ऑफिसमधून किंवा कॉलेजमधून थेट गरबा नाइटला जायचंय आणि मनसोक्त नाचायचंय.. असा प्लॅन अनेक जणी करत असतील. पण त्यासाठी घागरा-चोलीसह पूर्ण गरबा लुक कॅरी करणं शक्य होणार नाही. सकाळपासून घर सोडताना काय काय जवळ बाळगणार? ‘डे लुक’ ते ‘इव्हनिंग फेस्टिव्ह लुक’ हे ट्रान्स्फॉर्मेशन तसं फार अवघड नाही. थोडी पूर्वतयारी केली, की हे सोपं होईल आणि तुमचा लुकसुद्धा हटके वाटेल. अ‍ॅक्सेसरीजमध्ये थोडे नवे प्रयोग केले तर गरब्यासाठी तुमचा छान ‘फ्यूजन लुक’ तयार होईल.