04 July 2020

News Flash

ओपन अप : अभ्यासाचा कंटाळा

मी इ.रू. कळ कम्प्लीट केलं आहे. मला अभ्यास करताना जाणवतं की मी एक-दीड तासच अभ्यास करू शकते. नंतर कंटाळा येतो.

| April 25, 2014 01:07 am

मी B.Sc. IT कम्प्लीट केलं आहे. मला अभ्यास करताना जाणवतं की मी एक-दीड तासच अभ्यास करू शकते. नंतर कंटाळा येतो. अभ्यास करायला तेवढी एनर्जी वाटत नाही. जर जबरदस्ती तास-दीड तासाच्यावर अभ्यास केला तर हेडेक होतं. वीकनेस जाणवतो, झोप येते. याविषयी तुमच्याकडे काही सोल्यूशन असल्यास नक्की सांगा.
– प्रियाली

हाय प्रियाली, तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. मला खरं तर गंमत वाटली की तू आत्ता हा प्रश्न विचारतेयस. पण आय अॅम शुअर की तू हा प्रश्न तुझ्या पुढच्या अभ्यासासाठी विचारला आहेस. शिवाय, या सगळ्या इश्यूसकट तू तुझा कोर्स सक्सेसफुली पूर्ण केलास त्याबद्दल तुझं अभिनंदन.
खरं तर अभ्यास कसा करावा या विषयावर अनेक पुस्तकं, इंटरनेट साइट्स उपलब्ध आहेत. अनेकजण याविषयीचे क्लासेसही घेतात. एवढय़ा सगळ्या भडीमारानंतर असं वाटतं की सगळ्यांना एकदम क्लिअर झालं असेल अभ्यासाचं टेक्निक. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे अभ्यासाचा कोणताही शुअरशॉट फॉम्र्युला नाही. प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी, क्षमता वेगळी, परिस्थिती वेगळी. एकाला जे पटेल, जमेल ते दुसऱ्याच्या पचनी पडेलच असं नाही. तरीही अभ्यास म्हटलं की काही बेसिक नियम पाळायला लागतात. आपल्या पद्धतीचा आणि मर्यादांचा मागोवा घ्यावा लागतो. एकूण पोर्शन, उपलब्ध असलेला वेळ यांची सांगड घालावी लागते. त्याप्रमाणे काही एक टाइमटेबल आखावं लागतं. मला अभ्यास आवडत नाही, मला तो जमतच नाही अशी नकारात्मक विधानं अर्थातच काउंटरप्रॉडक्टिव्ह ठरतात.
दुसऱ्या कुणाचातरी फॉम्र्युला यशस्वी ठरला म्हणून ब्लाइंडली आपणही तोच वापरायला जावं असं नाही. आपल्याबाबतीत तो फसू शकतो.
तू उल्लेख केलायस की जास्त वेळ अभ्यास केला की तुला वीकनेस जाणवतो आणि डोकं दुखतं. एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की काही आजार रुल आउट करायला हवेत. हिमोग्लोबिन कमी असणं ही आपल्याकडच्या तरुूण स्त्रियांमधली एक खूप कॉमन आणि खूप गंभीर समस्या आहे. डाएटविषयीचे गैरसमज, अपुरा आहार, होस्टेलवर राहणं, निकस खाणं, जंक फूड यांच्यामुळं मुळात कमी लोह शरीरात जातं. शिवाय पिरियडच्या वेळी जास्त रक्तस्राव होणं, अशा काही गोष्टींमुळे अंगातून रक्ताचा लॉस होतो. अंगातलं लोह कमी होण्यामुळे चिडचिड, विसराळूपणा, कमी कॉन्सन्ट्रेशन, थकवा आणि अति झोपाळूपणा अशी लक्षणं दिसू शकतात. दुसरा बऱ्याचदा सापडणारा आजार म्हणजे थायरॉइडची कमतरता. यातही लक्ष न लागणे, झोपाळूपणा ही लक्षणं दिसतात. तुझे डोळे एकदा तपासून घे. डोळ्याला नंबर असेल तर काही वेळापुरते डोळे अॅडजस्ट करतात, पण हळूहळू थकतात आणि मग पुढे कन्टिन्यू करणं अशक्य होतं. या सगळ्यासाठी एक डॉक्टरकडे व्हिजिट करायला हवी तुला.
आपण आधी म्हटल्याप्रमाणे तुझी अशी अभ्यासाची एक मेथड तुला तयार करायला लागेल. सलग अभ्यास करायला जमत नसेल, तर मधे-मधे ब्रेक घ्यायला हरकत नाही. तुझा दिवसाचा ठरवलेला पोर्शन कव्हर झाला म्हणजे झालं. ज्या कुठल्या वेळेत तुझं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं त्या वेळेला अवघड भाग करायला घे. म्हणजे काहीजण रात्री जागून अधिक चांगला अभ्यास करू शकतात तर काहीजण पहाटे. पुरेशी झोप, व्यायाम, मनाला रिलॅक्स करणारे काही छंद हेही इफेक्टिव्ह अभ्यासासाठी आवश्यक. अभ्यासासाठी जी शिस्त तू स्वत:ला लावशील, ती तुला तुझ्या रोजच्या रूटीनमध्येही उपयोगी पडेल.
success consists of a series of little daily efforts.

विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com  या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2014 1:07 am

Web Title: boring study
टॅग Study
Next Stories
1 खाबुगिरी : भेजा खुश!!
2 खावे त्यांच्या देशा : इजिप्शियन खाना (इजिप्त १)
3 स्लॅम बुक : श्रुती मराठे
Just Now!
X