05 July 2020

News Flash

सेलेब्रिटी फॅशन गॅलरी

सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी

| March 20, 2015 01:15 am

vn30
vn10सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप,
यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडच्या सुपर मॉम्सनी फॅशन जगताचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यातीलच दोन सुपर मॉम्स करिश्मा कपूर आणि शिल्पा शेट्टी आजच्या फॅशन गॅलरीतून..

ओव्हरसाइज शर्ट्स घालायला कित्येक जणी घाबरतात. पण करिश्माने आत्मविश्वासानं हा पेहराव मिरवला आहे. व्हाइट शर्टवर लाल आणि राखाडी रंगाचे फ्लोरल प्रिंट्स स्मार्ट आहेत, पण सोबत ब्लॅक स्ट्रेट पँट मस्त कॉर्पोरेट लुक देत आहे. एखाद्या ऑफिस मीटिंगसाठी हा लुक साजेसा आहे. सोबत ब्राइट रेड लिपस्टिक आणि ब्लॅक क्लच लुकला बॅलन्स करताहेत.

शिल्पा शेट्टी तिच्या स्टाइलिंमध्ये कधीच चुकत नाही. इथेही ती फॅशन टेस्टमध्ये पास झाली आहे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फिटेड वन पीस ड्रेसमध्ये ती मस्तच दिसतेय. सोबत ब्लॅक हिल्स आणि स्टेटमेंट अंगठी लुक पूर्ण करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2015 1:15 am

Web Title: celebrity fashion gallery 4
Next Stories
1 क्लिक : सचिन बलगम, कळवा
2 व्हिवा दिवा : श्रद्धा वाकचौरे
3 सेलेब्रिटी फॅशन गॅलरी
Just Now!
X