12 July 2020

News Flash

एकच प्याला

आपली पचनशक्ती दारूमुळे पूर्ण बोंबलते. चयापचय क्रिया पण बिघडते.

डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
‘आई, सावित्रीमावशीच्या गावाहून फोन आला आहे. तिच्या नवऱ्याला गावातल्या दवाखान्यात ठेवलं आहे.’ आई धावत आली. फोन झाल्यानंतर म्हणाली की, त्याला ग्लुकोज चढवलं आहे. सावित्रीमावशी नुसतीच डोळय़ांत पाणी आणून रडत बसली आहे म्हणे. भयंकर चिडली आहे. पण पूर्वीसारख्या नवऱ्याला शिव्या देत नाहीय.. आईने सांगितलं तसं मनात अनेक प्रश्न उभे राहिले- आता काय करणार ही? गावाला त्याला बघायला जाणार का? आई मात्र शांत होती.
सावित्रीमावशी आमच्याकडे गेले १७ र्वष काम करतेय. माझी दुसरी आई आहे ती. मला आई ओरडली तरी ती मला पाठीशी घालते. मला बिघडवण्यामागे तिचा हात आहे, असं आई म्हणते. ती पाच दिवसांच्या बोलीवर सांगून गेली ती १५ दिवस येणार नाही असा निरोप आला. कंबर कसून आई कामाला लागली व आम्ही ओरडा खायला सुरुवात केली. सावित्रीमावशी परत घरी येईपर्यंत आई पण जरा टेन्शनमध्येच होती. राजावाडी हॉस्पिटलमध्ये इन्टर्नशिप करताना तिला गर्दूल्ले, दारूडय़ांचा खूप अनुभव आला होता, ते किस्से तिने संहितलेही होते. गरिबीमुळे खरं तर ते लोक गांजलेले असतात. कधी तरी जाणून किंवा अजाणतेपणी पहिला दारूचा घोट पितात. पशाच्या कमतरतेने देशी-गावठी दारू पितात आणि एका वेगळय़ाच दुनियेत जातात. तरंगायला लागतात. ही सवय नक्कीच वाईट आणि जीवघेणी आहे. गरिबांकडे ‘बेवडा’, मध्यमर्गीयांकडे ‘छोटीशी – वाईच घेणारे’ आणि श्रीमंतांकडे ‘स्ट्रेस रिलिव्हरथेरपी’ अशी नावं ठेवून आपण बघतो.. असतं तेच ते विचित्र पेय.
आपली पचनशक्ती दारूमुळे पूर्ण बोंबलते. चयापचय क्रिया पण बिघडते. थोडक्यात, जरी आपण व्यवस्थित खात असू तरीही आपल्या पचनशक्तीच्या वर परिणाम होत असतो. ‘ब’ जीवनसत्त्वाची उणीव हळूहळू भासू लागते. पित्ताचा त्रास, उलटया, कोरडय़ा वांत्या हे हळूहळू चिकटतं. दारू प्यायल्यानंतर दिवसभर मळमळ होत राहते. हे एक व्यसन आहे. पिऊ नये हे कळत असतं पण वळत नाही. कॉलेजमधील मुलं-मुलींना कधी तरी पिताना किंवा रोजचंच दारू पिणाऱ्यांनादेखील रोज काही होईलच असं नाही. पण हळूहळू शरीरावर त्यांचे परिणाम होत राहतात. आपल्या लिव्हरवर त्यांचे ठसे उमटू लागतात. लिव्हर एन्झाइम्सवर दारू परिणाम करते आणि आपल्याला भूक कमी लागते. कधी तरी हलक्या प्रतीची दारू प्यायल्यामुळे किंवा खूप र्वष दारू पीत राहिल्यामुळे लिव्हरचं गणित बिघडतं आणि आपल्याला कावीळ होण्याची शक्यता असते. ही कावीळ खूपच भारी पडते. या सर्वाचा शेवट वाईट होतो, हे सांगायला नको.
संसार पणाला लावून माणसं कष्ट करतात तर काही जण संसार धाब्यावर टाकून दारूमध्ये पसे ओततात. नवीन पिढीने दारूमध्ये पसे उडवण्यापेक्षा तेच पसे समाजकार्य – शेतकरी संघटनांना दिले तरी खूप फायदा होईल. भूक न लागणे, बारीक होणे, त्वचा पिवळसर पडणे, केस-नख खराब होणे हे सर्व कुपोषणामुळे होतं. दारू हे असं कुपोषण करते. माणूस लवकर प्रौढ दिसायला लागतो. त्याची वैचारिक व मानसिक वाढ जणू खुंटते.
सावित्रीमावशी घरी आली आणि तिचा आईशी संवाद चालला होता.. एकदम हाडाचा सापळा झालाय जणू. काही खात-पीत नाही, नुसतं दारूच्या मागे. रस्ता बनवायचं काम करतो.. जरा पसे मिळाले की दारू पितो. मुलगा नणंदेकडे वाढला. नवऱ्याने आमच्यासाठी काहीच केलं नाही वगरे वगरे.. आई तिची समजूत घालत होती. दारूबंदी करणाऱ्या काही संस्थांची माहिती काढू या, त्याचा आहारात सुधारू या वगरे वगरे.
आईचा आणि सावित्री मावशीचा संवाद ऐकताना मला मात्र आमच्या सोसायटीतील काही लोक आणि माझे अनेक मित्रमत्रिणी, नातेवाईक, ओळखीची मंडळी नजरेसमोर आले. त्यांचे पार्टीचे किस्सेही आठवले. वाटलं.. केवळ खिशात पैसा आहे आणि अन्नाची वानवा होत नाही, म्हणून या लोकांना आपण ‘दारूडे’ म्हणत नाही. पण असं नियमित दारू घेणाऱ्यांच्या आहाराची आणि पर्यायाने पचनशक्तीची वाट लागली असणार यात काही शंका नाही. शेवटी आई म्हणते तसं विनाशाला ‘एकच प्याला’ पुरेसा असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 1:22 am

Web Title: diet tips from experts
टॅग Weight Loss
Next Stories
1 सपने सुहाने?
2 फॅन्सचे फॅनॅटिक किस्से
3 वन इन ‘मिनियन’!
Just Now!
X