04 December 2020

News Flash

डिजिटली  फॅशनेबल!

लॅक्मे फॅशन वीक हे फॅशन विश्वातील उलाढालीचे मोठे कें द्र बनले आहे.

तेजश्री गायकवाड

सरत्या वर्षांबरोबर वेध लागत असतात ते पुढच्या वर्षीच्या फॅ शन ट्रेण्ड्सचे..दरवर्षी या थंडीच्या मोसमाची सुरुवात होण्याआधीच आपल्याकडे रंगतदार फॅ शन सोहळ्यांची एकच धामधूम असते. पुढच्या वर्षीच्या समर सीझनमधील फॅ शन ट्रेण्ड्स नोंद करून घ्यायचे ते या फॅ शन सोहळ्यांमधून. मात्र या वर्षी फॅ शन सोहळ्यांनाही करोनाचे गालबोट लागले आणि हे सोहळे व्हच्र्युअली पार पडले. भारतीय फॅशन इंडस्ट्रीसाठी फॅ शन सोहळ्यांच्या मांदियाळीतील महत्त्वाचा फॅशन इव्हेंट म्हणजे ‘लॅक्मे फॅशन वीक’. या वर्षी इतर सोहळ्यांप्रमाणे लॅक्मे फॅ शन वीकही डिजिटली पार पडला. नेहमीप्रमाणे हा सोहळा विविध कारणांनी गाजतो तसा या वर्षीही त्याची तेवढीच चर्चा झाली. मात्र एरव्ही या सोहळ्यात प्रेक्षकांचाही किं वा प्रत्यक्ष खरेदीदारांचाही थेट सहभाग असतो, तो सहभाग डिजिटली मर्यादित झाल्यामुळे फॅ शनविश्वाच्या आर्थिक गणितांवर पडलेला प्रभाव या डिजिटल सोहळ्यातून ठळकपणे जाणवला.

आजूबाजूला जे सुरू आहे, ज्या नवीन गोष्टी येत आहेत त्या स्वीकारायच्या, आत्मसात करायच्या आणि त्याप्रमाणे बदलायचा प्रयत्न करायचा या प्रक्रियेतून प्रत्येक जण जात असतो. बदल ही काळाची गरज आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बदल हा होतच असतो. याला फॅशन इंडस्ट्री कशी अपवाद ठरेल? प्रयोगशीलता हा तर फॅशनचा आत्मा आहेच, त्यामुळे सतत नव्या गोष्टी इथे येतातच. असाच बदल घडवत डिजिटल प्रेझेन्टेशनचा फायदा घेत फॅशन डिझायनरने हटके सादरीकरण केलेलं या लॅक्मे फॅ शन वीक सोहळ्यात दिसून आलं. फॅ शन सोहळा लोकांना प्रत्यक्ष नाही, डिजिटलीच अनुभवता येणार आहे हे लक्षात घेऊन सादरीकरणात बदल करण्यात आले होते.  नेहमीप्रमाणे सजलेला मोठा रॅम्प, मोठय़ाने वाजणारं संगीत आणि त्या तालावर सुंदर कपडे घालून ऐटीत चालत येणारे मॉडेल्स या दरवेळीच्या फॅशन शोच्या पद्धतीला फाटा देत नवीन पद्धतीने सादरीकरण करण्यासाठी डिझायनर्स आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत लक्षात येत होती. या वेळी रॅम्पच्या ऐवजी एखाद्या पडीक इमारतीच्या जागेत मॉडेल्सना उभं करत डिझायनर्स कपडे सादर के ले गेले, तर कोणी यासाठी एखाद्या इंडस्ट्रियल इस्टेटच्या जागेचा वापर केलेला दिसून आला.

अर्थात, करोनाकाळात फॅ शन डिझायनर्सना तारणारे वेडिंग कलेक्शन इथेही मागे राहिले नाही.हेवी डिझायनर कलेक्शन्स, वेडिंग किंवा पारंपरिक कलेक्शनसाठी त्याला साजेल असेच मोठ मोठे महाल या वेळीही सजले होते. भव्यदिव्य महाल आणि त्या पाश्र्वभूमीवर थाटात रॅम्पवॉक करणारे मॉडेल्स पाहताना त्यांनी परिधान के लेले हेवी डिझायनर कपडे ठळकपणे दिसत होते. प्रत्येक डिझायनरच्या कलेक्शनमागे त्यांची काही ना काही प्रेरणा, संकल्पना, विचार असतो. तो कलेक्शन रूपाने मांडताना फॅशन डिझायनरचा प्रयत्न असतो की तो विचार एखद्या लघुपट, व्हॉइस ओव्हर किंवा अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवावा. हा प्रयत्न यंदा सादरीकरण आधीच शूट झाल्यामुळे आणि वेगवेगळ्या बॅकग्राउंड्सचा वापर के ल्यामुळे सहज शक्य झाला. ७ ते १० मिनिटांच्या या फिल्मरूपी सादरीकरणामध्ये कलेक्शनला साजेशी नाटय़कृती, संगीत, वेगवेगळे प्रॉप्स आणि अगदी विविध वयोगटांतील मॉडेल्स, वेगवेगळी शरीरयष्टी असलेले मॉडेल्स यांचा योग्य मिलाफ साधण्यात आला होता. या मुख्य सादरीकरणासह पडद्यामागची हालचाल अर्थात मेकअप करताना, कोऑर्डिनेशन करता लागणारा कस , मुलाखती , ऑनलाइन संवाद सगळंच यंदा छोटय़ा छोटय़ा व्हिडीओजच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता आलं. संपूर्ण फॅशन वीक ऑनलाइन वेगवेगळ्या सोशल मंचांवरून सादर झाल्यामुळे फॅशन वीकला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

इतक्या मोठय़ा फॅशन वीकच्या मागे दडलेली आर्थिक गणितंही तितकीच मोठी असतात. आपल्या देशात मोठय़ा डिझायनरने सादर केलेलं कलेक्शन पुढे इतर छोटय़ा-मोठय़ा डिझायनर्सकडून फॉलो के लं जातं. आणि त्यातूनच फॅशन इंडस्ट्रीत आर्थिक उलाढाल मोठय़ा प्रमाणावर होते. लॅक्मे फॅ शन वीकच्या माध्यमातून दरवर्षी जगभरातील वेगवेगळ्या देशांतील ग्राहक, डिझायनर्स आणि मोठे ब्रॅण्ड्स, व्यापारी यांना आमंत्रित करून एकत्रित या मंचावर आणण्याचा प्रयत्न के ला जातो. या वर्षी करोनामुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर हा प्रयत्न सफल ठरेल का, याबाबत शंका होती. मात्र परिस्थितीत झालेले बदल बाजारपेठेवर कसे चांगले-वाईट परिणाम करू शकतात, याचा अनुभव या शोच्या माध्यमातून घेता आला. डिजिटली पार पडलेल्या या फॅ शन वीकशी नेहमीपेक्षा जास्त लोक जोडले गेले होते. फॅशन डिझायनरने तयार के लेलं कलेक्शन, त्यासाठी वापरलेल्या कापडाचा दर्जा, त्यावर केलेलं काम, कारिगरी हे सगळं ग्राहकांना डिजिटली का होईना जवळून बघता आलं. कपडय़ांवर घातलेली त्याला साजेशी ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाइल, फुटवेअर, बॅग अशा अनेक गोष्टींकडे बारकाईने बघण्याची ही संधी लोकांनी घेतली. या सगळ्या गोष्टी नीट बघता याव्यात म्हणून खास मांडणी शो डिझायनरच्या मदतीने केली जाते. डिजिटल सादरीकरणामुळे या बारकाव्यांकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलंही जाणवलं, मात्र फॅशन वीकमध्ये ग्राहकांना थेट डिझायनरला भेटण्याची संधी बिझनेस हबमुळे मिळाली. या भेटीतून डिझायनरला आपल्या ग्राहकांची पसंती थेट समजून घेता येते. उपलब्ध ड्रेसची खरेदी होते, नवीन ऑर्डर्स दिल्या जातात. हे परदेशी ग्राहक, व्यापारी खास अशा फॅशन वीकसाठी आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे लॅक्मे फॅ शन वीक हे फॅशन विश्वातील उलाढालीचे मोठे कें द्र बनले आहे.

या सोहळ्यात ठळकपणे जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे प्रस्थापितांबरोबरच दिसलेले नवे चेहरे. मनीष मल्होत्रा, गौरांग शाह, कु णाल रावल सारख्या नामांकित फॅ शन डिझायनर्सबरोबरच दिशा पाटील, कावेरी लालचंद, आएशा राव, रिमझिम-साक्ष-किन्नी अशा वेगळ्या डिझायनर्सचे प्रयोग पाहायला मिळाले. तसंच मृणाल ठाकू र, अथिया शेट्टी, राधिका मदन, अपारशक्ती खुराणा, इशान खत्तार, कार्तिक आर्यन अशी कलाकारांचीही नवीन फळी रॅम्पवर प्राधान्याने पाहायला मिळाली. डिझायनर्स आणि सेलिब्रिटींमधला हा नवेपणाही या शोला ताजी झळाळी देऊन गेला. सस्टेनेबल फॅ शनपासून फ्लोरल, मेटॅलिक-स्टील कॉर्ड्सचा वापर करून बनवलेले कलेक्शन्स, पारंपरिक वेडिंग आणि भरजरी वस्त्रांचे कलेक्शन्स हा सगळा वैविध्यपूर्ण मामला डिजिटलीही तितक्याच प्रभावीपणे मांडला गेला होता.     viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 12:21 am

Web Title: digital fashion digitally fashionable digital age in fashion industry zws 70
Next Stories
1 वस्त्रांकित  : नाना ‘चंद्र’कळा
2 सदा सर्वदा स्टार्टअप : तुलनात्मक बाजार विश्लेषण
3 ऐश्वर्यवंत क्लिक
Just Now!
X