News Flash

निवांत सुट्टी!

थोडक्यात, सुट्टीची मजा अनुभवत आजच्या पिढीने अभ्यास किंवा कामाचं टेन्शन थोडं दोन हात दूर ठेवलं आहे.

गायत्री हसबनीस viva@expressindia.com

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुणाईला सुट्टी मिळाली आहे ती चक्क ३६५ दिवसांची! घरूनच अभ्यास, व्यायाम, चित्रपटांची सरबत्ती, गप्पा, गाण्यांची मैफील, काम सगळं कसं घरच्या घरी.. करोनामुळे ही अशी अनिर्बंध सुट्टी मिळाली असली तरी सध्या तरुणाईच्या परीक्षा संपल्या असल्याने त्यांना खरी निवांत सुट्टी मिळाली आहे. या निवांत सुट्टीचा अर्थ आपल्यासाठी हातातील सगळी कामं आणि अभ्यास सोडून कुठे तरी मस्त फिरायला जाणं, खाणंपिणं आणि मजामस्ती करणं हे ठरलेलं समीकरण असतं. दोन महिन्यांच्या सुट्टीत तरुणाई व्हेकेशन मूडमध्ये असते. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी आणि यंदाही व्हेके शनवाली ही निवांत सुट्टी नेहमीसारखी तरुणाईला एन्जॉय करता आलेली नाही. सायकलिंग, ट्रेकिंग, सोलो ट्रॅव्हलिंग किंवा कॅम्पिंग, ट्रीप, टूर वगैरे वगैरे. या सुट्टीचा पुरेपूर उपयोग एरवी करून घेतला जातो. कोणी नृत्य शिकतं, कोणी नवीन कला शिकतं, कोणी नवीन भाषा शिकतं किंवा आणखी काही. शिकणं-शिकवणं किंवा नवीन विविध उपक्रम करणं या हमखास सुट्टीत करण्याच्या गोष्टी असतात. यंदा सगळ्याच गोष्टी ऑनलाइन कराव्या लागत आहेत. बाहेर जाऊन काहीही करणं शक्य नाही. अशा वेळी या निवांत सुट्टीत अनेकांनी आपल्या छंदांना मोकळी वाट करून दिली आहे.

काहींनी या सुट्टीत नवीन यूटय़ूब चॅनल सुरू केले. ओळखीतल्या मित्रांचा घोळका जमवायचा. एखादी हटके संकल्पना घेऊन नवीन मजेदार व्हिडीओज बनवून यूटय़ूबवर प्रसिद्धी मिळवण्याची धडपड करणारे अनेक तरुण दिसतील. तर दुसरीकडे आपल्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी काहींनी मीम्स तयार करण्यावर भर दिला आहे. यापैकी काहीच जमलं नाही तर? फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वेळ घालवणंही अनेकांना आवडू लागलं आहे. सकाळी मॉर्निग वॉक किं वा संध्याकाळी वर्क आऊट करायची सवयही अनेकांनी लावून घेतली आहे. सध्या तरुण पिढीचे लंच आणि डिनर फंडेसुद्धा स्पेशल असे प्लॅन के ले जाताना दिसतात. रेस्टॉरंट्समधून नवीन डिशेस ऑर्डर करणं, त्याची चव चाखणं आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आपला अनुभव मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करणं हाही तरुणाईचा छंद झाला आहे. बऱ्याच जणांसाठी ही सुट्टी म्हणजे नॉस्टॅल्जिया ठरते आहे. जुने लोकप्रिय चित्रपट काढून ते या काळात पाहण्याची क्रेझ सध्या तरुणाईत आहे. हॅरी पॉटर आणि समकालीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर पाहणं हा अनेकांचा नित्यक्रम आहे. त्यात हॉलीवूडच्या बऱ्याच लोकप्रिय कार्यक्रमांचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, माव्‍‌र्हल स्टुडिओजचे चित्रपट. अगदी ताजं उदाहणं द्यायचं झालं तर सलमानचा ‘राधे’ चित्रपटही तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे म्हणे?.. तो पाहून त्यावर धम्माल मीम्स किं वा जोक बनवत त्याच्या सार्वत्रिक वाटपातही अनेकांना आनंद मिळतो आहे.

थोडक्यात, सुट्टीची मजा अनुभवत आजच्या पिढीने अभ्यास किंवा कामाचं टेन्शन थोडं दोन हात दूर ठेवलं आहे. लॉकडाऊन आहे म्हणून सुट्टीच्या आनंदावर त्यांनी विरजण पडू दिलेलं नाही. उलट ते सुट्टीचा पुरेपूर वापर करून घेत आहेत. मुंबईचे क्रिश्ना हरितवाल आणि पोषिता हरितवाल या दोन भावंडांनी सुट्टी सत्कारणी लावली आहे. क्रिश्ना म्हणतो, लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला आवडती गोष्ट करण्याची प्रचंड इच्छा होती, पण मनापासून काहीच करता येतं नव्हतं. तेव्हा कंटाळा आणि आळस वाढतच होता. मागची सुट्टी तर अशीच गेली, पण या वेळेस परत लॉकडाऊन झालं म्हणून सुट्टी वाया घालवायची नाही, असं पक्कं  ठरवून टाकलं होतं. मी सध्या वकिलीचा अभ्यास करतो आहे, त्यासाठी मी व्यक्तिश: वेळ देतोच आहे; परंतु त्याचसोबत मी माझे आवडते छंद जोपासायला सुरुवात केली आहे. मी आता जास्त वेळ चित्रकलेवर देतो. दुपारी किंवा संध्याकाळच्या शांत वेळी मी पेंटिंग करतो. त्याबरोबर हल्ली मी बाग सजावटीचेही काम हाती घेतले आहे, असे तो सांगतो. गार्डनिंग करण्यात माझा खूप चांगला वेळ जातो. त्यासाठी गार्डनिंगच्या वेगवेगळ्या सजावटीच्या पद्धतीही मी शिकतो आहे. गेमिंगमध्येही सध्या माझा रस वाढला असून सध्या मी सुट्टीत माईनक्राफ्ट हा गेम खेळतो आहे, असे त्याने सांगितले. तर पोषिता म्हणते, या सुट्टीत मला विशेषकरून संधी मिळाली ती आंतरराष्ट्रीय द्विभाषा शिकायची. मी सध्या आयरिश आणि कोरियन या दोन भाषा शिकते आहे. भाषा शिकण्याव्यतिरिक्त मी या सुट्टीत माझ्या स्किल्स डेव्हलपमेंटकडे विशेष लक्ष दिले. ‘इडेक्स’सारख्या ऑनलाइन संकेतस्थळावरून मी सतत आधुनिक म्हणता येतील असे नानाविध कोर्सेस आणि विषय शोधण्याचा सपाटाच लावला. त्यामुळे आपल्याला पुढे काय काय शिकता येईल आणि स्किल डेव्हलपमेंट कसं करता येईल या गोष्टी लक्षात येत आहेत. त्यानिमित्ताने बरंच काही जाणून घेण्याची संधी मला मिळाली असं सांगणाऱ्या पोषिताने सलमान रश्दी, एनिड ब्लिटन, अमीष त्रिपाठी, रोमेन रोलंड यासारख्या मोठमोठय़ा लेखकांची पुस्तके ही वाचून काढली आहेत. त्यांच्या साहित्यातून बरंच काही शिकता आलं, असं ती सांगते.

हफिसा शेख या तरुणीने तिची बहीण समा हिच्याबरोबरीने आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्यावर भर दिला. मी स्वत: फ्रेंच, जपान आणि कोरियन भाषा शिकले आहे. आता या सुट्टीच्या काळात मी या तिन्ही भाषेत संभाषण करू शकते, असं हफिसा सांगते. यादरम्यान तिने डायरी लिहायलाही सुरुवात के ली आहे. या डायरीत मी माझ्या चांगल्या आठवणी लिहिण्याची सवय लावली आहे. तसेच बुकमार्कसारख्या गोष्टी बनवणं आणि मोनोपॉली गेम्स खेळण्याचाही योग यानिमित्ताने आल्याचे तिने सांगितले.

सुट्टी म्हणजे फक्त फिरणं, स्वैराचार किंवा आगाऊ भाषेत उनाडक्या नव्हे! सुट्टीचा योग्य उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणणे शक्य आहे. त्यामुळे लॉकडाऊन असो वा नसो, वर म्हटल्याप्रमाणे तरुण पिढी ‘एन्जॉयमेंट तो होती हैं बॉस!’ असं म्हणत आनंदही अनुभवते आहे आणि सुट्टीच्या या निवांत वेळेत नव्या गोष्टी शिकण्याला, त्या करून पाहण्याला प्राधान्य देते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 12:01 am

Web Title: covid 19 holiday celebrations holiday due to covid 19 pandemic zws 70
Next Stories
1 किताब विश्वसुंदरीचा!
2 नवं दशक नव्या दिशा : वैश्विकीकरणाची चौथी लाट – २
3 वस्त्रान्वेषी : गुंफियेला शेला..
Just Now!
X