एखाद्या मुलीची इच्छा नसताना तिला तिच्या अकाउंटवर सतत मेसेज पाठवणं, फॉलो करणं, मेल करणं असे प्रकार सोशल मीडियावर घडत असतात. त्या व्यक्तीला ब्लॉक केलं तरी वेगवेगळ्या माध्यमांतून त्रास सुरू राहतो, याला सायबर स्टॉकिंग असं म्हणतात. सायबर स्टॉकिंगविरोधात नेमकं काय करता येईल?

सोशल साइटसवर मुलींना अनोळखी व्यक्तींकडून होणारा त्रास नवा नाही. अनेक मुलींना अशा त्रासाला सामोरे जावं लागतं. एखादी व्यक्ती त्या मुलीची इच्छा नसताना सतत तिला फॉलो करत असते, फोन करणं, ईमेल पाठवणं, मेसेजेस पाठवणं असे प्रकार करत असते. त्याला ब्लॉक केलं तरी विविध माध्यमांतून तो तिला त्रास देत असतो. अशा त्रासाला सायबर स्टॉकिंग म्हणतात. पण नुकत्याच अशा सायबर स्टॉकिंगच्या प्रकरणात एका मुलाला सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे. अनेकांचा समज असतो की आम्ही अश्लील मेसेज पाठवले नाहीत, शारीरिक त्रास दिला नाही, शिव्या दिल्या नाही तर पोलीस आमचं काय वाकडं करणार आहे. या ऐतिहासिक निकालाने हा समज खोटा ठरवला आहे. सायबर स्टॉकिंगच्या प्रकरणातील ही राज्यातील पहिली एकमेव घटना आहे. त्यामुळे मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?

काय होती ही घटना?

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला २००९ मध्ये निनावी ईमेल येऊ लागले होते. शाहरूख खानच्या ‘डर’ सिनेमात ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रकार होता, अगदी तसाच प्रकार ही व्यक्ती करत होती. मेल करणाऱ्या व्यक्तीला या तरुणीची प्रत्येक हालचाल माहीत होती आणि तो तसे तिला मेलवर सांगत होता. आपल्या मागावर कुणी तरी आहे आणि आपल्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भावना झाल्याने ती घाबरली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे मेल्स वाशी आणि दिल्लीजवळील गुरगाव येथील एका कंपनीच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून येत होते. पोलिसांनी त्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली आणि तपास सुरू केला. या कंपनीतील एक तरुण योगेश प्रभू हा अभियंता या तरुणीच्या पूर्वीचा मित्र होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली. ऑर्कुटवर प्रभूने या मुलीशी मैत्री केली होती. दरम्यान, दोघांची मैत्री तुटली. पण त्याने या मुलीला त्रास देण्यासाठी असे निनावी मेल पाठवायला सुरुवात केली होती. त्याने आपल्या लॅपटॉपमधून ते सगळे मेल डिलीट केले होते. पोलीस माझं काहीच करू शकणार नाहीत, असा त्याचा समज होता, परंतु पोलिसांनी त्याचा लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आणि ते सगळे डिलीट केलेले मेल परत मिळवले. या खटल्यातील सर्व साक्षीदार फितूर झाले होते, परंतु पोलिसांकडे असलेल्या भक्कम पुराव्यामुळे किल्ला न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांनी योगेश प्रभूला भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ५०९ अन्वये १ महिना कारावास आणि ५ हजार दंड तसेच माहिती अधिकार कायदा कलम ६७ आणि ६७ (अ) अन्वये तीन महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यामुळे योगेश प्रभूला आता ४ महिने तुरुंगात काढावे लागणार आहे.

मुलींना पूर्वीपासून अशा विचित्र त्रासाला सामोरे जावे लागत होते. ती शाळेत, महाविद्यालयात, कामावर जाताना तिचा पाठलाग करणं, रस्त्यात अडवून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करणं, तिला ब्लँक कॉल करणं असे प्रकार होत असत. आता काळ बदलल्याने त्रासाचे स्वरूपही बदलले. मुलींना आता सोशल साइटवर त्रास दिला जातो. तिची इच्छा नसताना तिला व्हॉट्सअ‍ॅवर मेसेजेस पाठवणं, ईमेल करणं, फेसबुक, ट्विटरवर फॉलो करत राहणं अशा पद्धतीचा त्रास होतो. अशा सायबर स्टॉकिंगविरोधात तक्रार करता येते. सायबर सेलचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले की, ‘असा त्रास होत असेल तर काय करावे याची मुलींना माहिती नसते. त्या गप्प राहून त्रास सहन करतात. त्रास देणाऱ्या मुलांचा समज असतो की, आपण निनावी मेसेजेस मेल पाठवले तर कुणी काही करू शकणार नाही. मेसेजेस पाठवून ते डिलीट केले तर पोलिसांना काय कळणार? पण मोबाइल, लॅपटॉप फॉरमॅट केला तरी डिलीट केलेला मजकूर, छायाचित्रं, व्हिडीओ परत मिळवता येतात हे लक्षात ठेवा. योगेश प्रभूला मिळालेल्या शिक्षेमुळे सायबर स्टॉकर्सना चांगलाच वचक बसणार आहे.’

आता तक्रार करा बिनधास्त
सायबरतज्ज्ञ अ‍ॅड प्रशांत माळी यांनी सांगितले की, अशा पद्धतीने कुणी त्रास देत असेल तर आयपीसी कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल होतो आणि तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. कुठल्याही मुलीला कुणी अशा पद्धतीने त्रास देत असेल तर मुलीने घाबरून जाण्याचे कारण नाही. जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल उभारण्यात आला असून त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय सायबर पोलीस ठाणे (वांद्रे, बीकेसी) तसेच गुन्हे शाखा सायबर सेल (पोलीस मुख्यालय) येथेही जाऊन तक्रार नोंदविता येऊ शकते.

– सुहास बिऱ्हाडे