नवरात्र हा रंगांचा, उत्साहाचा, आनंदाचा उत्सव. मुलींना नटून तयार व्हायला गरबा, दांडिया, भोंडला अशी अनेक कारणं नवरात्रीत असतात. तुमचा ड्रेस कितीही चांगला असेल तरी अशा प्रसंगी योग्य अ‍ॅक्सेसरीज नसतील तर त्याला शोभा येत नाही. याउलट हटके अ‍ॅक्सेसरीजच्या जोरावर साधासा ड्रेसही भाव खाऊन जातो. राईट अ‍ॅक्सेरीजसाठी या टिप्स..
* यंदा स्टाईल आहे कुछ हटके करण्याची. म्हणजे पारंपरिक ड्रेसवर दागिनेही तसेच घातलेत तर काय मजा? दागिन्यांमध्ये एक्परिमेंट करा.
* एथनिक ड्रेस असेल तर त्यावर जॉमेट्रिक अ‍ॅक्सेसरीज घाला. तुमची स्टाईल आधुनिक काळातली वाटेल पण लहेजा पारंपरिक राहील.
* नेहमीच्या बांगडय़ांऐवजी ट्रायबल हँड कफ घातलात तर नक्कीच उठून दिसेल.
* पेहरावाला साजेशी हेअरस्टाईल हवी. त्यावर जर हेड गिअर म्हणून काही अ‍ॅक्सेसरी वापरली तर रिच लूक येईल.
* इअरकफ्सची या सीझनमध्ये चलती आहे. एथनिक वेअर किंवा मॉडर्न वेअर कशावरही इअरकफ्स उठून दिसतात.
*  पाम रिंग्ज, आर्मलेट्स, रिंग ब्रेसलेटसारखे वेगळे दागिने आवर्जून वापरा. त्यामुळे सगळ्या लूकला एक युनिकनेस येईल.
नेहमीच्या अ‍ॅक्सेसरीजनी एथनिक लुक कसा आणाल?
गरबा किंवा दांडियाच्या ट्रॅडिशनल चनिया चोली किंवा घागऱ्यावर अँटिक ज्वेलरी खरी उठून दिसते. पण या ऑकेजननंतर ती कपाटातच पडून राहते. खास नवरात्रीसाठी किंवा दांडियाला जाण्यासाठी म्हणून अँटिक ज्वेलरी खरेदी करण्याची इच्छा नसेल तर त्यावर काही सोपे उपाय आहेत. स्टोन नेकपीस किंवा बीडवाले चोकर नेकलेस एथनिक वेअरवर चांगले दिसतात. अँटिक ज्वेलरीचा तोचतोचपणा त्यात नसतो आणि इतर ऑकेजन्सनाही तुम्ही ते वापरू शकता. लुकमध्ये प्रयोग करण्याची इच्छा असेल तर मोठय़ा इअररिंग्ज आणि स्टेटमेंट नेकपीस ट्रॅडिशनल वेअरवर घालून बघा. ट्रायबल थीमच्या बांगडय़ा, नेकपीस आणि मोठय़ा कॉकटेल रिंग तुमच्या लुकला वेगळेपणा देतील आणि ट्रॅडिशनल एथनिक वेअरची मजाही जाणार नाही.
(आशीष साबू, सीईओ, अ‍ॅडऑन्स अ‍ॅक्सेसरीज यांच्या सौजन्याने)