05 July 2020

News Flash

सजले रे क्षण माझे

सणांचा हँगओवर उतरतो ना उतरतो तोवरच अनेक घरांमध्ये तयारी सुरू होते ती लग्नसराईची.

‘ब्रायडल मेकअप’ इतका इफेक्टिव्ह हवा की, नवरीनं उपस्थितांची मनं बघताक्षणीच जिंकली पाहिजेत.. असं हल्ली म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीत विविध पर्याय असणाऱ्या आजच्या लाइफस्टाइलमध्ये ब्रायडल मेकअपमध्येही अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. सेलेब्रिटी मेक-अप आर्टिस्ट विनोद सरोदे आणि इतर नामवंत मेक-अप एक्सपर्ट्सशी बोलून सजवलेले क्षण..

सणांचा हँगओवर उतरतो ना उतरतो तोवरच अनेक घरांमध्ये तयारी सुरू होते ती लग्नसराईची. ताई, दादा, मित्रमत्रिणी, नातेवाईक असं कोणाचं ना कोणाचं लग्न आमंत्रणासह आपल्या दाराशी येऊन ठेपलेलं असतं. आणि ज्या घरात लग्न असतं तिथला माहौलही एखाद्या पिक्चरच्या सेटपेक्षा वेगळा नसतो. सिनेमाप्रमाणेच लग्नाच्या या सेटवरची हिरॉइन म्हणजे नवरी मुलीचे नवनवीन मनसुबे, मेकअप, कपडे हा सारा हवाहवासा नखरा हमखास पाहायला मिळतोच. त्यातही ‘हम जिते है एक बार.. मरते है एक बार.. प्यार का छोडमे, पर शादी भी होती है एक बार’ असा ठसकेबाज अॅटिटय़ुड ठेवत लग्नाची पायरी चढायला सज्ज असलेल्या अनेकजणी कपडय़ांपासून ते मेकअपपर्यंत आणि थीमपासून अगदी फोटोशूटपर्यंत कशाचीही कसर बाकी ठेवत नाहीत.
लग्नसमारंभात सर्वात महत्त्वाचा भाग, ज्यावर जवळपास साऱ्यांच्याच नजरा खिळलेल्या असतात तो म्हणजे नवरीचा मेकअप. काही ठिकाणी हे ‘ब्रायडल मेकअप’ इतका इफेक्टिव्ह होतो की, ‘ती आली.. तिनं पाहिलं.. तिनं जिंकलं..’ असं म्हणावं लागतं. प्रत्येक गोष्टीत विविध पर्याय असणाऱ्या आजच्या लाइफस्टाइलमध्ये ब्रायडल मेकअपमध्येही अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. वेिडग लोकेशन, लग्न किंवा रिसेप्शनची वेळ, पाहुणे मंडळी, कपडय़ांचा रंग अशा बाबी लक्षात घेत ट्रॅडिशनल, ग्लॅमरस, स्टेज मेकअप आणि अजूनही काही वेगळे मेकअपचे प्रकार सध्या ट्रेंिडग आहेत. ब्रायडल मेकअपमधले लेटेस्ट ट्रेण्ड जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट विनोद सरोदे यांच्याशी संपर्क साधला. ब्रायडल मेकअपच्या विविध प्रकारांना पाहता नवनवे ट्रेंड येतच असतात. पण हिवाळी आणि कोरडय़ा दिवसांच्या वातावरणाकडे पाहता ‘सफारी ब्रायडल मेकअप’ हा जास्त ट्रेंिडग आहे, असं विनोद म्हणाले. बदलतं हवामानही मेकअपवर परिणाम करू शकतं, कधी कधी कोरडय़ा हवेमुळे मेकअपही ड्राय वाटू लागतो. मेकअपला तडे जाऊन (क्रॅकिंग) अगदी वाईट स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे सगळा गेट-अप बिघडतो.
मेकअप ठरवताना लग्न सकाळ-दुपारच्या वेळेत आहे की, संध्याकाळच्या वेळेतील याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. ब्रायडल मेकअपमध्ये गोरा आणि सावळा वर्ण यांत जास्त फरक केला जात नाही. कारण दोन्ही वर्ण तितकेच सुंदर आहेत आणि ते आहे तसेच खुलवता येतात. प्रत्येक वर्णाचं स्वत:चं असं वेगळं सौंदर्य आहे. त्यामुळे वर्णाची नसíगकता राखत कार्यक्रमानुसार मेकअप करावा, असा सल्ला सरोदे यांनी दिला आहे. मेकअपबाबत विशेष बाब म्हणजे जर स्किन ड्राय असेल तर आवर्जून मॉईश्चरायझर कण्टेंट असणारा मेकअप वापरावा. मेकअपमध्ये भडकपणा शक्यतो टाळावा. नवरा मुलगा आणि नवरी एकमेकांना शोभून दिसतील, असा मेकअप असावा.
ओरिफ्लेमच्या ब्युटी एक्सपर्ट आकृती कोचर यांनी ब्रायडल मेक-अप ट्रेण्ड उलगडताना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्या म्हणाल्या, ‘भारतीय मुलींचं सौंदर्य डोळ्यात असतं. त्यामुळे नवऱ्या मुलीचे डोळे सुरेख सजवले पाहिजेत. आयमेक-अप म्हणूनच महत्त्वाचा. गोरं दिसावं या अट्टाहासापायी स्किनटोनपेक्षा लाइट शेडचं फाउंडेशन निवडणं चुकीचं आहे. यामुळे मेक-अपमध्ये कृत्रिमपणा येतो. त्यापेक्षा तुमचा वर्ण आहे तसाच खुलवण्यासाठी मेक-अपचा वापर केला पाहिजे. त्वचेवर तजेला दिसावा यासाठी मेक-अप केला तर त्वचा आपोआप उजळते. लिपकलरची खूप डार्क शेड निवडू नका. त्यामुळे चेहरा उतरलेला दिसतो. अगदी सारख्या शेडच्या लिप लायनरनेच आउटलाईन काढा. लिपलायनर लिपस्टिकपेक्षा डार्क शेडचं नको. गालांवर रंग लावताना फार रंगांचा प्रयोग नको. अशाने तुम्ही तुमच्या लग्नात नैसर्गिक सौंदर्य हरवून बसाल. डोळे छोटे असतील आणि खोबणीत खोलवर असतील तर फार गडद रंगाच्या आयश्ॉडोज वापरायचं टाळा. शिमर बेस्ड श्ॉडोज वापरल्याने डोळ्याचा मेक-अप उठून दिसेल आणि चेहरा चमकेल.’
नवरी म्हणून उठून दिसावं अशी प्रत्येकीची अपेक्षा असते. म्हणूनच मेकअप अधिक उठावदार (म्हणजे भडक नव्हे) बनवण्यासाठी लिपस्टिक्सच्या ब्राइट शेडचा वापर करावा. डोळ्यांचा मेकअप सर्वात आकर्षक असावा. आयलायनर, आयश्ॉडो, मस्करा अगदी अचूक पद्धतीने लावला तर हे साधता येईल. मेकअप हा लग्नबंबाळ मुलींच्या जरा जास्तच जवळचा विषय असला तरीही त्याआधी कॉस्मेटिक्समुळे चेहऱ्यावर होणारी ‘अॅलर्जी’ हा अनेकींचा चिंतेचा विषय असतो. स्किन डॅमेज टाळण्यासाठी आधी स्किन हेल्दी असली पाहिजे. त्यासाठी त्वचेसाठी महत्त्वाचे असणारे व्हिटामिन्स ‘ई’ आणि ‘ए’ची कमतरता अन्नाद्वारे भरून काढावी, असा सल्ला विनोद सरोदे यांनी दिला. कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्स निवडताना त्यातील घटकद्रव्य आवर्जून तपासावीत. लिस्टमधील कुठल्याही घटकाची ‘अॅलर्जी’ तर होत नाही ना या गोष्टींची आधीच शहानिशा केलेली बरी. मेकअप प्रॉडक्ट्सचे सर्टफिाइड ब्रँडच वापरावेत आणि सौंदर्यप्रसाधनांची एक्सपायरी डेटसुद्धा बघून घ्यावी.
मेकअप हा एका तरबेज मेकअप आर्टस्टिशिवाय नेहमीच अपूर्ण असतो. त्यामुळे मेकअप आर्टस्टिची निवड करणं हीदेखील एक परीक्षाच असते. मेकअप करणं हे जरी त्या व्यक्तीचं मुख्य काम असलं तरीही मेकअप आर्टस्टिला कपडे, हेअरस्टाईल, कलर कॉम्बिनेशन, मेहंदी, ज्वेलरी असे बारकावेही तितक्याच कसबीनं हाताळता आले पाहिजेत. अशा मेकअप आर्टस्टिला सल्ले न देता आपल्या अपेक्षा सांगाव्यात. त्यांना आपली कला दाखवण्याची मुभा द्यावी, असंही विनोद सरोदे म्हणाले.

नवरीच्या चेहऱ्याचा सर्वात सुंदर भाग मेक-अपमध्ये हायलाइट करावा. भारतीय स्त्रीचे डोळे बोलके असतात. ते मेकअपने खुलवायला हवे.
– आकृती कोचर

हेअर स्टाइलही महत्त्वाची
मेकअप केंद्रस्थानी असतानाच हेअर स्टाइलही महत्त्वाची असते. त्यावर वापरण्यात येणाऱ्या अॅक्सेसरीज किंवा हेडगीअरही काळजीपूर्वक आणि मेकअप, कपडय़ांना शोभणारे असावेत. सध्या ‘म्हाळसा’च्या वेणीवर ज्याप्रमाणे सोनेरी मुद्रांचा पट्टा असतो तसाच पट्टा अनेक नवऱ्या मुलींना खुणावत आहे. अनेकींच्या केसांवर हा पट्टा दिसतो. त्यासोबतच पारंपरिक खोपा, ब्रोच, पेशवेकालिन डिझाइन्सची काही हेडगीअर्सही लग्नबाजारात पाहायला मिळत आहेत. मेकअपला साजेसा आणि कॅरी करता येईल अशाच हेड गीअर्सचं सिलेक्शन करायला हवं.

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:17 am

Web Title: bride makeup should be attractive
Next Stories
1 ‘कांदेपोह्य़ां’चा बदलता ट्रेंड
2 आठवणींचा अल्बम
3 ‘बँड-बाजा-वराती’च्या पलीकडे
Just Now!
X