26 October 2020

News Flash

हॅशटॅग #करोनाकट

हेअरकटचे नानाविध फंडे #करोनाकट या हॅशटॅगद्वारे व्हायरल झाले आहेत.

करोनाकट चॅलेंजने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.

गायत्री हसबनीस – viva@expressindia.com

एकीकडे क्वॉरंटाइनमुळे सध्याचं चित्र हे हौसमौज जपून करण्याच्या दृष्टीने पाहिलं जात असलं तरीसुद्धा फॅशन करणं मात्र कोणी चुकवलेलं नाही.  सर्वसामान्यांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरगुती सुविधांसह घरीच हेअरकट करून नव्या हेअरस्टाइलचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या असे प्रयोग करण्यासाठी वेळही उपलब्ध असल्याने हेअरकटचे नानाविध फंडे #करोनाकट या हॅशटॅगद्वारे व्हायरल झाले आहेत. सध्या करोनाकट चॅलेंजनेही सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.

नटणं-मुरडणं या आपल्या अंगवळणी पडलेल्या सवयीने होम क्वॉरंटाइनमध्ये ‘फॅशन’ची फारच गोची करून ठेवली आहे. त्यामुळे नियम पाळून का होईना स्टायलिश राहणं हे जरुरी आहे, या नियमानुसार नित्यनवे फॅ शन फं डे रुजवले जात आहेत. आजच्या जमान्यात जिम लुक, एअरपोर्ट लुक अशा संकल्पनांमुळे रूटिन लाइफ हे ‘प्रेझेंटेबल’च असावं लागतं, मात्र आता घरीच राहणं गरजेचं असल्याने तितकं  प्रेझेंटेबल नाही कदाचित पण किमान स्टायलिश दिसावं यासाठी तरी प्रयत्न केले जात आहेत. गरज आणि हौस दोन्हींचा संगम साधत सेलिब्रिटींनी आपले केस घरीच कापले, दाढी वाढवली किंवा बीयर्डची कोणतीतरी स्टाइल केली. अनेक तरुणांनी घरी डोक्यावर कॅप घालून किंवा केस वाढवून पॉनी बांधायची फॅशन ठेवली. मुलींनी हेडगिअर लावणं, वेण्या घालणं, मोठे कापडी रबरबॅन्ड लावणं पसंत केलं. सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरलही झाले. त्यामुळे परिस्थितीवर मात करून फॅशन सर्वानी अवलंबली हे नक्की!

सेलिब्रिटींमध्ये आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, विराट कोहली, विकी कौशल, दिव्यांग त्रिपाठी, सोनम कपूर, आनंद अहुजा, हूमा कूरेशी या सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरती #क्वॉरंटाइनकट म्हणून फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. राजकुमार राव या अभिनेत्याने #ब्रेकदबीयर्ड या कॅप्शनसह आपला लॉकडाऊनमधला लुक शेअर केला. राधिका आपटे हिने आपला नवा हेअरकट शेअर केला. मिलिंद सोमण यानेदेखील आपला बीयर्ड लुक शेअर केला. अर्जुन रामपालचाही क्वॉरंटाइनमधला बीयर्ड लुक बराच चर्चेत आहे. हॉलीवूडमध्ये या करोनाकटची बरीच चर्चा रंगली आहे. ‘स्ट्रेंजर थिम्ंग्स’ या वेबसिरीजद्वारे ओळखली जाणारी अभिनेत्री माया हावके हिच्या आईनेही तिचे केस कापले आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. क्वॉरंटाइनमध्ये अभिनेत्री एमा रॉबर्ट्स आणि अभिनेत्री क्रिस्टेन स्टेवर्ड यांनीदेखील हेअरकट केला आहे. क्रिस्टेन स्टेवर्ड सध्या तिच्या केशरी केसांमुळे चर्चेत आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यानेदेखील आपला हेअरकट करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात आपल्या पत्नीच्या मदतीने त्याने हेअरकट केलेला दिसून येतो आहे. डय़ूआ लिपा या गायिकेने हेअरकलर आणि आपल्या आवडीचा कट करून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. अभिनेत्री ईशा केसकर आणि रिषी सेक्सेना यांनीही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सेलिब्रिटी नेहमी अपडेट राहून आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात आणि या काळातही हेअरस्टाइल, बीयर्डस्टाइलबाबत ते चाहत्यांशी संवाद साधताहेत. सर्वसामान्य जनताही नानाविध स्टाइल्स वापरून सोशल मीडियावर आपल्या हेअरस्टाइलच्या कल्पना शेअर करताहेत आणि त्या ट्रेण्डमध्ये येताहेत. सध्या वेण्यांचे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत, उदाहरणार्थ फ्रेंच प्लेट्स, फिशटेल प्लेट्स तर बीयर्डमध्ये दाढी ट्रीम करण्यावर आणि वाढवण्यावर भर आहे. सध्या क्वॉरंटाइनमध्ये हेअरस्टाइलचे टय़ूटोरियल व्हिडीओही उपलब्ध आहेत.

सगळीकडे ब्यूटीपार्लर बंद असल्याने हेअरकटच काय आयब्रोज, मॅनिक्यूअर—पॅडिक्यूअर करणं, फेशियल, वॅक्सिंग या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह उमटले आहे. त्यामुळे #करोनामास्क, #करोनानेल्स असे हॅशटॅग सगळीकडे फिरत आहेत. या सर्व गोष्टी स्वत:च्या ‘वेलनेस’साठी असल्याने क्वॉरंनटाइनमध्येही सेलिब्रिटींपासून ते सामान्यांपर्यंत गेले ६० दिवस लॉकडाऊनमध्ये असूनही फॅशनसह आम्ही सव्‍‌र्हाइव केलं आहे अशा कॅप्शनमधले फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत.

स्त्रियांसाठी क्वॉरंटाइनमुळे आवर्जून ब्यूटी पार्लरला जाऊन आपल्या टाइमटेबलप्रमाणे सर्व गोष्टी पार पाडणं शक्य नाही. ते काहींच्या बाबतीत शक्य आहेसुद्धा, पण ज्यांना शक्य नाही ते मात्र घरगुती सुविधांवर अवलंबून आहेत. क्वॉरंटाइनमध्ये फक्त केस विंचरणे आणि केस बांधून ठेवणे अशा साध्या पर्यायांनाही सर्वसामान्य तरुणींनी अंगीकारले आहे. आपली जीवनशैली मेकअप आणि इतर कॉस्मेटिक्स वापरण्याच्या अगोदर फक्त केसांना तेल लावणं, कंगव्याने केस विंचरणं आणि चेहऱ्याला पावडर लावणं एवढीच होती. क्वॉरंटाइनमुळे हीच पद्धत परत एकदा अवलंबवली जाऊ शकतेही, परंतु कुठल्याही परिस्थितीत फॅशन करत राहणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं हा सोशल मीडियावरील विरंगुळा तर आहेच, पण त्यापेक्षाही आपण काय के लं आहे हे सोशल मीडियावरून जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करण्याच्या आग्रहापायी हे करोनाकटसारखे ट्रेण्ड व्हायरल होत आहेत हेही तितके च सत्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:04 am

Web Title: corona pandemic lockdown haircut coronacut covid19
Next Stories
1 माध्यमी : पडद्यामागची गोष्ट
2 वसुधैव कुटुम्बकम्
3 सदा सर्वदा स्टार्टअप : स्टार्टअपचे मूल्यांकन
Just Now!
X