प्रपोज करताना सिनेमातलं एखादं दृश्य नक्कीच समोर असतं. सिनेमातला व्हॅलेंटाइन डे आठवतोय का. आजच्या दिवशी ज्यांना ‘बॉलीवूड इस्टाइल’ प्रपोज करायचंय त्यांच्यासाठी ही उजळणी आणि ज्यांचं करून झालंय त्यांच्यासाठी फ्लॅशबॅक..
सिनेमाचं भारतीयांना असणारं वेड काही नवीन नव्हे. एका वर्षांत जास्तीतजास्त चित्रपट प्रदíशत करणारी ही आपली चित्रपटसृष्टी; अर्थात बॉलीवूड. भारतीय सिनेमा आणि प्रेमकथा यांना विलग करणं म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे. आपले बहुतेक चित्रपट हे प्रेमावर आधारलेले असतात; आणि एखादा हटके असलाच तर त्यातही कुठेतरी एखादी प्रेमकथा दडलेली असल्याशिवाय राहत नाही. यामुळेच कदाचित बॉलीवूड आणि ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवसाचादेखील घनिष्ठ संबंध आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’पासून १९६० मधल्या ‘मुघल-ए-आझम’पर्यंत आणि नुकत्याच येऊन गेलेल्या ‘आशिकी’पासून सलमान खान आणि माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके हैं कौन’पर्यंत प्रेमकथांनीच भारतीय सिनेमाला मोठं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. व्हॅलेंटाइन्स डे आणि भारतीय सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात आधी आठवतो तो यश चोप्रांचा १९९५ मधला ‘दिल तो पागल है’. ‘जर प्रेमावर तुमचा विश्वास असेल तर जी व्यक्ती तुमची आहे ती नक्की तुम्हाला भेटेल’, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या चित्रपटात या दिवसाच्या महतीच्या आधाराने गोष्ट उलगडली गेली. ‘व्हॅलेंटाइन डे’चं प्रस्थ या सिनेमानेच भारतात जास्त वाढवलं. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितवर चित्रित झालेलं ‘प्यार कर’ हे गाणं, त्यात वापरलेलं चंद्राचं रूपक, लाल-पांढरे-गुलाबी फुगे हे सगळंच मनात घर करून गेलं. प्रेमाच्या अतूट बंधाचं उदाहरण म्हणून हा चित्रपट अगदी खास आहे.
२००१ मध्ये प्रदíशत झालेल्या ‘बागबाँ’ मध्ये ‘व्हॅलेंटाइन्स डे’चं अगदी हलकं-फुलकं स्वरूप बघायला मिळालं. तरुणांची हा दिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्याचबरोबर अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीने साकारलेल्या वृद्ध जोडप्याने या दिवसाला आपलंसं करत प्रेम साजरं करणं ही गमतीदार कल्पना ‘चली चली’ या गाण्यातून आपल्यासमोर आली.
या चित्रपटांव्यतिरिक्त ‘आशिकी’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’ अशा असंख्य िहदी चित्रपटांमधून व्हॅलेंटाइन्स डेची झलक प्रेक्षकांना मिळाली.
हॉलीवूडमध्ये प्रदíशत झालेला ‘व्हॅलेंटाइन्स डे’ हा खरंतर इंग्रजी चित्रपट आहे. मात्र त्यात विविध प्रेमकथा, प्रेम व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या पद्धती, लहान मुलांपासून वृद्ध आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनी या दिवसाच्या निमित्ताने अनुभवलेलं प्रेम अत्यंत मजेशीर आणि हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडलं आहे. विशेष म्हणजे, कथानक उलगडण्याची शैली अगदी भारतीय चित्रपटासारखी आहे. इतकंच नव्हे, तर प्रचलित िहदी गाण्यांचाही या चित्रपटात समावेश आहे.
चित्रपटांच्या कथानकापलीकडे जाऊन प्रत्यक्षातही बॉलीवूड आणि या दिवसाचं नातं अतूट आहे. तारे-तारकांच्या या दिवशी रंगणाऱ्या पाटर्य़ा, सोशल नेटवìकग साइट्सवर त्यांची मतं आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा वाचण्यासाठी होणारी घाई, या दिवसाचं निमित्त साधून प्रदíशत केले जाणारे चित्रपट हे सगळंच १४ फेब्रुवारीच्या या गौण दिवसाला खास रूप देताना आढळतं.
बॉलीवूड पर्यटनाच्या अंतर्गत ‘बॉलीवूड बोट क्रूझ’ ही एक नावीन्यपूर्ण कल्पना या वर्षीपासून रूढ होणार आहे. याशिवाय यंदा ‘गुंडे’ या िहदी चित्रपटाबरोबरच सतीश मोतिलग यांचा एका अनोख्या प्रेमकथेवर आधारलेला ‘प्रियतमा’ आणि नागराज मंजुळेंचा ‘फँड्री’ हे मराठी चित्रपटही प्रदíशत होऊ घातले आहेत.
तेव्हा भारतीय सिनेमा आणि ‘व्ही-डे’ यांच्यातलं हे नातं जसं पूर्वापार चालत आलं आहे, तसंच ते यापुढेही खास राहील यात शंका नाही.

बॉलीवूड बोट क्रूझ
चित्रपटांच्या कथानकापलीकडे जाऊन प्रत्यक्षातही बॉलीवूड आणि या दिवसाचं नातं अतूट आहे. तारे-तारकांच्या या दिवशी रंगणाऱ्या पाटर्य़ा, सोशल नेटवìकग साइट्सवर त्यांची मतं आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा वाचण्यासाठी होणारी घाई, या दिवसाचं निमित्त साधून प्रदíशत केले जाणारे चित्रपट हे सगळंच १४ फेब्रुवारीच्या या गौण दिवसाला खास रूप देताना आढळतं. बॉलीवूड पर्यटनाच्या अंतर्गत ‘बॉलीवूड बोट क्रूझ’ ही एक नावीन्यपूर्ण कल्पना या वर्षीपासून रूढ होणार आहे.