ख्रिसमस आणि केक हे कॉम्बिनेशन दिवाळी आणि फराळाइतकंच ‘मस्ट’ असतं. काही मित्र- मैत्रिणींनी सांगितलेल्या त्यांच्या आवडीच्या  ख्रिसमस केकच्या आठवणीतल्या गोष्टी; त्यांनी शेअर केलेल्या सोप्या रेसिपीजसह.

डिसेंबर महिना उजाडतानाच जिंगल बेलची धून वाजायला सुरुवात झाल्येय. फुल मंथ सेलिब्रेशन टाइम.. अगदी खरंय. ख्रिसमसची तयारी अगदी महिनाभर आधीपासून सुरू होते. आपल्या दिवाळीची तयारी, ढीगभर खरेदी नि सेलिब्रेशनचाच सेम टू सेम माहोल या वेळी असतो. अगदी घराच्या साफसफाई, रंगरंगोटीपासून ते लाइटिंग-चांदणी लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या जातात.
  ख्रिसमस ट्री, सॅण्टा इत्यादींचा वापर करून बर्फाचा आभास असलेली सजावट केकवर करतात. ब्लॅक फॉरेस्ट, रिच चॉकलेट, चॉकलेट लॉग, सेलिब्रेशन चोको चेरी, मिक्स फ्रूट, न्यू इयर चॉकलेट असे विविध केक बाजारात आले आहेत. 0 अलीकडं केक मिक्सिंग हा मोठाल्या हॉटेल्समधला मोठा सोहळाच असतो. या सोहळ्यात हॉटेल्सच्या किचन्समधल्या मोठय़ा ट्रेजमध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करतात. नाताळच्या महिनाभर आधीच या सोहळ्याचं आयोजन केलं जातं. सेलिब्रिटीज, लहान मुलं, आजारी मुलं, कॅन्सर पेशंट्स वगरेंना सहभागी करून घेतात. मोठय़ा कंटेनरमध्ये मनुका, ड्रायफ्रूट घालून त्यात ब्रॅण्डी आणि रम मिक्स करतात. त्यात वेलची, दालचिनी, जायफळ, सुंठीचा वापर करतात. संत्रं किंवा लिंबाच्या सालींचा वापर करतात. हे मिश्रण परफेक्टली ब्लेण्ड होण्यासाठी त्याचं मॅरिनेशन चांगलं व्हावं लागतं. त्यामुळं नाताळच्या आदल्या दिवशी केक बनवेपर्यंत रोज या मिश्रणात रम, ब्रॅण्डी मिक्स करतात.
आपल्या दिवाळीच्या फराळासारखेच अनेक चविष्ट पदार्थ अनेक जण घरीच करतात. मार्था डिसुझा सांगते की, ‘‘वर्षभर केक खाल्ले तरीही ख्रिसमस स्पेशल प्लम केक खायची मज्जा काही औरच असते. थोडीशी रम, फळं, चिक्कार ड्रायफ्रूट्स, लिंबाच्या सालीचा थोडासा कडवटपणा असणारा हा टेस्टी केक एकदम टेम्टी लागतो. हा केक डार्क-फेंट कोरडा-ओलसर असा वेगवेगळ्या पद्धतीचा केला जातो. त्यात मनुका, चेरी, आक्रोड, काजू आणि मॅरिनेट करण्यासाठी रम, ब्रॅण्डी, शेरीचा वापर केला जातो. त्याखेरीज आपल्यासारख्या करंज्या, कुकीज, वेगवेगळ्या प्रकार नि आकाराची चॉकलेट्स केली जातात. ख्रिसमस लंचच्या वेळी पुलाव, चिकन, मटण वगरे स्पेशल डिशेस असतात. ‘‘अर्थात हल्ली वेळेच्या गणिताच्या बेरजा-वजाबाक्या करताना काही जण रेडीमेड पदार्थाकडे वळलेत. त्यानुसार सिटी बेकरी, ओव्हन फ्रेश, बर्डीज किंवा इतर लोकल बेकरीजमध्ये ख्रिसमससाठीचा खासा सेलिब्रेशन केक तयार केला जातो.
शेरॉन एलरॉय डायस सांगते की, ‘‘आम्ही ख्रिसमसाठी ढेरसारे पदार्थ करतो. नानकटाईसारख्या स्नो बॉल्सवर चेरी लावलेली असते नि ते थोडे छोटे नि गोलाकार असतात. त्यात मदा नि क्रिस्टलाइझ्ड चेरी वापरतात. मार्झीपॅन अंडय़ातला पांढरा बलक नि काजू वापरून ते आकर्षक शेपमध्ये तयार केले जातात. कलकल हे मदा, तूप, साखर नि अंडय़ाच्या मिलाफानं तयार होतं. हे लंबगोलाकार नि पातळ कलकल तयार झाल्यावर साखरेत घोळवतात. जिलेटिन, साखर नि आवडीनुसार खायचा रंग वापरून केलेली जगअप्स बच्चे कंपनीची लाडकी डिश आहे. ख्रिसमस केक हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. या रिच ख्रिसमस प्लम केकमध्ये मदा, अंडे, साखर, बटर, बेदाणे, रम, िलबाची साल, अक्रोड नि क्रिस्टलाइज्ड चेरीचा सढळ हातानं वापर होतो. ख्रिसमस लंचच्या वेळी पोर्क विन्दालू, चिकन फ्राय, मटण ग्रेव्ही हे पदार्थ आवर्जून करण्यात येतात.
मंगलोरमधल्या ख्रिश्चन सेक्टर्समध्ये ख्रिसमस मोठय़ा थाटामाटात नि जोरशोरसे साजरा केला जातो. अमित पाटील सांगतो की, ‘‘तांदूळ हे दक्षिण भारतातलं मुख्य उत्पादन. साहजिकच मंगलोरसारख्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या पक्वान्नांमध्ये नि पदार्थामध्ये तांदुळाचा सढळ हातानं वापर केला जातो. उदाहरणार्थ – पोणसाचो पातळ्यो, इडियो, सांना, पोर्तापोळे, पोणसाचे गरियो. त्याशिवाय इथल्या स्थानिक संस्कृती नि परंपरांचं प्रतििबब ख्रिसमससाठी म्हणून करण्यात येणाऱ्या काही खास पदार्थात पडतंच. फ्रूट केक, चविष्ट प्लम केक, नट्स नि ब्रॅण्डीचा वापर करून तयार करतात. वाझ बेकरीचा फ्रूट केक अतिशय प्रसिद्ध आहे. ख्रिसमसदरम्यान केल्या जाणाऱ्या या पदार्थातली सर्वात भारी लागतात ते लाडू.. उकडय़ा तांदूळ, नारळाचं तेल नि नारळाच्या चवाचा वापर करून केलेले हे लाडू वळता वळता त्याचा येणारा खमंग वास नि ते खावेसे वाटल्यानं त्याकडे वळणारे हात..’ हीच तर या ख्रिसमसची खरी गंमत आहे.. सो लेट्स सेलिब्रेट.. विश यू मेरी ख्रिसमस..
    
स्पंज केक
vv07साहित्य : अर्धा किलो मदा, अर्धा किलो साखर, अर्धा किलो अमूल बटर, एक डझन अंडी, चवीनुसार व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर, ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे.
कृती : साखर, बटर मिक्स करून घेऊन त्यात अंडय़ाचा बलक व्यवस्थित फेटून घ्या. त्यात थोडा थोडा मदा घाला नि नीट मिक्स करून घ्या. या मिश्रणात चवीनुसार व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे घाला. ओव्हनमध्ये ४५  मिनिटं बेक करून घ्या. गरमागरम सव्‍‌र्ह करा.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

कोकोनट केक
vv08साहित्य : २०० ग्रॅम रवा, १०० ग्रॅम बटर, २०० ग्रॅम नारळाचा चव, १ वाटी दूध, १ वाटी साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, ६ अंडी, १ चमचा इसेन्स.  
कृती : एक वाटी दुधात एक वाटी साखर विरघळवा. त्यात रवा, बटर, नारळाचा चव मिक्स करा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात फेटलेली ६ अंडी, बेकिंग पावडर नि इसेन्स घाला. ४५ मिनिटं बेक करा.