थंडीची चाहूल लागली की, दरवर्षी आपल्यातली काही मंडळी ‘नव्यानं व्यायामाला लागतात.  बऱ्याचदा आपली आवडती डेनिम याबाबतीत अगदी खरं बोलते. ती आधीपेक्षा थोडी घट्ट होते तेव्हा धोक्याची घंटा वाजायला लागते. मग गरम पाणीच प्या, बटर, लोणी, चॉकलेट, स्वीट्स या गोष्टींना रामराम ठोका, जिमकडे धाव घ्या, असे कित्येक प्रकार आपल्याला त्याच क्षणी सुचायला सुरुवात होते. कुणी जिम जॉइन करतं तर कुणी योगासनांच्या क्लासला जातं. पण कधीतरी ही नेहमीची जिम कंटाळवाणी वाटू लागते.

 सध्या अशा रुटीन एक्झरसाइजला पर्याय म्हणून अनेक नवे व्यायामाचे प्रकार यायला लागले आहेत. फिटनेस रुटीनचा भाग बनत आहेत. पुण्या-मुंबईत याचे रितसर क्लास सुरू झाले आहेत. ठाण्यातल्या डिफरंट स्ट्रोक्स अ‍ॅकॅडमीतर्फे सध्या लॅटिन मॉर्निग्ज नावानं काही नृत्यप्रकार शिकवले जातात. फिटनेस ट्रेनिंग म्हणून याकडे अनेकजण वळलेत. याशिवाय अर्बन योगा, अष्टांग योगा, कलारिपयट्टू, मार्शल आर्ट्स, पिलाटीज, अ‍ॅक्वा फिटनेस असे प्रकारही हळूहळू रुळायला लागले आहेत. या वेगळ्या व्यायामप्रकाराची ओळख करून देणारी कार्यशाळा मुंबईत वर्सोव्याला होते आहे. ‘इंच बाय इंचतर्फे ही कार्यशाळा १५ आणि १६ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. या हटके व्यायाम प्रकाराले सध्या ट्रेण्डमध्ये असलेले प्रकार कोणते?
या टॉप ५ फिटनेस ट्रेण्ड्सविषयी..

झुम्बा
viva02हा लॅटिन अमेरिकन नृत्याचा प्रकार. याचा वापर फिटनेस रुटीन म्हणून अलीकडच्या काळात सुरू झाला. संगीताच्या तालावर केलेल्या लयबद्ध हालचालींमधून व्यायाम होतो. वेगळं संगीत आणि ग्रुप एक्सरसाइझची धमाल यामुळे तरुण पिढी झुम्बाकडे आकर्षित झाली आहे. एक तासाच्या झुम्बा सेशनमध्ये ५०० ते ८०० कॅलरीज जळतात. म्हणूनच जगभर झुम्बाचा ट्रेण्ड आहे. आपल्याकडे गेल्या दोन-तीन वर्षांत लोकप्रिय झालेला हा प्रकार सध्याचा सगळ्यात ट्रेण्डी फिटनेस एक्झरसाइज म्हणून पुढे येत आहे. मुंबई-पुण्याच्या अनेक फिटनेस क्लबमधून हल्ली झुम्बा क्लासेस घेतले जातात. झुम्बाबरोबर साल्सा, जाइव्ह, बचाटा हे इतर नृत्यप्रकारही हल्ली लोकप्रिय व्हायला लागले आहेत.

अ‍ॅक्वा एरोबिक्स
viva05पाण्यामध्ये करायच्या कवायती, असं याचं साध्या शब्दात वर्णन करता येईल. अ‍ॅक्वा फिटनेस तज्ज्ञ रजनी मेकर म्हणाल्या, ‘या अ‍ॅक्वा फिटनेसमध्ये पाण्यातील विविध एक्सरसाइजचा समावेश असतो. त्यामध्ये एरोबिक्स, किकबॉक्सिंग, पिलाटीज, योगा आणि बॉडी कंडिशनिंग केलं जातं.’ विशेष म्हणजे अ‍ॅक्वा एरोबिक्समध्ये सहभागी होण्यासाठी जलतरणाची माहिती असणे गरजेचे नाही.

पिलाटीज
viva04हा व्यायामाचा एक नवा प्रकार सध्या सेलिब्रिटींमध्ये बराच लोकप्रिय आहे. योगाच्या जवळ जाणारा असला तरी याचा उगम पाश्चिमात्य देशात झालेला आहे. प्रामुख्याने फ्लोअर एक्झरसाइज प्रकारात पिलाटेज मोडतं. लयबद्ध शारीरिक हालचाली, स्ट्रेचिंग यासाठी बॉल किंवा वेगवेगळ्या साधनांचा वापर यामध्ये केला असतो.

मसाला भांगडा
सिनेनृत्य हा प्रकार नवा नाही. पण ‘बॉलीवूड डान्सिंग’ हा प्रकार हल्ली व्यायाम म्हणून केला जातो. viva03आपल्याकडे याचे क्लासेस फिटनेस क्लबदेखील घेतात. आपल्या देशातच नाही तर परदेशातही यातला एक प्रकार सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे मसाला भांगडा. पंजाबी ठेक्यावर नाचून कॅलरी घटवणारा हा प्रकार पाश्चिमात्य देशातही गर्दी खेचतो आहे. मसाला भांगडा ट्रेनर शालिनी भार्गव म्हणतात की, ‘मसाला भांगडा हा भारतीय नृत्य प्रकारावर आधारित नृत्य प्रकार असून हा सर्व वयोगटातील लोकांना आणि जे आपली फिटनेस पातळी वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. मसाला भांगडा म्हणजे पंजाबी स्टाइल भांगडा आणि हिंदी चित्रपटाची नृत्यशैली यांचा मिलाफ आहे. मसाला भांगडय़ाच्या एका डान्स सेशनमध्ये ५०० कॅलरीज् घटवता येऊ  शकतात.’

ताय ची  
हा प्रकार अर्थातच चीनमधून आलेला आहे. चायनीज मार्शल आर्ट्स म्हणता येईल असं हे खरा viva06स्वयंसंरक्षणासाठी वापरायचं तंत्र. पण आता हेल्थ रुटीन किंवा फिटनेस एक्झरसाइज म्हणून ताय ची सध्या शिकवलं जातं. अष्टांग योगा, मार्शल आर्ट आणि ताय ची ते ट्रेनर संदीप देसाई सांगतात, ‘ताय ची म्हणजे एकप्रकारची गतिशील ध्यानधारणा आहे- मेडिटेशन इन मोशन. मानसिक शांती, एकाग्रता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. ताणतणाव, चिंता, नैराश्य, औदासिन्य कमी करण्यासाठी अनेक तरुण ताय ची कडे वळले आहेत. नियमित ताय ची करणाऱ्यांची ताकद, ऊर्जा वाढते आणि स्नायूही बळकट होतात. एरोबिक कॅपॅसिटी वाढविण्यासाठी अनेकजण ताय ची प्रॅक्टिस करतात.’