02 March 2021

News Flash

केशाकर्षक

एके  काळी हे ट्रेण्ड्स केवळ स्त्रियांच्या बाबतीतच पाहिले जायचे, मात्र आता त्यात मेन्सवेअर आणि मेन्स लूक्सचाही समावेश झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

समारंभांच्या दृष्टीने विचार करताना साइड ब्रेड, हाफ अपडू किंवा साइड पफ, बन आणि मराठमोळा खोपा या केशरचनांना अधिक पसंती मिळताना दिसते. त्यामध्ये काही वेळा खरे दागिने घातले जातात, तर काही वेळा खरी फुलं माळली जातात. खऱ्या दागिन्यांमध्ये हेवी नेकपीस, बाजूबंद, कानातले मोठे वेल अशा पारंपरिक दागिन्यांना केशरचनेवर विविध पद्धतींनी सजवलं जातं.

सर्वानाच नटण्याचं निमित्त देणारा काळ आता सुरू झालाय. साखरपुडा, लग्न यांचे मुहूर्त आहेत, पाठोपाठ ख्रिसमसचं सेलिब्रेशन आहे आणि लगेचच नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी! दरवर्षी कपडे, त्यांचे रंग, पॅटर्न्‍स, मेकअप, हेअरस्टाईल अशा अनेक गोष्टींमध्ये वेगवेगळे ट्रेण्ड्स दिसून येतात. हेअरस्टाईल ही सगळ्या गेटअपची शोभा मानली जाते. हेअरस्टाईलशिवाय कोणताच लुक पूर्ण होऊ  शकत नाही. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन ट्रेण्ड्सनुसार मुली आपल्या हेअरस्टाईल बदलत असतात. सणासमारंभाच्या काळात आणि पार्टीच्या माहौलमध्ये अशा दोन्ही ठिकाणी हे ट्रेण्ड्स लक्षात घेतले जातात आणि सांभाळले जातात.

एके  काळी हे ट्रेण्ड्स केवळ स्त्रियांच्या बाबतीतच पाहिले जायचे, मात्र आता त्यात मेन्सवेअर आणि मेन्स लूक्सचाही समावेश झाला आहे. सेलेब्रिटी स्टायलिस्ट आणि पुण्याच्या ‘श्98’ हेअर अ‍ॅन्ड मेकअप स्टुडिओचे विवेक लोखंडे सांगतात, ‘कोणत्याच बाबतीत मुलं आता मुलींपेक्षा मागे राहिलेली नाहीयेत. हेअरकटमध्ये मुलांची पसंती बऱ्याच काळापासून फेडेड हेअरकटला आहे. आताचा बॉलीवूडचा ट्रेंड बघता मुलांची ही आवड इतक्यात बदलण्याच्या काही शक्यता दिसत नाहीत. येऊ  घातलेले ऐतिहासिक चित्रपट पाहता फेडेड हेअरकटचा प्रभाव आणखी वाढेल असाच अंदाज बांधता येईल.’ प्रत्येक इव्हेंटसाठी मुलं वेगळा हेअरकट करत नसली तरी एकदा स्वत:च्या निवडीने केलेला हेअरकट मेन्टेन करण्यासाठी मुलंही सॅलोनच्या वरचेवर वाऱ्या करताना दिसून येतात.

कोणत्याही समारंभात सर्वाधिक चर्चा असते ती त्या समारंभाचा केंद्रबिंदू असलेल्या व्यक्तीची! एखाद्या लग्नात सगळ्यांचं सगळं लक्ष हे वधू आणि वराकडे एकवटलेलं असतं. मात्र त्यांच्या तयारीकडे लक्ष देताना स्वत:कडे थोडंसं दुर्लक्ष होऊ  देण्याची पद्धत आणि सवय आता जुनी झालेली दिसते. सगळ्या कामांत राहूनही आपण प्रेझेंटेबल आणि आकर्षक दिसलं पाहिजे असाच आजकाल लग्नात मिरवणाऱ्या इतर सर्व मुलींचा आणि स्त्रियांचा प्रयत्न असतो. ‘ज्यांना ब्राइड्समेड किंवा करवली म्हटलं जातं त्यांची हेअरस्टाईल ही वधूपेक्षा वेगळी असायला हवी, मात्र त्याचबरोबर वेडिंग थीमशी मिळतीजुळतीही असायला हवी’, असं ‘अ‍ॅडव्हान्स्ड हेअर स्टुडिओज’चे संकेत शहा म्हणतात. आजकाल वधूंना थोडा सटल लुक हवा असतो, मात्र सायडर्स आजकाल आपल्या लुकबद्दल फार काळजीपूर्वक निवड करतात. पूर्वी जसं वधूशी मिळतीजुळती हेअरस्टाईल किंवा मेकअप टाळला जायचा, तसं आता मानलं जात नाही. ठाण्याच्या ‘ग्लॅम स्टुडिओज’च्या श्रद्धा खिरीड म्हणतात, ‘आजकालच्या ट्रेण्डनुसार दोन आवडी प्रामुख्याने सांगता येतील, एक म्हणजे केसांत खरे दागिने माळणं आणि दुसरं म्हणजे खऱ्या फुलांनी केशरचना करणं’. खरे दागिने घालताना ते कोणते दागिने घालायचे याबद्दल कोणतेही समज वगैरे न बाळगता जे छान दिसतील ते अगदी नेकपीसेससुद्धा काही वेळा केसांत माळले जातात, असं त्या सांगतात.

आताच्या येऊ  घातलेल्या समारंभांच्या दृष्टीने साइड ब्रेड, हाफ अपडू किंवा साइड पफ, बन आणि मराठमोळा खोपा या केशरचनांना अधिक पसंती मिळताना दिसते. त्यामध्ये काही वेळा खरे दागिने घातले जातात, तर काही वेळा खरी फुलं माळली जातात. खऱ्या दागिन्यांमध्ये हेवी नेकपीस, बाजूबंद, कानातले मोठे वेल अशा पारंपरिक दागिन्यांना केशरचनेवर विविध पद्धतींनी सजवलं जातं. वेडिंग किंवा एन्गेजमेंट थीम जर इव्हिनिंग गाऊन्सची असेल तर त्यांना मॅच होणाऱ्या हेअरबॅण्ड्सचा वापर केला जातो. पारंपरिक पोषाखावर खरी फुलं केसांत माळण्याचा ट्रेण्ड बॉलीवूडमध्येही पाहायला मिळतो, त्याच पद्धतीने तो घराघरांतल्या समारंभात दिसून येतो. सुरुवातीला काहीसा विजोड वाटलेला, पण हळूहळू त्यातलं सौंदर्य लक्षात आलेला ट्रेण्ड म्हणजे हेअरस्टाईलवर कलात्मक पद्धतीने लावले जाणारे विविध प्रकारचे, आकाराचे आणि रंगाचे खरे खडे किंवा स्टोन्स! पारंपरिक नऊवारीवर ही खडय़ांची लखलखती हेअरस्टाईल कशी सूट होईल अशी शंका हळूहळू पुसली गेली आणि आता ही हेअरस्टाईल फेवरेट बनलेली आहे.

सामान्यत: समारंभांमध्ये केस मोकळे सोडण्याला फारशी पसंती दिली जात नाही. मात्र पाठोपाठ येऊ  घातलेल्या ख्रिसमस आणि न्यू इअर पार्टीसाठी लूज बन, मेसी बन, मेसी ब्रेड आणि सर्वात पसंतीची हेअरस्टाईल म्हणजे ओपन हेअर! पार्टी म्हणजे डान्स हे समीकरणच आहे. त्यामुळे पूर्ण ब्लो ड्राय करून केस सेट करण्यापेक्षा नॅचरल वाटेल असे हाफ ब्लो ड्राय करण्याकडे मुलींचा कल अधिक आहे. या बाबतीतही बॉलीवूड सेलेब्रिटींचा आदर्श ठेवला आहे, असंही म्हणता येईल. दीपिका, प्रियांका आदींच्या पार्टीजमधल्या हेअरस्टाईल्स या नेहमीच कॅज्युअल दिसतात. त्यांचा प्रभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोय व कम्फर्ट या दोन कारणांमुळे यावेळीही पार्टीजमध्ये कॅज्युअल हेअरस्टाईल्स जास्त प्रमाणात दिसून येतील, असं स्टायलिस्ट्सचं मत आहे.

एकंदरीत ट्रेण्ड्स बघता हेअरस्टाईलसुद्धा कम्फर्टेबल असावी याकडेच जास्त लक्ष पुरवलं जातं. समारंभांमध्ये कामं देखील करायची असल्याने केसांची अडचण होणार नाही म्हणून ते बांधून टाकले जातात. मात्र बांधलेले केसही आकर्षक कसे दिसतील याची काळजी घेतली जाते. तर दुसऱ्या बाजूला पार्टीजमध्ये डान्स करायला कम्फर्टेबल असतील अशा पद्धतीच्या हेअरस्टाईलला प्राधान्य दिलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:39 am

Web Title: different ways on the hairstyle abn 97
Next Stories
1 क्षण एक पुरे! : ब्लॉगिष्ट
2 टेकजागर : ‘गुगल सर्च’चा सोस!
3 फिट-नट : तुषार कावळे
Just Now!
X