News Flash

सेलेब्रिटी फॅशन गॅलरी

सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप..

| January 2, 2015 01:04 am

 vv30सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप.. या सगळ्यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा फॅशन गॅलरीमधून..
प्रियांका चोप्रा म्हटलं की, फॅशन परफेक्ट असणं साहजिकच असतं. गेल्या आठवडय़ात एका अ‍ॅवॉर्ड फंक्शनला हजेरी लावतानाही तिने आपला पिक्चर परफेक्ट लुक कायम ठेवला आहे. ‘ब्लॅक गाऊन विथ झिप डिटेलिंग’ असलेला हा गाऊन तिच्यातील vv31कातिलाना अंदाज अजूनच ठळक करतो आहे. शिअर फॅब्रिकचा वापर नेकलाइनसाठी केलेला वापर, बोल्ड साइड कट यामुळे गाऊनचे सेक्स अपील अजूनच वाढले आहे. हा गाऊन तिची ‘जंगली बिल्ली’ ही ओळख अधिकच अधोरेखित करतो आहे.

कित्येकदा सोनाक्षी सिन्हा ‘काय घालू नये’ याची शिकवण देण्यासाठीच अशा प्रकारचं ड्रेसिंग करते का, असा प्रश्न पडावा इतके वाईट कपडे घालताना दिसते. आता याच गाऊनचं पाहा ना..न्यूड शेडच्या गाऊनला ब्लॅक लेस डिटेलिंग केलेला हा ड्रेस. नक्की काय शेप आहे हेच कळत नाहीय. सोनाक्षीचे खांदे रुंद आहेत त्यात तिने फुल स्लीव्ह गाऊन घातला आहे, त्यामुळे ती अजूनच जाड दिसते आहे. गाऊनच्या साइडला असलेले एक्स्ट्राचे ब्लॅक फॅब्रिकचे नेमके प्रयोजन कळायला मार्ग नाही.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:04 am

Web Title: celebrities fashion gallery 2
Next Stories
1 शब्दसखा! – ‘रेस्तराँ’ची सफर
2 शेफनामा- रंगतदार
3 क्लिक –
Just Now!
X