style-logoनमस्कार मी दीपाली.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘NIFT’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा. मी मूळची छोटय़ा शहरातून आलेली मुलगी. आता कॉलेजसाठी मुंबईत येतेय. मी आजपर्यंत कधीही वेस्टर्न आऊटफिट्स वापरले नाहीत, परंतु कॉलेजसाठी मला ते वापरण्याची इच्छा आहे. माझ्यासाठी काही पर्याय सुचवा. धन्यवाद!हाय दीपाली,

vv10सर्वप्रथम तुझे अभिनंदन! तुझी मुंबईमध्ये येण्यासाठीची एक्साइटमेंट मी नक्कीच समजू शकतो. तुझ्या कपडय़ांबद्दल बोलायचं झालं तर असे काही बेसिक कपडे असतात, जे प्रत्येक तरुण मुलीकडे असायला हवेत. आमच्या फॅशनच्या भाषेत आम्ही त्याला ‘क्लासिक्स’ म्हणतो. क्लासिक्स म्हणजे असे कपडे जे कोणत्याही सीझनमध्ये, कोणत्याही ऑकेजनला साजेसे असे असतात आणि कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाहीत.

आता मला तुझ्या वजन, उंची, बॉडी टाइप, वर्ण याबद्दल माहिती नाही, परंतु मी तुला अशा चार स्टाइल्स सुचवतो, ज्या कोणत्याही व्यक्तीला साजेशा ठरतात.

१- डार्क वॉश जीन्स -या जीन्स घेताना काळजीपूर्वक निवड कर. जीन्स प्रॉपर फीटिंगची असणं गरजेचं आहे. जीन्स घातल्यावर न लाजता कॉन्फिडेन्टली वावरता आलं पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून उत्तम फिटिंगची जीन्स मिळवण्यासाठी कदाचित तुला दुकानं पालथी घालावी लागतील तरी हरकत नाही, परंतु कुठेही कॉम्प्रमाइज करू नको. अगदीच लो वेस्ट किंवा हाय वेस्ट जीन्स निवडण्याऐवजी मिड वेस्ट जीन्स निवड. स्लिमफिट जीन्स घे, परंतु अगदीच नॅरो बॉटम किंवा अगदीच लूज जीन्स निवडू नको. कलर डार्किश ब्लू विथ मिनिमम फेडिंग असा निवड. कॅज्युअल टॉप, टय़ुनिक, फॉर्मल शर्ट, लखनवी कुर्ती या सगळ्याबरोबर तू ही जीन्स वापरू शकतेस. या जीन्सप्रमाणेच काळ्या रंगाच्या टाइट्ससुद्धा तू विकत घे. या टाइट्ससुद्धा तू वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल कशावरही वापरू शकतेस.

२ – फॉर्मल बेसिक कॉटन शर्ट किंवा लिनन शर्ट – ब्लॅक आणि व्हाइट सिम्पल टॉम्प हे कोणत्याही प्रकारच्या जीन्स, स्कर्ट इत्यादी वर अगदी उठून दिसतात. डे किंवा नाइट ऑकेजन कधीही हे शोभून दिसतात. यावर एखादा नेकपीस किंवा हेवी ईअरिरग्स घालून तू पार्टी लुक मिळवू शकतेस. कॅज्युअल कॉलेज वेअरसाठीसुद्धा एखादा स्कार्फ किवा छानसं घडय़ाळ लावून तू ट्रेण्डी लुक मिळवू शकतेस.

३ – ब्लॅकिश कलरमधील सँडल्स, फ्लॅट्स, क्लोज्ड पप्स असे काही प्रकार तू नक्की वापर. हे फूटवेअर कोणत्याही ऑकेजनसाठी तसेच डे नाइट पार्टीसाठी शोभून दिसतात.

४ – पुन्हा काळसर रंगाकडे झुकणारी प्लेन किवा सिम्पल डेकोरेटिव्ह बॅग तू वापर, ती खूपच उठावदार दिसेल. या सगळ्याबरोबरच तू चेहऱ्याला शोभणारा असा सुंदर ट्रेण्डी हेयर कट करून घे. तू यंग आहेस आणि हेच खरं वय आहे एक्स्परिमेंट करता येतात. त्यामुळे अजिबात घाबरू नको. हॅव फन.

(संकलन : प्राची परांजपे)

अमित दिवेकर