25 November 2020

News Flash

कळी

एक कळी उमलणारी.. आयुष्य फुलवणारी.. अस्फुटशी अलवारशी

| March 8, 2013 01:03 am

एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
अस्फुटशी
अलवारशी
उमलणारेत पाकळ्या
स्वप्नांच्या साखळ्या
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
चंचल
मनचल
कोषातली
गोफातली
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
इवलंसं देठ
वाऱ्याशी भेट
स्पर्शाची थरथर
नावीन्याचा बहर
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
स्वत:त रमणारी
मायेत जगणारी
मारते मध्येच तान
कधी वास्तवाचं भान
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
उमलू द्या पूर्ण तिला
नको वाईटाच्या सावल्या
अवेळी नका खुडू
अजाण आहे लेकरू
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..
येऊ दे स्वत्वाची जाण
जाणवू दे स्वातंत्र्याचा प्राण
वेलीशी पुन्हा जुळो नाळ
बहराची प्रसन्न सकाळ
एक कळी उमलणारी..
आयुष्य फुलवणारी..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2013 1:03 am

Web Title: bud poem on girl child
टॅग Girls,Ladies,Poem
Next Stories
1 व्हिवा दिवा : वृषाली हटाळकर
2 क्लिक : ऋृषल केणी
3 कलाकाराला दाद हवीच!
Just Now!
X