फ्रेण्डस्, तुम्हाला कानोकान आणि सोशल साइट्सच्या पानोपानावरून खबर लागलीच असेल की अभी फेस्टिव्हल्स का राज शुरू होनेवाला हैं. सारी मंडळी आळस झटकून कामाला लागल्येत. धावपळ आहे पण गोंधळ अजिबात नाहीये. सारं काही शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू आहे. या फेस्टिव्हल्समध्ये काय नसतं?  इंडियन ग्रुप साँग, वेस्टर्न ग्रुप साँग, इंडियन सोलो, वेस्टर्नसोलो, फोक ऑर्केस्ट्रा, क्लासिकल डान्स, फोक डान्स, क्रिएिटव्ह डान्स, स्किट, एकांकिका, माईम, मोनोअ‍ॅक्टिंग, मिमिक्री वगैरे वगैरे. तसंच एलोकेशन, डिबेट, स्टोरी रायटिंग, क्विझ, पेंटिंग, पोस्टर मेकिंग, कोलाज, क्ले मॉडेलिंग, रांगोळी आणि किती तरी काय काय या फेस्टमध्ये असतं.
सगळ्या फेस्टिव्हल्समध्ये दर वर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना असतात. प्राचार्य आणि प्राध्यापकांचा पाठिंबा असतो. विद्यार्थ्यांमध्ये एनर्जी आणि टीम स्पिरीट असतं. अनेकदा प्रायोजक मिळवताना अडचणी येतात. कधी मार्केटिंग होत नाही. मुख्य म्हणजे बऱ्याच कॉलेजेसचे फेस्ट एकदम येतात. मात्र या सगळ्यांवर मात करून प्रचंड उत्साहनं कॉलजगोअर्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतात. काही फेस्टिव्हल्सची ही प्रातिनिधिक झलक.
संकलन : राधिका कुंटे

मेट इन्स्टिटय़ूट मेटामॉरफोसिस
आयिडयाची कल्पना.. कसं वाटतं ऐकायला? खरं तर ऐकून हसून सोडून देण्यापेक्षा ही थोडी विचार करण्याजोगीही गोष्ट आहे. हेच लक्षात घेऊन एमईटी इन्स्टिटय़ूट ऑफ मास मीडियातर्फे मेटामॉरफोसिस या फेस्टिव्हलचं आयोजन केलंय. ‘मेटामॉरफोसिस ऑफ मिस्टर आयिडया’ ही त्यांची थीम आहे. एखाद्या कल्पनेचा जन्म होणं, ती साकारणं नि ती पूर्ण होणं असा काहीसा हा प्रवास विविध माध्यमांतून उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कल्पना एक रंग अनेक, सीन क्या हैं, रंगीला रे, अ‍ॅड ट्रिप, फ्लिप फ्लॉप, कॉमेडी कट्टा, चर्चासत्रं आदी भरगच्च इव्हेंट आणि स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमांत पत्रकारिता, जाहिरात आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
* मेटामॉरफोसिस – १२, १३, १४ डिसेंबर.
संपर्क- ०२२- ३९५५४२७१.

रामनारायण रुईया कॉलेज
आरोहण आणि उत्सव
जगाचा अंत होणारेय.. २०१२ला.. अशी चर्चा अधूनमधून ऐकायला येत असते. तसं नक्की होणार का नाही, यावर जाणकार मंडळींचा काथ्याकूट चाललाय. या बहुचिर्चत थीमवर आधारित रु ईया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आरोहण नावाचा फेस्टिवल आयोजित केलाय. बिगिनिंग ऑफ द एंड ही थीम घेऊन त्यांनी ‘आरोहण’चं प्लॅनिंग केलंय. फेस्टिव्हलसाठी १३ टीम्स काम करताहेत. ‘परफॉरमिंग आर्ट’मध्ये शॉर्ट फिल्म, लावणी, फोक, क्लासिकल, वेस्टर्न, बॉलिवूड डान्सची स्पर्धा आहे. ‘हाय व्होल्टेज’ हा बॅण्ड इव्हेंट रॉक बॅण्डची आवड असणाऱ्यांसाठी आणि ‘भयानक मौत’- डेथ मेला याचं सशुल्क आयोजन करण्यात आलंय. ‘फाईन आर्ट’मध्ये फोटोग्राफी, टीशर्ट, अंब्रेला आणि स्लिपर पेंटिंग आणि सेट अपमध्ये सेट डिझाईन इव्हेण्ट होणार आहे. ‘रीडल मी क्रेझी’ ही शब्दज्ञान चांगलं असणाऱ्यांसाठीची स्पर्धा आहे. तर ‘कोरी कथा’मध्ये दिलेल्या थीमवर कथा लिहायचेय. ‘स्पेशल इव्हेंट’मध्ये फ्लाइंग फॉक्स, रॅप्लिंग, सायकलिंग इत्यादी इव्हेंट्स आहेत. नंतर उत्सव हा रु ईयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा फेस्टिव्हल होईल.
आरोहण : २० व २१ डिसेंबर, उत्सव : २२, २३, २४ डिसेंबर
संपर्क : अक्षया नाईक ९८६७१०३४२५.

बिर्ला कॉलेज बिलरेत्सव
यंदा बिर्ला कॉलेजच्या ‘बिर्लोत्सवा’चं ४०वं वर्षं आहे. हा उत्सव यंदा पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात साजरा होतोय. प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाच्या सहकार्यामुळं विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच या उत्सवाचं आयोजन केलंय. प्रत्येक डिपार्टमेंट या ‘बिलरेत्सवा’त सहभागी झालंय. या निमित्तानं ठाणा-कल्याण भागातल्या कॉलेजमध्ये पहिल्यांदाच फ्लॅश मॉब होणार आहे. म्युझिकल बॅण्डद्वारे आणि पारंपरिक वेषात दवंडी पिटूनही या इव्हेंटचं प्रमोशन केलं जाणारेय. ट्रेझर हंट, बाथरूम सिंगिंग आदी स्पर्धा होणार आहेत. मिस्टर अ‍ॅण्ड मिस बिर्ला ही व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध कंगोरे असलेली स्पर्धा घेण्यात येणार आहे.  
बिलरेत्सव – २२, २४ डिसेंबर
संपर्क : ९७६८०७७१२४

सिडनेहॅम कॉलेज मुरंजन फेस्टिव्हल
काय एक्स्प्रेशन आहे रे.. असं एखाद्या कलावंताच्या बाबतीत किंवा अगदी रोजच्या कट्टय़ावरच्या गप्पांमध्येही आपण सहज बोलून जातो. सिडनेहॅम कॉलेज- ‘द ड्रॅमॅटिक्स सोसायटी’च्या ‘मुरंजन फेस्टिव्हल’मध्ये नेमकी ही थीम साकारली जाणार आहे. ही थीम आहे ‘एक्स्प्लोरिंग एक्स्प्रेशन्स’. ही थीम घ्यायचं आणखी एक कारण असं की, सिडनेहॅम कॉलेजचा यंदा शताब्दी महोत्सव सुरू होतोय. त्यानिमित्तानं अर्थातच वर्षभर काही ना काही अँक्टिव्हिटीज चालणार आहेत. त्यांची जणू सुरु वात ‘मुरंजन फेस्टिव्हल’नं होतेय. या निमित्तानं फिल्म रिव्ह्य़ू रायिटंग, लोगो डिझाइन, मायमिंग, स्क्रिप्ट रायटिंग, फोटोग्राफी, फॅशन शो, फोक डान्स आदी स्पर्धाचं आयोजन करण्यात आलंय. ‘सिडनी इव्हेंट’मध्ये रोमँटिक डय़ुएटच्या माध्यमातून प्रेमभावना व्यक्त केली जाणार आहे. ढेर सारी कॅश प्राइझेस देण्यात येणार आहेत.    
मुरंजन – ७ ते १२ डिसेंबर
संपर्क- अमेय मोंडकर : ९८००८६८५८.

आर. के. पोदार कॉलेज
मोनेटा
कॉलेजगोअर्समध्ये आर्थिक सजगता यावी, भवतालाचं भान व्हावं, या दृष्टीनं आर. के. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्सतर्फे ‘मोनेटा’ या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे सेमिनार्स, वर्कशॉप्स आणि स्पर्धाचं आयोजन करण्यात आलंय. इन्व्हेस्टमेंटसारख्या महत्त्वाच्या विषयांवर व्याख्यानं होणार आहेत. रमेश दमाणी, वाय. एम. मालेगाम, धर्मकीर्ती जोशी, डॉ. शुभा राव, दीपक घैसास, चंद्रशेखर टिळक आदी मान्यवरांची मत-मतांतरे या वेळी ऐकता येतील. बुल्लिरंगसारखा मॉक-स्टॉक ट्रेडिंग गेम, कार्बन क्रेडिट कझार हा ग्लोबल वॉर्मिंगशी निगडित टॉपिक, ब्लॅक गोल्ड ही व्हच्र्युअल स्टॉक एक्स्चेंजशी संबंधित स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश या स्पर्धामध्ये करण्यात आलाय.
मोनेटा- ७ ते १० डिसेंबर
संपर्क : कुणाल लागू- ९८३३६९७७६०