|| तेजश्री गायकवाड, सायली घाडगे

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
IIT student to join ISIS
आयआयटीचा विद्यार्थी ISIS च्या संपर्कात? दहशतवादी गटात सामील होण्याआधीच…; आसाम पोलिसांची माहिती
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा

लगीनघाई हा आपल्याकडे तसा मोठा जिव्हाळ्याचा विषय. त्या तयारीत खरं तर न उतरलेलं बरं.. कारण लग्नवार्ता जेव्हा इतरांपर्यंत पोहोचते तेव्हा ती खरी लग्नाची सुरुवात म्हणायला हवी. आणि त्यासाठी आजही आपल्याकडे महत्त्वाची ठरते ती लग्नपत्रिका. सध्या या लग्नपत्रिकांचं स्वरूपही बदलत चाललं असून ते अधिक आकर्षक, पर्यावरणपूरक, कमीत कमी किमतीत अशा वेगवेगळ्या पत्रिकांपासून डिजिटल झालेल्या तरुणाईसाठी खास डिजिटल स्वरूपातही पत्रिका घराघरांत पोहोचत आहेत. लग्नपत्रिकांचं हे बदलतं रूप सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे..

काळ बदलत असला तरी अद्यापही आपल्याकडे लग्नपत्रिकांची छपाई मोठय़ा प्रमाणावर केली जाते. लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही देशभर कायम आहे. त्यामुळे लग्नपत्रिका हवीच मात्र त्यांचं स्वरूप खूप वेगाने बदलतं आहे. त्या त्या जोडप्यांच्या विचारांचा, व्यवसायाचा आणि कल्पकतेचाही परिणाम या पत्रिकांवर दिसून येतो. मुलाची अशीच हटके लग्नपत्रिका छापणारे हेमंत जोशी सांगतात, ‘माझ्या मुलाचं लग्न ठरल्यापासूनच आम्ही लग्नपत्रिका काशी करायची याचा विचार करत होतो. आमचं कुटुंबच कलाप्रिय असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून नवीन पद्धतीने पत्रिका करावी, असा विचार केला. त्यातूनच आम्हाला रुमालावर पत्रिका प्रिंट करायची कल्पना सुचली. आपण पत्रिका तयार करतो तेव्हा त्यावर हमखास कोणत्या तरी देवदेवतांचा फोटो असतो. लग्न झालं की ती पत्रिका कुठेही पडते. त्यावरचे देवाचे फोटो अडगळीत तर कधी अगदी फाडूनही टाकले जातात. त्यामुळे लोकांना पत्रिकेचं पुढे करायचं काय?, असा प्रश्नच पडणार नाही अशा पद्धतीची पर्यावरणपूरक पत्रिका बनवल्याची माहिती त्यांनी दिली. ‘आम्ही तयार करून घेतलेली पत्रिका इको फ्रेंडली तर आहेच, कमी किमतीत आहे. शिवाय, आम्ही रुमालावर स्क्रीन प्रिंट करून पत्रिका केली असल्याने काही वॉशनंतर प्रिंट निघून जाईल आणि लोकांना त्या रुमालाचा वापरही करता येईल,’ असं जोशी यांच्या मुलाने कौस्तुभने सांगितलं. पत्रिकेच्या वाचलेल्या खर्चातून सामाजिक कार्यासाठी निधी देण्याचा निर्धार केलेला कौस्तुभ प्रिंटेड पत्रिका ही आपली परंपरा आहे आणि ती फॉलो झालीच पाहिजे, असं ठाम मत व्यक्त करतो.

ठाण्याचे रतीश जोशी यांनीही मुलीची पत्रिका वेगळ्या पद्धतीने बनवून घेतली. ‘आम्ही सहज आदिवासी कारागिरांचे प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला तिथे लाकडावर कलाकुसर करून वारली चित्र काढलेली ग्रीटिंग्ज बघायला मिळाली. ती ग्रीटिंग्ज मी दिवाळीची भेट म्हणून काहींना दिली. ती लोकांना प्रचंड आवडली. म्हणून मग मुलीची पत्रिकाही अशीच करावी अशी कल्पना सुचली. त्या कारागिराचा त्याच्या पाडय़ावर जाऊन खूप शोध घेतला. अखेरीस त्याला पत्रिका बनवण्यासाठी राजी केलं. त्या कलाकृतीचं काम एवढं बारीक आणि नाजूक होतं की दिवसाला तो आणि त्याची बायको मिळून फक्त तीनच पत्रिका बनवू शकत होते. आम्ही केलेली पत्रिका लोकांना नंतर शो पीस म्हणूनही ठेवता येईल अशी आहे. ही पत्रिका लोकांच्या लक्षात राहावी आणि यानिमित्ताने आमच्याकडून एखाद्याला मदतही मिळावी, हा उद्देश होता. ही पत्रिका पाहून अनेकांनी त्या कारागिराची भेट घेऊन त्याला काम दिलं, याचंही वेगळंच समाधान मिळाल्याचं ते सांगतात.

आपल्या व्यवसायाप्रमाणेच पत्रिका बनवायचाही ट्रेण्ड सध्या आहे. मुलगा किंवा मुलगी शिक्षक असतील तर पुस्तकरूपी किंवा पुस्तकात असतात तशीच वेगवेगळी नावं देत पत्रिका छापल्या जातात. तर एखाद्या कला क्षेत्रातील जोडप्याची पत्रिका ही जास्त रंगीत, कलाकुसर केलेली अशी असते. लखोटा पत्रिकांचा ट्रेण्ड अजूनही कायम आहे. त्याच जोडीने पाणी वाचवा, अन्न वाया घालवू नका, पुष्पगुच्छ आणून फुलांची पर्यायाने निसर्गाची हानी करू नका, असे समाजोपयोही संदेश छापलेल्या पत्रिकाही पाहायला मिळतात.

डिजिटल आवतन!

डिजिटल युगात लग्नपत्रिकाही टेकसॅव्ही झाल्या नसत्या तरच नवल होतं. इंटरनेटवर अनेक फ्री वेबसाइट आहेत, ज्यात लग्नपत्रिकेसाठी वेगवेगळे टेम्प्लेट असतात. त्यावर जाऊन आपल्याला हवं ते डिझाइन निवडून आपला मजकूर त्यावर टाकायचा. झाली आपली डिजिटल पत्रिका तयार. लांबच्या लोकांपासून ते अगदी जवळच्या लोकांनाही आता सोशल मेसेन्जर, सोशल साइटवर ही अशा स्वरूपातली पत्रिका पाठवणं सोपं जातं. कमी वेळात आणि कमी खर्चात आपली लग्नाची पत्रिका पोहोचवायचा हा डिजिटल लग्नपत्रिकांचा बदलता ट्रेण्ड सर्रास वापरला जातो आहे. मात्र याहीपेक्षा भन्नाट डिजिटल पत्रिका प्रतीक ढोले यांनी विकसित केली आहे.

प्रतीक ढोले यांनी लंडनमधील ‘कॉव्हेन्टरी विद्यापीठा’तून अभियांत्रिकीची पदवी घेतली. शाळेत असल्यापासूनच त्यांना यांत्रिक गोष्टींची फार आवड होती. त्यामुळे संगणकातील विविध पैलू त्यांनी वेळीच शिकून घेतले. त्यांच्या या ‘डिजिटल लग्नपत्रिकेत’ नेमकं आहे तरी काय? या लग्नपत्रिकेचं स्वरूप हे शिवाजी महाराजांच्या काळातील एका सुंदर खलित्याप्रमाणे असून त्यावर एक ‘क्यूआर कोड’ आहे. जो कोड आपल्या दैनंदिन वापराचा भाग बनलेल्या मोबाइलद्वारे स्कॅन करायचा. त्यानंतर संकेतस्थाळावर ती पत्रिका तुम्हाला दिसू लागते. लग्नपत्रिकेशिवाय वधू-वरांची आकर्षक छायाचित्रंही आता घरबसल्या पाहता येऊ शकतात. तसंच लग्नासाठी येणाऱ्या अनेकांना विवाहस्थळ पटकन मिळत नाही, त्यामुळे लग्नाला जायला उशीर होतो. तर ही समस्यादेखील आता येणार नाही कारण या डिजिटल लग्नपत्रिकेत विवाहस्थळाचा अचूक पत्ताही पाहायला मिळणार आहे. अनेक वेळा या ना त्या कारणाने  इच्छा असूनही लग्नाला जाता येत नाही. त्यांनाही ते जिथे असतील तिथून लग्नसोहळा अनुभवता यावा यासाठी ‘लाइव्ह स्ट्रीमिंगचा’ पर्यायही प्रतीक उपलब्ध करून देतात. बऱ्याचदा लग्नाला आलेल्या पाहुण्यांना त्यांचे फोटो पाहण्यासाठी लग्नाचा अल्बम येण्याची वाट पाहावी लागायची, परंतु आता याच पत्रिकेच्या वेबसाइटवर त्यांना लग्नातील आपले फोटो हवे त्या वेळी पाहता येऊ  शकतात. प्रीवेडिंग फोटोशूट, प्रेमाच्या आठवणी, गोष्टी, त्याला संगीताची जोड अशा सगळा खजिना तुम्हाला अनुभवण्याचा पर्याय या डिजिटल पत्रिकेने उपलब्ध करून दिला आहे. तसेच लग्नाची आठवण करून देण्यासाठी वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स  तुमच्या मोबाइल फोनवर मिळतील. ज्यामध्ये लग्न सुरू झाल्यापासून जेवणाच्या आमंत्रणापर्यंतची माहिती वेळोवेळी नोटिफिकेशन्सद्वारे मिळेल. या पत्रिका बनवण्यासाठी येणारा खर्च हा सर्वसामान्यांनाही परवडण्यासारखा आहे. शिवाय, आयुष्यभरासाठीचा आनंदाचा ठेवा म्हणून तुम्ही तो डिजिटल माध्यमांतून जपू शकता.