18 October 2019

News Flash

डिझायनर चप्पल!

समर सीझनला आत्तापर्यंत बऱ्याचदा नॉन डिझायनर फुटवेअरचा ट्रेण्ड पुढे राहिला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| गायत्री हसबनीस

समर सीझनला आत्तापर्यंत बऱ्याचदा नॉन डिझायनर फुटवेअरचा ट्रेण्ड पुढे राहिला आहे. पॅटर्न्‍स, सेमी डिझायनर किंवा साधारणपणे सिंगल कलर फुटवेअर आत्तापर्यंत जास्त पाहायला मिळाले. यंदा मात्र एम्बलिशमेंट आणि एम्ब्रॉयडरीच्या चपलांचा ट्रेण्ड संपूर्ण समर सीझनभर कायम राहणार आहे. यामध्ये खुस्सा (khussa), जूती, मोजरी, म्यूल्स (mules) आणि कॉम्फाय कॅ ज्युअल्स असे विविध प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत.

डिझायनर पायल सिंघल आणि फॅशन स्टोअर ‘फेझी गोबल्ट’ यांनी आकाराने लहान, कमी वजनाचे आणि कम्फर्टेबल असे डिझायनर स्निकर्स आणले आहेत. असे स्निकर्स हे अगदी परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. तुम्ही हे स्निकर्स फेस्टिव्ह आणि कॅज्युअल ड्रेसकोडवर घालू शकता. यामध्ये बरेच डिझाइन्स आहेत जे मेझोअमेरिकन कल्चरवर आधारलेले आहेत. त्यामुळे एक वेगळं स्टायलिश एलिमेंट पाहायला मिळेल. ‘आजटेक ग्रे स्निकर्स’ हे ३,२९० रुपये एवढय़ा किमतीत आहेत. ‘पॉप कॅण्डी’ स्निकर्सही याच किमतीत मिळतील. याहून आकर्षक असे क्लासिक मायथॉलॉजीच्या आधारे केलेल्या डिझाइन्सचे स्निकर्सही आहेत. फिनिक्स बर्ड, हमिंग बर्ड या डिझाइन्सचे स्निकर्स तर २,९०० रुपये या किमतीत आहेत. त्याचप्रमाणे ‘सिक्रेट गार्डन’ स्लायडर्स २,६९० इतक्या स्वस्त दरांत उपलब्ध आहेत. यात तुम्हाला पुन्हा एकदा फ्लोरल डिझायनर फुटवेअरही पाहायला मिळतील. ज्यात लोफर्स आणि मोजरी आहेत. ‘मिडनाइट फ्लॉवर’, ‘डस्क टील डॉन’, ‘प्रिटी पिकॉक’ असे लोफर्स अनुक्रमे ३,२९०, ३,२०० आणि ३,४९० रुपये एवढय़ा किमतीत सहज उपलब्ध आहेत. थोडे अजून ओव्हरलोडेड डिझायनर मोजरी हव्या असतील तर ‘ग्लिटरबॉब’, ‘लव्हेंडर फिल्ड्स’, ‘ग्रेट गास्टबे’, ‘सनशाइन लोटस’ अशा हटके मोजरी तुम्ही नक्कीच विकत घेऊ  शकता.

  • हॅण्डक्राफ्टेड चपलांमध्ये ‘कोरल हेझ’ या ऑनलाईन स्टोअरतर्फेदेखील नानाविध प्रकार आणि स्टाइल्स कॅज्युअल, फॉर्मल आणि ब्रायडल वेअरमध्ये आले आहेत. लेदर फुटवेअरबरोबरच सिल्क मटेरियल असलेल्या कॅज्युअल वेअरमध्ये ‘ऑरा’, ‘नाझ’, ‘शुगर मॅपल’, ‘फिर्दोस’, ‘मोगरा’, ‘डेझी’, ‘एस्टर’, ‘टस्कनी’, ‘मॅगपाय बर्ड’ असे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत. यांची किंमत ही २,२०० रुपये आणि २,३९९-४९९ रुपये असून यंदाच्या ऑफरप्रमाणे १,५०० ते १,७००-९०० रुपयांपर्यंत या मोजरी चपला मिळतील. फॉर्मल वेअरवरती ‘ग्लिटरबॉब’, ‘मार्गेरिटा’, ‘स्काय मार्टिनी’ आणि ‘रेनवे’ या मोजरी ट्राय करू शकता. यांची किंमत २,५०० रुपये इतकी आहे. कॅज्युअल मोजरीमध्ये तुम्हाला ३५ ते ४१ अशा युरोप साइज मिळतील, परंतु फॉर्मलमध्ये फार मर्यादित साइज उपलब्ध आहेत.
  • ‘चुंबक’कडूनदेखील विविध डिझाइन फिलोसॉफीच्या चपलांचा ट्रेण्ड आहे. चुंबकने या वेळी एम्ब्रॉयडरीच्या चपलांवर २० ते ५० टक्के सूट दिली आहे. त्यामध्ये ‘झारी’ एम्ब्रॉयड्रेड आऊ ल स्लिप ऑन जूती १,७९५ रुपये एवढय़ा दरात मिळेल. ‘फ्लोरल एम्ब्रॉयडरी’ असलेली जूती १,५९५ रुपये एवढय़ा किंमतीत मिळेल तर ‘फॉक्स आय एम्बलिशमेंट जूती’ ही १,४३६ रुपयात मिळेल. ‘बटरफ्लाय एम्ब्रॉयडरी स्लिप ऑन’ १,५८५ रुपये एवढय़ा किमतीत आहे. (पान ४ वर) (पान ३ वरून) ‘फ्लोरल पिकॉक एम्ब्रॉयडरी’ स्लिप ऑनदेखील १,७९५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ‘आजटेक लेस’ आणि ‘आजटेक क्रिस क्रॉस लेस’ यामध्ये स्लाइडर फुटवेअर आहेत. यावर अनुक्रमे २० ते ३० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ९०७ रुपये आणि १,०३६ रुपये एवढय़ा किमतीत हे दोन स्लाइडर्स मिळतील. ‘बोहो ब्लॉसम’ या नव्या प्रकारच्या स्लाइडरची किंमत ९०७ रुपये इतकी आहे कारण यावरही ३० टक्के सूट देण्यात आली आहे. चुंबकच्या ‘रकून एम्ब्रॉयडरी’ मोजरीवर ५० टक्के सूट असून ही मोजरी ६४८ एवढय़ा स्वस्त दरांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. चुंबकप्रमाणे ‘अ‍ॅमेझॉन’, ‘अजियो.कॉम’, ‘कूव्स’, ‘शॉपर्स स्टॉप’ या ब्रॅण्डकडूनदेखील नानाविध प्रकार फुटवेअरमध्ये आहेत. ‘अजियो.कॉम’वर जास्त प्रमाणात पंजाबी स्टाइल ट्रॅडिशनल फुटवेअर आहेत. ९९९, १,५९९, आणि १,४९९ रुपये एवढय़ा किमतीत एथनिक वेअरेबल जूती ‘अजियो.कॉम’वर मिळतील.

‘हॉर्सबीट एम्ब्रॉयडरी’ म्यूल्स तुम्हाला ७९९ रुपयांत ‘अजियो.कॉम’वर मिळतील. ‘कूव्स’वरून तुम्हाला जेम एम्ब्रॉयडरी, स्लिंगबॅक एम्ब्रॉयडरी अशा फ्लॅट सॅण्डल्स मिळतील. याशिवाय लेपर्ड एम्ब्रॉयडरी लोफर्स, बी एम्ब्रॉयडरी लोफर्स, वेलवेट आर्मी एम्ब्रॉयडरी बूट्स, असे काही स्टायलिश फुटवेअर १,४०० ते १,६०० रुपये इतक्या दरांत उपलब्ध आहेत. ‘नीडलडस्ट’ या ब्रॅण्डकडून तर नवखे आणि आकर्षक असे क्लासिक कॅ ज्युअल फुटवेअर ट्रेण्डमध्ये आहेत. ‘युनिकॉर्न डस्क’, ‘मादागास्कर’, ‘समर स्लिंग’, ‘वंडर लस्ट’, ‘लेडी इमा’, ‘लव्ह स्ट्रक’ अशा नानाविध प्रकारच्या मोजरी आणि जूती ३,४०० रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध झाल्या आहेत. अबूजानी आणि संदीप खोसला या फॅशन डिझायनर्स जोडीने आणि नीडलडस्टने ‘गोडा तुकडी’, ‘दर्पण’, ‘शिशा’, ‘रंग’, ‘सोना’ असे नावीन्यपूर्ण जूतीचे प्रकार आणले आहेत. ते अर्थातच, महागडे म्हणजे ५,००० ते ८,००० या दरांत हमखास मिळतील.

First Published on May 10, 2019 12:03 am

Web Title: designer slippers