’वर टॉपटेन ट्रेण्ड्समध्ये बराच चच्रेत होता. ट्रेलर रिलीजच्या वेळी भारतात तो टॉप फाइव्ह ट्रेिण्डगमध्ये होता. एका दिवसात ‘यू टय़ूब’वर या व्हिडीओला सात लाखांवर व्हय़ूज मिळाले होते.

व्हॉटस्अ‍ॅप – यूटय़ूब अपडेट्स
आपण कामात बिझी असल्यानं ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरचे मेसेजेस वाचू शकत नाही. ते मेसेजेस वाचून दाखवण्याची सोय युजर्सना द्यायचा विचार चालू आहे. त्यासाठी ‘ड्रायिव्हग मोड’ हे नवीन फीचर सुरू करण्यात येणारेय. हे फीचर एनेबल केल्यावर ‘व्हॉटस्अ‍ॅप’ मेसेज वाचून दाखवेल, असं म्हटलं जातंय. असंख्य नेटिझन्सच्या लाडक्या ‘यूटय़ूब’ला आता आपल्या भाषेत वापरण्याची संधी मिळणारेय.
‘यूटय़ूब’वर १४ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आलाय. एकदा वापरकर्त्यांनं प्राधान्यानं भाषा निवडल्यावर वेबसाइटवरच्या सर्व िलक्स, बटन्सची भाषा तत्काळ भाषांतरित झालेली दिसेल. या वेबसाइटवर १६५ विविध बोलींच्या कॅप्शन टाइप करण्याचाही पर्याय आहे. अधिकाधिक भाषांच्या पर्यायामुळं नेटिझन्सना ‘यूटय़ूब’ स्थानिक भाषांत वापरण्याची संधी मिळेल.  

ट्रेलर्स डे आऊट
आठवडय़ाभरात बऱ्याच चित्रपटांचे ट्रेलर्स रीलीज झाले. त्यापकी काहींनी ‘यूटय़ूब’, ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’वरील ट्रेिण्डगमध्ये वरचढ स्थान पटकावलंय. या ट्रेलर्सवर व्हय़ूअर्सच्या पसंतीची मोहोर उमटल्येय. ती अशी – कंगना राणावत नि आर. माधवनचा फॅमिली कॉमेडीपट ‘तनू वेडस् मनू रिटर्न’ला चार दिवसांत १८ लाखांवर व्हय़ूज मिळालेत. अर्शद वारसी नि जॅकी भगनानी यांच्या ‘वेलकम टू कराची’ या क्रेझीएस्ट चित्रपटाच्या ट्रेलरला दोन दिवसांत दहा लाखांवर व्हय़ूज मिळालेत. ‘बॅटमॅन व्हस्रेस सुपरमॅन डाऊन ऑफ जस्टिस’ ये मुव्ही का तो सिर्फ नामही काफी हैं, उसका ट्रेलर देखने के लिए! त्याला एका दिवसात तब्बल ५२ लाखांवर व्ह्य़ूअर्स मिळालेत.

झळाळतं सोनं
नुकत्याच झालेल्या अक्षय्य तृतीयेमुळं तुम्हाला वाटेल की, आता मी सोन्याबद्दल वगरे लिहित्येय की काय; पण सोनं किंवा प्रॉपर्टी वगरे झाल्या व्यावहारिक गोष्टी. कलेच्या प्रांतातल्या मंडळींसाठी एक खूशखबर. ‘व्हॉटस्अ‍ॅप’ नि ‘फेसबुक’वर सध्या एक फोटो व्हायरल होतोय. जुन्या जमान्यातल्या- आताच्या पिढीच्या भाषेत ‘ब्लॅक अँड व्हाइट’च्या जमान्यातल्या एक सो एक सुरेल आवाजांची ही मंडळी. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत काढला गेलेला हा फोटो पहिल्यांदा फॉरवर्ड करणाऱ्याला रसिकांकडून मोठ्ठं थँक्यू. एकेका नावाचा जणू एकेक सूर.. अजूनही तितक्याच नितळपणं झळाळणाऱ्या या साऱ्या सोनेरी सुरांना मनापासून सलाम!
 
राहुल रिटर्न्‍स
जवळपास दोन महिन्यांच्या मोठय़ा ब्रेक के बाद राहुल गांधी भारतात परतलेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यावर ते सुट्टीवर गेले होते नि त्यामुळं चच्रेला उधाण आलं होतं. आता ते परतल्यानंतर ‘ट्विटर’वरील ‘#राहुल रिटर्नस #पप्पू रिटर्न’ असे हॅशटॅग्ज भारतात दुसऱ्या स्थानावर होते, तर इतर सोशल मीडियात त्याच्यावरील कमेंट्सह अनेक कार्टून्सची देवाणघेवाण होत होती. त्यानंतर त्यांनी काढलेल्या किसान रॅली नि चच्रेची चर्चाही झाली. त्या अनुषंगानं ‘सोनिया’, ‘मनमोहन’ आदी टॅग ट्रेण्डमध्ये होते. मोदी सरकारच्या भूसंपादन कायद्याला विरोध करत ‘#किसानविरोधीनरेंद्रमोदी’ हा हॅशटॅग ट्विटरवर वरचढ ठरला होता. शिवाय ‘नरेंद्र मोदी पुन्हा भारतभेटीवर आले असून पंतप्रधान झाल्यापासून गेल्या दहा महिन्यांतील ही त्यांची सहावी भारतभेट आहे’ असा मेसेज ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर फॉरवर्ड होत होता. वांद्रय़ाच्या पोटनिवडणुकीच्या निकालादिवशी सोशल नेटवर्किंगवर कोंबडीच्या खुराडय़ापासून ते वाघाच्या प्रतीकापर्यंत काय काय फोटो पडत होते आणि व्हायरल होत होते. याखेरीज विडंबन कविता आणि टोमण्यांची वन लायनर्स यांचाही पाऊस पडत होता. वांद्रे निकालाकडे लक्ष ठेवलेल्या ट्विटरकरांसह फेसबुककरांनीही आपल्या मतांच्या ट्विट्स नि पोस्ट मोठय़ा प्रमाणात केलेल्या दिसल्या.

 #आंबेडकर जयंती
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’नं ‘डुडल’च्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलं. ‘गुगल’नं १४ एप्रिलच्या दिवशी डॉ. आंबेडकरांचं छायाचित्र गुगल सर्चच्या होम पेजला ठेवलं होतं. केवळ भारतातच नाही (google.in) तर जवळपास जगभर गुगलनं हेच डूडल वापरलं.

viva10
पुढल्या ओळीत-
  जोहराबाई अंबालेवाली, राजकुमारी, अमीरबाई कर्नाटकी, हमीदा बानो, गीता रॉय, लता मंगेशकर नि मीना कपूर..

मागच्या ओळीत-
शैलेश मुखर्जी, तलत महमूद, दिलीप ढोलकिया, मोहम्मद रफी, शिवदयाल बालिश, जी. एम. दुर्रानी, किशोरकुमार गांगुली नि मुकेश..