News Flash

बाराखडय़ांची क्रीम्स

सौंदर्योपचारांबाबत जागरूक असलेल्या मुलींना सध्या बाजारात आलेल्या बीबी, सीसी, डीडी या क्रीम्सबद्दल माहिती असेलच. युरोप, अमेरिकेत ही क्रीम लोकप्रिय झालीच आहेत. आपल्याकडेही दिसायला लागली...

| November 15, 2013 01:07 am

सौंदर्योपचारांबाबत जागरूक असलेल्या मुलींना सध्या बाजारात आलेल्या बीबी, सीसी, डीडी या क्रीम्सबद्दल माहिती असेलच. युरोप, अमेरिकेत ही क्रीम लोकप्रिय झालीच आहेत. आपल्याकडेही दिसायला लागली आहेत. पण या क्रीम्सचा नेमका वापर कुणी करावा? बाराखडीची ही क्रीम्स नेमकं  देतात काय?
सध्या टीव्हीवर कोणतंही चॅनेल लावा. ब्रेकमध्ये येणाऱ्या पाच जाहिरातींमधील एक किंवा दोन जाहिराती या फेअरनेस क्रीमच्या असतात. प्रत्येक क्रीम हे इतरांपेक्षा जास्त चांगलं असल्याचा दावा केलेला असतो. फेअरनेस क्रीम, सनस्क्रीन, अॅन्टी एजिंग क्रीम या आणि अशा कैक प्रकारची क्रीम्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या शर्यतीत आता नव्याने बीबी, सीसी आणि डीडी क्रीम्स भाग घेऊ पाहत आहेत. बीबी क्रीम काय आहे, याबाबत मात्र अजून तितकीशी जागरूकता नाही. ती क्रीम्स का वापरावीत, कुणी वापरावीत याबाबत अनभिज्ञता दिसते.
या क्रीम्सचा मूळ जन्म कोरियाचा. तेथील बाजारात बराच गवगवा झाल्यानंतर त्यांनी अमेरिकन आणि युरोपियन बाजारात शिरकाव केला. तिथेही बऱ्यापकी नाव कमावल्यावर आता त्यांची नजर भारतीय बाजारपेठेकडे फिरली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले या क्रीम्सचे ब्रँड्स बहुतेक करून परदेशी आहेत आणि तुलनेने बरेच महाग आहेत. परंतु त्यांच्या दाव्यांनी ते तरुणांची मनं आकर्षति करत आहेत.
या बाराखडीतलं पहिलं नाव म्हणजे ब्युटी बाम (बीबी क्रीम). सनस्क्रीन आणि मॉइश्चरायजर या दोघांचे गुणधर्म असलेली ही क्रीम्स फाऊंडेशन असण्याचा दावासुद्धा करतात. परंतु प्रत्यक्षात वापरताना फाऊंडेशनचा बेस असल्यामुळे हे क्रीम बेतानं आणि सांभाळून लावावं लागतं. क्रीम कमी लावलं तर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायजरचे गुणधर्म त्यातून कितपत मिळतील यात शंका आहे. जास्त लावलं तर चेहरा पांढरा फटफटीत दिसू शकतो. या क्रीमचा आणखी एक प्रश्न म्हणजे यात फारशा शेड्स उपलब्ध नाहीत. वर्णाप्रमाणं विविध शेड्समध्ये फाऊंडेशन्स उपलब्ध असतात. बीबी क्रीम्सनं मात्र फाऊंडेशन्सच्या विविध शेड्स द्यायची तसदी घेतली नाही. त्यामुळे क्रीम घेताना त्याची शेड आपल्याला सूट होईल की नाही ते तपासणं गरजेचं आहे.
बीबी क्रीम्सनंतर येतं ते सीसी क्रीम – म्हणजे कलर करेक्शन क्रीम्स. बीबी क्रीम्सपेक्षा एक पाऊल पुढे असणारी ही क्रीम सनस्क्रीन, फाऊंडेशन आणि मॉइश्चरायजरबरोबर चेहऱ्याची व्हिटॅमीन ‘ई’ आणि ‘सी’ची कमतरता पूर्ण करतात. फाऊंडेशनची शेड बीबी क्रीम्सपेक्षा यामध्ये लाइट आहे. त्यामुळे स्कीनकलरचा प्रश्न इथेही भेडसावतो. ही क्रीम्स काळी वर्तुळं, काळपट डाग यांना लपवून स्कीनटोन समान करतात. ज्या स्त्रियांना या समस्या आहेत त्यांनी सीसी क्रीम्सचा पातळ थर लावून नंतर फाऊंडेशन वापरावं.
या दोघांपेक्षा डेली डिफेन्स (डीडी) नावानं बाजारात नवी क्रीम्स आली आहेत. या क्रीम्सचे अस्तित्वच आता वादाचे बनते की काय अशी परिस्थिती आहे. मुळात ही क्रीम्स चेहऱ्यासाठी आहेत की हाता-पायांसाठी याबाबत कोणाचेही एकमत नाही. बीबी आणि सीसी या दोन्ही क्रीम्समध्ये असलेले गुणधर्म यातही आहेत. त्याच बरोबर ही क्रीम्स अॅन्टी एजिंगचंदेखील काम करतात. चेहऱ्याच्या फाइन लाइन्स किंवा सुरकुत्या कमी करत तुमच्या चेहऱ्यावरील संवेदनशील भागाचे संरक्षण करण्याचा दावा ती करतात.
आपण वापरत असलेल्या विविध क्रीम्सचे एकत्रित फायदे एकाच क्रीममधून देण्याचा दावा बीबी, सीसी आणि डीडी या बाराखडीतली क्रीम्स करतात. परंतु आपल्या स्कीनला कोणतं क्रीम सूट होईल हे पडताळून पाहायला हवं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 1:07 am

Web Title: fairness beauty cream
टॅग : Ladies
Next Stories
1 ग्लॅमरची वाट महानगरांबाहेर
2 पीक ऑफ द वीक
3 विष्णूज् मेन्यू कार्ड : नारंगी
Just Now!
X