शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. आता आपण इजिप्तच्या दौऱ्यावर निघालोय. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या या खाद्यसंस्कृतीविषयी..
आजपासून आपला स्टॉप ओव्हर आहे इजिप्त. काही प्रांताबद्दल मनात गूढ आकर्षण असतं. अशाच प्रांतांपैकी एक आहे नाईल नदीकाठी विसावलेला इजिप्त. हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा असणारा हा प्रदेश बघायची मला फार उत्सुकता होती, आणि क्रूझमुळे ती पूर्ण झाली. गाझाचे पिरॅमिडस् पाहिले, तिथली मूठभर वाळू जपून आणली. तिथला राजा तुतनखामेन व राणी नेफ्रतिती यांच्या वापरातल्या वस्तू, पुढच्या जन्मासाठी पिरॅमिडस्मध्ये ठेवलेल्या वस्तूंचा साठा, इजिप्शियन डिझाइनचा सोन्याचा पलंग, तिथल्या म्युझियममधल्या हजारो ममीज, पुरातन इजिप्शियन राजवटीचे डावपेच.. हे सर्व अचंबित करणारं आहे. इजिप्शियन माणूस काळाच्या खूप पुढे होता.
इथली खाद्य संस्कृतीसुद्धा अशीच विकसित झाली आहे. ड्रायफ्रूटस्, कडधान्य, खारवलेल्या गोष्टी यावर भर असतो. जेवणातल्या सगळय़ात महत्त्वाचा घटक म्हणजे पीता ब्रेड. फलाफेल किंवा सॉसेससोबत हा ब्रेड खातात. इथली पॉप्युलर असलेली डिश म्हणजे ‘कोशारी’. ही डिश भात, डाळी आणि मॅकरोनी वापरून करतात. जेवणात कांदा आणि लसूण भरपूर प्रमाणात वापरला जातो.
फ्रेश लसूण म्हणजे पातीचा लसूण तर सलॅडपासून ते वेगवेगळय़ा मेन कोस्रेस बनवण्यापर्यंत सगळीकडे वापरला जातो. इथली स्टफ्ड आणि बेक केलेली वांगी खूपच टेस्टी असतात बरं का, मी स्वत: टेस्ट केली आहेत. हा वाळवंटी देश असल्यानं इथला उन्हाळा किती कडक आणि कोरडा असेल याची कल्पना केली तरी आपल्याला घाम फुटेल! पण याचा सामना करायला इथले लोक सज्ज असतात. फळ, दूध, भाज्या आणि थंड पेयांच्या मदतीनं. माझं फेवरेट िड्रक म्हणजे वाळवलेल्या जास्वंदाच्या फुलापासून बनवलेलं झकास सरबतं, केळी, खरबुज, स्ट्रॉबेरीज, मिल्कशेकपासून तर ‘कासब’ (आपला उसाचा रस ) ‘कातर अल् दीन’ (जर्दाळूचा ज्युस) सोबिया (नारळ आणि दूध यापासून बनवलेल ड्रिंक) असे बरेच प्रकार इथे प्यायला मिळतात. एकंदरीत काय माणूस कुठल्याही परिस्थितीत असो तो बरोबर जुळवून घेतो. इथल्या माणसानं हवामानाप्रमाणे जुळवून घेतलंच आहे, शिवाय वेगळी खाद्यसंस्कृती निर्माण केली आहे.

इजिप्शियन कबाब
साहित्य : चिकन ब्रेस्ट – २, दही – ३ टेबल स्पून, मीठ – अर्धा टी स्पून, हळद – अर्धा टी स्पून, मोहरी पूड – थोडी (एक अष्टमांश टी स्पून, इजिप्शियन मसाला अर्धा टीस्पून (मसाल्याचे साहित्य – लाल तिखट – अर्धा टी स्पून, धणे – १ टी स्पून, काळी मिरी – ८ ते १०, जिरे अर्धा टी स्पून, दालचिनी – एक छोटी, लवंग – ३- ४, जायफळ -१ चिमूट, वेलची -२ .. सर्व साहित्य एकत्र पूड करून घ्यावे.) वेलची पूड – एक अष्टमांश टी स्पून, लिंबाचा रस – १ टी स्पून, व्हिनेगर – १ टी स्पून, कांदा – १ (मोठा कापलेला, चार तुकडे केलेला), टोमॅटो – १ (मोठे काप), बांबू स्टिक्स – ८, तेल, पार्सली.

कृती : चिकनचे मोठे तुकडे करा. एका बाऊलमध्ये कांदा आणि टोमॅटो सोडून इतर सर्व साहित्य एक जीव करा. मग त्यात चिकनचे तुकडे टाकून मेरीनेट करा आणि फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवा. बांबू स्टिक्स पाण्यात भिजवून काढा आणि कांदा, चिकन, टोमॅटोचे तुकडे त्यावर लावा. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिकन स्टिक्स श्ॉलो फ्राय करा. छान तांबूस रंग आल्यानंतर सवर्ि्हग प्लेटमध्ये काढून पार्सली व िलबाने गाíनश करून सव्र्ह करा.

कोशरी
साहित्य : ऑलिव्ह ऑईल – २ टेबल स्पून, तांदूळ – १ कप, मसूर – १ कप, मॅकरोनी – २ कप, व्हेजिटेबल स्टॉक – २ कप, (चिरलेली लसूण पाकळी – १, जिरे – १ टी स्पून, तमालपत्र – १, व्हेजिटेबल स्टॉकसाठी ) मीठ – अर्धा टी स्पून, कांदे – २ (लांब चिरलेले).
सॉससाठी साहित्य – ऑलिव्ह ऑईल – २ टेबल स्पून, कांदा – २ (बारीक चिरलेला), ठेचलेल्या लसूण पाकळय़ा – २, टोमॅटो प्युरी- १ कप, इजिप्शियन मसाला – २ टी स्पून (लाल तिखट – अर्धा टी स्पून, धणे – १ टी स्पून, काळीमिरी – ८-१०, जिरे – अर्धा टी स्पून, दालचिनी – १ छोटी, लवंग – ३-४, जायफळ -१ चिमूट, वेलची -२ (सर्व एकत्र पावडर केलेला), चिली फ्लेक्स – पाव टी स्पून, व्हिनेगर – १ टेबल स्पून, मीठ.

गार्निशिंगसाठी साहित्य : तळलेला कांदा, उकडलेले काबुली चणे.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा आणि लसूण टाकून तांबूस रंग येईपर्यंत परतुन घ्या. मग त्यात टोमॅटो प्युरी, इजिप्शियन मसाला, मीठ, चिली फ्लेक्स टाकून सॉस मंद आचेवर शिजवा. भात नेहमीप्रमाणे शिजवून घ्या. फक्त पाण्याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक वापरा. अख्खी मसूर आणि मॅकरोनी वेगवेगळी शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये राइस, मसूर आणि मॅकरोनी मिक्स करून घ्या. आणि सवर्ि्हग प्लेटमध्ये काढून त्यावर तयार सॉस आणि तळलेला कांदा आणि उकडलेला काबुली चणे टाकून गरमागरम सव्र्ह करा.


आजची सजावट : टोमॅटोचे फूल

हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कावर्ि्हग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
कृती : १. एक लाल घट्ट टोमॅटो घ्या. २. देठाकडे वरून एक स्लाइस कट करा. आणि स्टॅण्डसारखा उभा करा. ३. सुरीने टोमॅटोवर चित्रात दाखवल्याप्रमाणे कट मारा आणि टोमॅटोचे ६ भाग तयार करा. टोमॅटोच्या पाकळय़ा तयार झाल्या.
४. मग प्रत्येक पाकळी सुरीने वेगळी करा आणि पाकळीच्या मध्यभागी उलटा त्रिकोणाचा आकार द्या. ५. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाकळ्या वेगळय़ा करा. ६. तयार आहे टोमॅटोचे फूल.