31 May 2020

News Flash

अॅन इंटरनॅशनल ऑव्हरड्राइव्ह

सेलेब्रिटी शेफ वरुण इनामदार यांची ओळख केवळ शेफ म्हणून नाही, तर फूड क्रिटिक, फूड डिझायनर, ट्रेनर आणि ट्रॅव्हलर म्हणूनदेखील आहे.

| August 21, 2015 01:47 am

सेलेब्रिटी शेफ वरुण इनामदार यांची ओळख केवळ शेफ म्हणून नाही, तर फूड क्रिटिक, फूड डिझायनर, ट्रेनर आणि ट्रॅव्हलर म्हणूनदेखील आहे. हिल्टन, ट्रायडंट, ओबेरॉय अशा पंचतारांकित हॉटेल्ससाठी त्यांनी काम केलं आहे. कुवैतच्या शाही परिवाराचे ते ब्रँड मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह शेफ होते. ‘द चॉकलेट फॅक्टरीइक्वेडॉर’चे ते प्रमुख आहेत. अनेक देशीविदेशी फूड कॉलम्समध्ये आणि फूड शोमध्ये त्यांनी भाग घेतला असून व्लादिमीर पुतीन, निकोलस सार्कोझी यांच्यासारखे मोठे नेते आणि अल खलिफा, अल सौद यांच्यासारख्या रॉयल फॅमिलीजना सव्‍‌र्ह करण्याची संधी त्यांना मिळालीय. शेफ वरुण या रॉयल चॉकलेट बुफेची झलक दाखवत आहेत.आपण ‘चॉकलेट’ या मर्यादित अर्थानं विचार करतो. तेव्हा तो फक्त तो त्या चॉकलेटच्या बारबद्दल असतो. पण ‘कोको’बद्दल विचार करायला लागल्यावर कळतं की ‘कोको’ची पोहोच कुठवर पोहोचलेय ते. गेल्या लेखात आपण त्याबद्दल विचार केला होताच. त्यामुळं केवळ चॉकलेटचे प्रकार आणि चॉकलेट तयार करण्याची पारंपरिक पद्धत या चौकटींबाहेर पडून चॉकलेटच्या विश्वात अतिशय वेगळे नि दखल घेण्याजोगे बदल होताहेत. चॉकलेट आर्टस्टि चॉकलेटच्या रेसिपी करताना वेगवेगळे नि नावीन्यपूर्ण प्रयोग करून पाहताहेत. मी स्वत:ही चॉकलेटच्या रेसिपीजचे हट के प्रयोग करून पाहतोय नि आहे त्यातून काही वेगळ्या चांगल्या गोष्टी करता येतील का, याचा माझ्या परीनं शोध घेतोय. कुवेतच्या रॉयल किचनमध्ये काम करतानाचा एक प्रयोग शेअर करतो.
कुवेतच्या राणीसाहेबांच्या रॉयल किचनमध्ये काम करायची संधी २०१३ मध्ये मला मिळाली. राणीसाहेबांनी आपल्या भारतीय शेफच्या अर्थातच माझ्या पाककौशल्याची चुणूक दाखवण्यासाठी हजार पाहुण्यांना मेजवानीसाठी आमंत्रित केलं. विविध देशांच्या राजकुमारी, राजकारणी, जागतिक स्तरावरची नेतेमंडळी आणि इतर अनेक बडय़ाबडय़ा मंडळींचा या पाहुण्यांच्या यादीत समावेश होता. राणीसाहेबांनी मला त्यांच्या राजमहालात बोलावून घेतलं नि मोठय़ा मनानं माझ्या स्वागतासाठी म्हणून योजलेल्या या इव्हेंटबद्दल थोडक्यात सांगितलं. मला आश्चर्य वाटलं, थोडासा धक्का बसला नि जराशी भीतीही वाटली. हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं तेव्हाच ठरवलं.. या पाहुणेमंडळींसाठी तयार करायचा कोको बुफे! त्याहीआधी मी एक काम केलं, प्रत्येक आमंत्रणासोबत एडिबल सोनेरी पानांसह हॅण्डक्राफ्टेड चॉकलेट्स पाठवली. त्यांनी आपलं काम एकदम फत्ते केलं. पाहुणेमंडळींना चॉकलेटचं आकर्षण वाटून ती विचार करत ‘त्या दिवसा’ची आतुरतेनं वाट पाहू लागली.
नेहमीच्या त्याच त्या बेसिक चॉकलेट्स, मूज, सुफले, केक्स नि पेस्ट्रीच्या पलीकडं जाऊन काही तरी वेगळं तयार करायचं, असं मी मनाशी ठरवलं. एका परीनं मी या क्षेत्रातला माझा अनुभवच पणाला लावला नि मग अशी काही पेशकश सादर केली की, त्या ‘चॉकलेटी आठवणी’ अजूनही गल्फमध्ये काढल्या जातात. जवळपास ९५ टक्के कोकोपकी ५३ टक्के कोकोचा वापर कार्डवर केला गेला होता आणि काही नवे ट्रेण्ड्स त्यानिमित्तानं सेट केले गेले. स्प्रेडेबल चॉकलेट कॅरॅमल डिप इन जार्स घानाहून मागवलेल्या चॉकलेटमधील ६५ टक्के चॉकलेट वापरून स्मूथ नि सिल्कन चॉकलेट गॅनाश सॉल्टेड बिस्किटसोबत सव्‍‌र्ह केलं. चॉकलेट ऋल्ल४िी फाँडय़ू एका हॉट स्विस स्टाइल फाँडय़ू पॉटमध्ये ५६ टक्के वितळलेलं ईक्वडोरियन चॉकलेट सव्‍‌र्ह केलं गेलं, ते फॉण्डएच्या फॅन्सी ग्लासमधून नि कुकीज नि क्रॅकर्ससोबत. त्याची सजावट करण्यात आली ती टेबलाच्या मधोमध. तब्बल ८०प्रकारची विदेशी फळं कापून त्यांची आकर्षक रचना केली होती. त्यातली काही तर मी याआधी आयुष्यात कधी पाहिलीही नव्हती. त्यासोबत पहिल्यांदाच थोडेसे तिखटमिठाचे पदार्थही ठेवले होते.
चॉकलेट फाऊंटन : फक्त फाऊंटनसाठी बोलिव्हियातून इम्पोर्ट केलेलं ७२ टक्के डार्क चॉकलेट वापरलं होतं. त्यातल्या ४० प्रकारच्या बोरांच्या, मार्शमालोव्ह्ज कॅण्डी आणि फ्रेंच कॅण्डी आम्हीच तयार केल्या.

िपट्रेड चॉकलेटस् : पाहुणेमंडळी ज्या स्टेटचं प्रतिनिधित्व करतात, त्याचं प्रतीक प्रत्येक चॉलकेटच्या पीसवर होतं. काहींची तर नावंही कोरली होती, जो त्यांच्यासाठीच्या सरप्राइजचाच एक भाग होता. हे सगळे िपट्रस् १०० टक्के व्हेजिटेबल कलर नि कोको बटर वापरून तयार केले होते.

चॉकलेट इंजेक्शन : ‘चॉकलेट इंजेक्शन्स’ या कमाल कॉम्बिनेशननं धमाल उडवली होती. या नावीन्यपूर्ण कल्पनेसाठी मी मादागस्कार, सॉटोमी, व्हेनेझुला आणि कोट द आयव्हरीमधून कोको मागवला होता. त्यात व्हाइट स्ट्रॉबेरीज पाइनबेरीज, गोल्डन रॉसबेरीज, इजिप्शियन आंबे नि आफ्रिकन स्पाइसेस अ‍ॅड केले होते.

परदेशात कन्झुमर्सना नेहमीच्याच पुदिना, िलबू, संत्र्यापेक्षा काही तरी वेगळं हवं असतं. त्यामुळं मग आर्टस्टिनी पोटॅटो चिप्स, भुईमुग, रताळं, घेवडा अशा भाज्यांना कोटिंग करून त्याचा स्नॅक्समध्ये वापर करायला सुरुवात केली. अक्रोड, काजू, हेजलनट अशा नेहमीच्या नट्सपलीकडं जाऊन वेगळ्या पदार्थावर प्रयोग करायला सुरुवात केली. त्यातूनच पाइन नट्स, ब्राझील नट्सचे वेगळे प्रयोग पुढं येऊ लागलेत. भविष्यात फुलांचा वापर चॉकलेट प्रॉडक्ट्समध्ये होऊ शकेल. आताही तो फार क्वचित केला जात असला, तरी त्या अनुषंगानं प्रयोग सुरू असल्यानं पुढं त्याला बराच वाव मिळू शकेल. लवकरच मार्केटमध्ये व्हाइट चॉकलेटची मागणी वाढेल, असा अंदाज असून त्याचसोबत वेगळ्या आणि प्रयोगशील फििलग्ज नि फ्लेव्हिरग्जनाही उठाव मिळेल.

त्या दिवशी’ सगळ्यांना अशाच प्रकारच्या नवलाई वाटणारे चॉकलेट पीसेस सव्‍‌र्ह केले गेले नि मग चोहो बाजूंनी एकच शब्द ऐकू येऊ लागला ‘आऊटस्टॅण्डिंग’! त्या अनुभवाचं शब्दचित्र रेखाटणं ही फार अवघड कामगिरी ठरत्येय माझ्यासाठी. पण तो सारा प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला गेलाय. तेव्हाच्या त्या प्रयोगांनंतर आणखीही काही प्रयोग केले गेले, त्यापकी दोन रेसिपीज तुमच्याशी शेअर करतोय. त्या नक्की ट्राय करा नि तुमची फॅमिली, फ्रेण्ड्स नि असोसिएट्सना एकदम ‘रॉयल फिल’ द्या..

 

कुकी पिझ्झा

साहित्य : अर्धा कप बटर, तीनचतुर्थाश साखर, १ टीस्पून व्हॅनिला, एक अंडं, एकचतुर्थाश कप मदा, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा.

टॉिपग : अर्धा कप चॉकलेट सॉस, अर्धा कप जेली क्युब्ज, अर्धा कप बिस्किटस्, एकचतुर्थाश कप चॉकलेट फ्लेव्हर्ड कॉर्न फ्लेक्स, ३ टेबलस्पून सालं काढलेला पिस्ता, अर्धा कप असॉर्टेड चॉकलेट कॅण्डिज, एकचतुर्थाश कप मँगो फ्लेव्हर्ड चॉकलेट, सजावटीसाठी पुदिन्याची पानं.

कृती : ओव्हन १८० अंश सेल्सियसवर तापवून घ्या. एका मोठय़ा बाऊलमध्ये अर्धा कप बटर, ब्राऊन शुगर, ग्रेन शुगर, व्हॅनिला आणि अंडं घेऊन एकजीव करून घ्या. त्यात पीठ नि बेकिंग सोडा घालून ढवळून घ्या. बेकिंग पेपरवर कणकेच्या गोळ्याची गोल पोळी लाटून घ्या. ती १५ मिनिटं बेक किंवा सोनेरी रंगाची होईपर्यंत बेक करा. ती ३० मिनिटं तशीच ठेवा. त्यानंतर त्यावर चॉकलेट सॉसचा लेअर द्या. त्यावर लगेचच नट्स, कॅण्डीज नि नारळाचा चव हलकेच भुरभुरा. त्यावर मेल्टेड व्हाइट चॉकलेटही अलगद हातानं भुरभुरा. कुकी पिझ्झा टॉिपग चांगलं सेट होऊ द्या. मग ते हव्या त्या आकारात कापून सव्‍‌र्ह करा.

केक लॉलीपॉप्स

साहित्य : १ कप डार्क चॉकलेट स्पंज पावडर, १ कप ओरो बिस्किटची पावडर, अर्धा कप मेल्टेड चॉकलेट, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, २ कप व्हाइट चॉकलेट, फूड ग्रेड ऑईलबेस्ड कलर्स आवडीनुसार, लॉलीपॉप स्टिक्स, सजावटीसाठी योग्य ते साहित्य.

कृती : चॉकलेट स्पंज, ओरो बिस्किट, दालचिनी पावडर आणि मेल्टेड चॉकलेट एकत्र करून घ्या. ते मिश्रण कणकेत घालून १५ मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर त्याचे छोटेसे लाडू वळा. लॉलीपॉप स्टिक त्या लाडूत खोचून तो टेम्पर्ड चॉकलेटमध्ये बुडवून घ्या. चॉकलेट सेट होईपर्यंत थांबा. व्हाइट चॉकलेट मेल्ट करून रंगीत गोळ्यांमध्ये घोळवा. त्यांना आपल्या आवडीनुसार सजवून सव्‍‌र्ह करा.

अनुवाद – राधिका कुंटे
viva.loksatta@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2015 1:47 am

Web Title: cooking sweet
Next Stories
1 वनपीस ड्रेस आणि स्कर्टची फॅशन
2 अभिव्यक्ती स्वातंत्र्याची..
3 सिस्टम
Just Now!
X