08 July 2020

News Flash

सेलेब्रिटी फॅशन गॅलरी : सेलेब्रिटी फॅशन गॅलरी

सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा

| May 29, 2015 01:03 am

vv36सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून…
स्टाइल आणि फॅशनच्या बाबतीत बॉलीवूडचे नायकही नायिकांच्या तोडीस तोड आहेत आणि हे त्यांनी कायम सिद्ध केलंय. ड्रेसिंग फॉर्मल असो किंवा कॅज्युअल त्यांनी यात कौशल्य मिळवलंय. स्टाइलच्या बाबतीत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असलेल्या दोन नायकांच्या स्टाइल्सवर नजर टाकू या.

vv39इम्रान हाशमी
‘ब्लू ऑन ब्लू’ हे कॉम्बिनेशन सर्वानाच योग्य रीतीने साधता येतंच असं नाही. पण इम्रानने हे लीलया साधलं आहे. वॉश आऊट डेनिम आणि फिटेड शर्टसोबत ब्राऊन बेल्टइतकाच साधा लुक असूनही त्याने ज्या सहजतेने तो कॅरी केलाय, त्यात तो भाव खाऊन जातो.

रणबीर कपूर vv38
रणबीरच्या स्टाइलमध्ये उणीव काढणं अशक्यप्राय गोष्ट आहे. इथंही त्याचं फॉर्मल ड्रेसिंग अजिबात चुकलेलं नाही. ब्लॅक सूट आणि ग्रे शर्टसोबत मोठय़ा फ्रेमचा चष्मा त्याच्या लुकमधील गंभीरपणा स्पष्ट करत आहे. सोबत मोठय़ा डायलचं घडय़ाळ आणि ब्लॅक शूज लुक पूर्ण करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2015 1:03 am

Web Title: celebrities and their fashion
टॅग Celebrities,Fashion
Next Stories
1 व्हिवा दिवा : उषा शिंगणे
2 क्लिक
3 लिहिते व्हा..
Just Now!
X