कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दरवर्षी हॉलिवूडचं तारकादळ अवतरत असतं. यावेळी ६७ व्या कान फेस्टिव्हलला हजेरी लावणाऱ्या आपल्या ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, फ्रिदा पिंटो आणि मल्लिका शेरावत यांनी गेल्या वर्षीपेक्षा लक्षवेधी पोषाख केले होते. मल्लिकानं डिझायनर ‘एमिलिओ पुच्ची’चा निळ्या रंगाचा गाऊन घालून आत्तापर्यंतचा तिचा सर्वात चांगला लुक असला तरी हा गाऊन कानच्या रेड कार्पेटवर साजेलसा होता का यावर चर्चा झालीच. फ्रिदा पिंटोने डिझाईनर ‘मिशेल कोर’चा कुटूर न्यूड शेडमधील फ्रिंज्ड गाऊन छान कॅरी केला. सोनम कपूरने डिझाइनर ‘एली साब’चा काळ्या रंगाचा गाऊन आणि फाक्स बॉब हेअर स्टाईल आदल्या दिवशी मिरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती देसी लूकमध्ये अवतरली. अनामिका खन्नाची पारदर्शी स्टीच्ड साडी आणि गळ्यात आईचा हेवी नेकपीस असल्याने तिनं कानात काहीच घातलं नाही. केसही साध्या पद्धतीनं मोकळे सोडलेले होते. न्यूड शेडमधला मेक-अप असल्यानं तिचा लूक बॅलन्स्ड आणि एलिगंट वाटत होता.