एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
माणसांच्या स्वभावाचे वेगवेगळे पलू असतात. त्यातला एक पलू म्हणजे स्वत:पेक्षा इतर काय सांगतात यावर अधिक विश्वास असणे. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या बरोबर आहेत याविषयी आपण अगदी ठाम असतो. मात्र कोणी एकाने आपल्या मनात त्याविषयी संदेह निर्माण केला की झाले! आपला विश्वासही डळमळीत होतो. आपलं चुकतंय आणि समोरचाच योग्य असे स्वत:बद्दल न्यून बाळगणारे अनेक असतात. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण आपल्या तोंडचे काही उच्चार अगदी अचूक असतात पण समोरच्याने वेगळा उच्चार केला की, आपला आत्मविश्वास डळमळीत झालाच. माझा उच्चार बरोबर आहे वा नाही. शंका फिटेपर्यंत अस्वस्थता.
एज्युकेशन या शब्दाचा अगदी बालवयापासून ऐकलेला उच्चार आपण डोळे मिटून स्वीकारलेला असतो. पण कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर याच शब्दाचा स्पेिलगबरहुकूम जाणारा एड्युकेशन असा उच्चार आपण ऐकतो आणि लगेच मनात शंकेची पाल चुकचुकते. आपला उच्चार बरोबर का एडयूकेशन बरोबर?
इंग्रजी भाषेच्या अनेक गमतींपकी एक म्हणजे एखाद्या अक्षराचा एखाद्या शब्दात होणारा भलताच वेगळा उच्चार किंवा त्यातलं एखादं पानात वाढलेल्या मिठासारखं अक्षर शास्त्रापुरतं वाढलेलं. पण तोंडी लावायची गरजच नाही. सायकॉलॉजी शब्दाच्या आधीचा P असाच. Budget मधला  ‘d’,edge  मधला ‘’d देखील असाच हाताची घडी तोंडावर बोट घेऊन गप्प बसलेला. पण education मध्ये मात्र ‘’d चा ‘J’ होऊन जातो आणि उच्चार होतो ‘एज्युकेशन’. तरीही या शब्दाचा एड्युकेशन उच्चार आपण अनेकदा ऐकलेला असतो. हा उच्चार करणारी मंडळी सामान्यत: दोन प्रकारची. एक अगदी भाबडी. त्यांना ‘D’ ला ‘J’ का म्हणावं हे न कळून अगदी साधेपणाने एड्युकेशन म्हणणारी. तर दुसरी थोडासा स्टाइलचा भाग म्हणून ‘ज्यु’ चा ‘डयु’ करणारी. मात्र सर्व मान्यताप्राप्त इंग्रजी व्याकरणकर्त्यांना  ‘एज्युकेशन’ हा उच्चार अधिक मान्य आहे. एड्युकेशन हा उच्चार निषिद्ध नाही, पण चलनात मात्र एज्युकेशनच. त्यातही काही वेळा या j आणि j ला मिक्स करून एड्ज्युकेशन असाही पर्याय निवडलेला दिसतो. ‘ड’चा उच्चार यात अगदी निसटता होताना दिसतो.
१९ व्या शतकाच्या मध्यावर लॅटिन educatio  या शब्दापासून education   हा शब्द तयार झाला. त्याचा अर्थ ट्रेन करणे वा वाढवणे असा होता. अगदी प्राचीन काळात आजच्या काळात ज्या प्रकारे हा शब्द प्रचलित झाला आहे तसा शब्द प्रचलित नव्हता. याचं थेट कारण शिक्षण सर्व थरांतील व्यक्तिमत्त्वांपर्यंत पोहोचले नव्हते. आताच्या काळात मात्र दैनंदिन व्यवहारात या शब्दाचा उच्चार अनिवार्य आहे. दोन-तीन वाचकांनी या शब्दाच्या उच्चाराबाबत सातत्याने विचारणा केली, त्यामुळे या शब्दाच्या उच्चाराबाबत एज्युकेट होण्याचा हा प्रयत्न.
viva.loksatta@gmail.com

panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
Letter from Amolakchand college professor to district election decision officer regarding ballot paper voting
‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा