News Flash

फेस्टिव्ह रेड

सध्या कुर्ता विथ स्ट्रेट सलवार किंवा पलाझोचा ट्रेंड बराच गाजतो आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने

सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; सेलेब्रिटींची फॅशन लगेच फॉलो केली जाते. पण चंदेरी पडद्यावरचं आणि पडद्यावर दिसणाऱ्या सेलेब्रिटींचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

सध्या कुर्ता विथ स्ट्रेट सलवार किंवा पलाझोचा ट्रेंड बराच गाजतो आहे. हा लुक सुटसुटीत, आरामदायी असतोच, पण तितकाच स्टायलिशही आहे. त्यामुळे सध्या बराच चर्चेत आहे; पण हा लुक कॅरी करणं तितकंसं सोपंही नाही. स्ट्रेट फिटची काहीशी ढगाळ कुर्ती आणि सोबत ही घोळदार पँट घातल्यावर थोडंसं जाड दिसायची भीती असते. आपली उंची या पेहरावात कमी वाटू शकते. त्यामुळे ड्रेसचा रंग, प्रिंट काळजीपूर्वक निवडायची गरज असते. पुन्हा करेक्ट कॉम्बिनेशन हा या लुकचा मास्टर स्ट्रोक आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने या सगळ्याची पुरेपूर काळजी घेत हे आव्हान लीलया पार पाडलं आहे. लालचुटूक रंगाचा कुर्ता, त्याच्या नेकलाइनवर सेल्फ कलरने थ्रेडवर्क एम्ब्रॉयडरी, लाल आणि नारंगी भौमितिक प्रिंटची पलाझो आणि लाल रंगाचा दुपट्टा तिने उत्तमरीत्या कॅरी केला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू कुमारनं डिझाईन केलेला हा कुर्ता आणि पलाझो आहे. कुठलाही भपकेदारपणा टाळूनही एम्ब्रॉयडरीची रॉयल नजाकत या डिझाईनमध्ये दिसतेय. फेस्टिव्ह सीझनसाठी हे सिम्पल तरीही एलेगंट कॉम्बिनेशन ठरेल. सेम कलर कॉम्बिनेशन असूनही डिझाईनला अचूक न्याय मिळतोय. सोनाक्षीनं या ड्रेसच्या जोडीला पिंक लिपकलर वापरून आणखी हुशारी दाखवली आहे. काजळाने डोळ्यांना आणलेला उठाव आणि स्ट्रेट केस असा एकूण दिमाख जुळून आला आहे. त्यामुळे तिच्या या फेस्टिव्ह लुकसाठी तिला पैकीच्या पैकी मार्क नक्कीच मिळणार.
कसा कॅरी कराल?
हा लुक कॅरी करणं वाटतंय तितकंही कठीण नाही, पण त्यासाठी तुम्ही काही टिप्स ध्यानात घेतल्या पाहिजेत. सर्वात आधी तुमच्या बॉडी टाइपचा विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पेअर शेप किंवा अ‍ॅपल शेपच्या असाल, तर सोनाक्षीप्रमाणे डार्क रंगाची निवड करा. लाल, नारंगी, हिरवा, मेहंदी, ग्रे, नेव्ही ब्लू हे तुमचे रंग आहेत. त्यामुळे तुम्ही जाड दिसणार नाही. त्यावर त्याच रंगाची किंवा कॉन्ट्रास्ट पलॅझो छान दिसेल. लीन किंवा सडपातळ शरीरयष्टी असल्यास फिकट रंग वापरा. थ्रेड वर्क, बाटिक किंवा लेहरीया प्रिंट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. सोनाक्षीने फेस्टिव्ह लुक असूनही काळं नेलपेंट वापरलं आहे. हा प्रयोग यंदा करून बघायला काहीच हरकत नाही. डोळ्यांसाठी नुसतं काजळसुद्धा एक फ्रेश लुक देऊ शकतं, नेहमी भडक आय मेकअपची गरज नसते. त्यामुळे काजळ मस्ट. कानात छान डूल आणि एक मस्त मोजडी सोबतीला असली तर अजून काय हवंय, सेल्फी रेडी लुक तयार..
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2015 1:03 am

Web Title: celebrity fashions
टॅग : Sonakshi Sinha
Next Stories
1 व्हिवा दिवा : मेघा विश्वास
2 क्लिक – आदित्य दिघे, पुणे
3 सोशल न्यूज डायजेस्ट : शुभेच्छांचा पाऊस
Just Now!
X