29 September 2020

News Flash

अप टू डेट : फॅशनला परिपूर्ण करणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज

अ‍ॅक्सेसरीजमुळे तुमचा लूक परिपूर्ण आणि आकर्षक दिसतो. अ‍ॅक्सेसरीज तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातात.

| February 14, 2014 01:07 am

अ‍ॅक्सेसरीजमुळे तुमचा लूक परिपूर्ण आणि आकर्षक दिसतो. अ‍ॅक्सेसरीज तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातात. पण दागिने, पर्स आदी अ‍ॅक्सेसरीज योग्य प्रकारे वापरणं हीच खुबी आहे.
गेल्या लेखात आपण अ‍ॅक्सेसरीजच्या वापरातील संभाव्य चुकांबद्दल चर्चा केली, आज आपण अ‍ॅक्सेसरीजचे फॅशनमधील महत्त्व जाणून घेऊ. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जओि अर्मानी यांच्या मते, ‘अ‍ॅक्सेसरीज खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचे महत्त्व वाढतच आहे. अ‍ॅक्सेसरीजमुळे आपल्या पेहेरावाचे रूपच बदलून जाते. आणि स्त्रियांनाही त्यांच्या कपडय़ांच्या कलेक्शनमध्ये सतत वैविध्य हवेच असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, एखादा ठळक दागिना तुमच्या साध्याशा ड्रेसची शान वाढवू शकतो.’
खरोखर, अ‍ॅक्सेसरीज तुमचा लुक परिपूर्ण आणि आकर्षक बनवतात. अर्मानी यांनी सांगितल्याप्रमाणे, कपडय़ांप्रमाणेच अ‍ॅक्सेसरीज तुमचा नूर बदलून टाकतात. इतकंच नव्हे तर अ‍ॅक्सेसरीज तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातात. असं असूनही कित्येक स्त्री, पुरुष फॅशन करताना अ‍ॅक्सेसरीजच्या चुकीच्या वापराच्या भीतीनं किंवा अ‍ॅक्सेसरीजच्या योग्य वापराबाबत पुरेशी माहिती नसल्यानं, त्यांचा वापर करणं टाळतात.
याबाबतीत या लेखातून काही टिप्स द्यायचा प्रयत्न करते. मग पाहा निरनिराळ्या अ‍ॅक्सेसरीज वापरताना तुम्हाला खूप मजा येईल. कोणालाही हेवा वाटावा, असे अ‍ॅक्सेसरीजचं स्वत:चं कलेक्शन तयार करण्यासाठी तुम्ही लगेच कामाला लागाल.
तुमच्या नेहमीच्या वापरात असायलाच हव्यात, अशा अ‍ॅक्सेसरीज खालीलप्रमाणे

मिसमॅच्ड ईअिरग्ज : ईअररिंग्जमध्ये एक ‘मिसमॅच्ड’ ईअिरग्ज प्रकार असतो. खरं तर हे वापरणारी व्यक्ती खूपच मॉड असायला हवी. या प्रकारात ईअररिंग्जच्या जोडीत दोन भिन्न गोष्टींचा समावेश असतो. उदाहरणार्थ एका कानात ‘स्टार’ (चांदणी) असेल तर दुसऱ्यात ‘अ‍ॅरो’ किंवा डॅगर (सुरा) असू शकतो. किंवा हीच जोडी कप आणि बशी, नाही तर चूक आणि बरोबर असे दर्शवणारे क्रॉस आणि टिक असे असू शकते. एखाद्या पार्टीला जाताना हे तुम्ही नक्की घालू शकता. फक्त लक्षात असू द्या.. या ईअररिंग्जची लांबी खांद्यापर्यंत असायला हवी आणि अर्थात ते वजनालाही हलके असायला हवेत.
टीप : अशा मिक्समॅच्ड कॅज्युअल्सवर (खास करून डेनिम किंवा टी-शर्ट) जरूर ट्राय करा पण कीप रेस्ट ऑफ द लुक सिम्पल.

नेकलेस : विख्यात डिझायनर वेण्डेल रॉड्रिक्स यांच्या मते ‘फॅशन अ‍ॅक्सेसरीज नेहमी आकाराने मोठय़ा आणि चेहऱ्याच्या जवळ असल्या पाहिजेत.’ हे चंकी नेकलेसेसच्या बाबतीत अगदी परफेक्ट आहे. गळ्यातला एखादा चमचमणारा सर साध्याशा ड्रेसलाही शाही लुक देतो. रंगीबेरंगी सेमीप्रेशियस स्टोन्सने बनवलेला एखादा नेकलेस कॉलर बोनच्या खाली येईल असा घालावा. चेहरेपट्टी लांबट असल्याचा आभास निर्माण करायचा असेल तर थोडय़ा जास्त लांबीचा नेकलेस घालून पाहा. नाही तर एखादे पेंडंट (सध्याच्या स्टाइलप्रमाणे नेचर ट्रेण्डी फुला-पानांचे असेल तर उत्तम), विचित्र आकारातील (अमूर्त) नॉन शायनी सोनेरी रंगातील असेल तर लुक ‘वॉव’ दिसेल.
जर एथनिक किंवा रस्टिक लुक हवा असेल तर रेशीम किंवा सिल्क च्या धाग्यात गुंफलेलं मिरर वर्क केलेले गळ्यातलं हवं. आता हल्लीचा ट्रेण्ड आहे ‘लेअर नेकलेस’ चा. यासाठी नाजूक नेकलेस निवडा किंवा फॅशनमध्ये काही साहस करायचं असेल तर वेगवेगळी लांबी असलेले दोन नेकलेस ट्राय करा आणि मग पाहा, तुम्ही एंट्रीलाच प्रत्येकाचं लक्ष वेधून घ्याल.

स्कार्फ : आणखी एक महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी म्हणजे ‘स्कार्फ’! अगदी हर्मेसचा खूप महागडा नाही तरी प्रिण्टेड सिल्कचा स्कार्फ घ्यायला काहीच हरकत नाही. असा स्कार्फ प्लेन टँक किंवा गंजी कुर्त्यांला वेगळा लुक देऊ शकतो. स्कार्फ, तुम्हाला हव्या त्या प्रकारात तुम्ही वापरू शकता, यात तुम्ही तुमची स्टाइल बनवू शकता. उदाहणार्थ चमको रंगातला टँक टॉप आणि घोळदार स्कर्टवर जाकीट यासोबत स्कार्फ हा एकदम हटके लुक होईल.

बांगडय़ा आणि घडय़ाळ : ‘स्टॅक्ड बांगडय़ा’ (आकाराने मोठय़ा, एकावर एक रचलेल्या) बांगडय़ा सध्या स्टाइलमध्ये आहेत. आणि अर्थात फॅशन म्हणजे घडय़ाळ तर हवेच. फनी लुकसाठी रंगीबेरंगी बांगडय़ा एकत्र घाला. वेगवेगळ्या आकाराच्या धातूच्या बांगडय़ा आणि ब्रेसलेट्स गो ग्रेट ऑन फॉर्मल्स. एक काळजी घ्या, कामाच्या ठिकाणी कधीही काचेच्या बांगडय़ा घालू नका.

हॅट : आपल्या देशातील उष्ण हवामानामुळे असेल कदाचित पण एकंदरीतच फॅशन म्हणून ‘हॅट’ आपल्याकडे कमी वापरली जाते. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते. जर ‘हॅट’चा योग्य वापर केला तर आपल्या फॅन्सी लुकमध्ये कमालीची वाढ होते, हे नक्की. सुरुवातीला तुम्ही ‘बोलेरो हॅट’ ट्राय करा, म्हणजे पांढरा टी-शर्ट, जीन्स, वेस्टकोट आणि हॅट किंवा ‘पीझंट ड्रेस’ (१२ व्या शतकातील युरोपियन कष्टकरी महिलांचा पेहराव) आणि हॅट असं काही तरी घालून तर बघा आणि पाहा काय प्रतिक्रिया मिळतील? सर्वात पहिले योग्य हॅट निवडता यायला हवी. ज्युलिया रॉबर्ट्स एकदा म्हणाली होती तसं.. विस्कटलेले केस सफाईदारपणे लपवायचे असतील तर ‘हॅट’ नक्की कामास येईल.

हेअर अ‍ॅक्सेसरीज : याबद्दल बोलायचं झालं तर ‘बंधाना’ (डोक्याला बांधायचा रुमाल), हेडबॅण्ड्स (आजकाल कापडाचे, गाठ मारलेले हेडबॅण्ड्स इन आहेत) आणि सुंदर ‘क्रिस्टल क्लिप्स’ तुम्हाला ‘सही’ लुक देतील.

कॉकटेल रिंग्ज : फॅशनच्या बाबतीत विचाराल तर ‘रिंग्ज’(अंगठी)चा वापर कोणीही करावा. फारशी मेहनत न घेता लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम ‘रिंग’ करते. तुमच्या सुपर कॅज्युअल्स, सुपर स्पोर्टी ड्रेसवर एखादीच ‘रिंग’ अ‍ॅक्सेसरी म्हणून घातली तर कमाल करून जाते. विचित्र आकाराची, मोठा खडा असलेली, प्राण्या-पक्ष्यांच्या आकाराची अंगठी कोणत्याही बोटात घाला की झालं काम. ज्यांना बोलताना हातवारे करायची सवय असते, त्यांना या अ‍ॅक्सेसरीचा चांगलाच उपयोग करता येतो.

बॅग : महिलांच्या फॅशन अ‍ॅक्सेसरीजबद्दल विचार करताना ‘बॅग’ विसरून कसं चालेल? तिचा आकार आणि प्रकार दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ स्लिम (सडपातळ) फिगर असलेल्या स्त्रीला आकाराने भली थोरली बॅग मुळीच शोभत नाही. बॅग नेहमी बहुउपयोगी (युटीलिटी +स्टाइल) पण स्टायलिश, रुबाबदार, आकर्षक आणि अर्थात मजबूत हवी.
पुरुषांनी वापरायच्या अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचं झालं तर, त्या फक्त टिकाऊ असून भागणार नाही तर त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या उत्तम निदर्शक असणंही गरजेचे आहे. उदाहरणार्थ चांगल्या प्रतीचं, असली चामडय़ाचं पाकीट, मेटल(धातू)च्या पट्टय़ाचं क्रोनोग्राफ (घडय़ाळाचा एक प्रकार) घडय़ाळ या अ‍ॅक्सेसरीज तुम्हाला ऑफिस ते पार्टी सर्व ठिकाणी वापरता येतील. कफलिन्क्स आजकाल फारशी वापरली जात नाहीत, पण त्यांची शान काही औरच असते. शर्ट आणि डिनर जॅकेटसोबतचा कफ्लिन्क्सचा वापर जुन्या नवाबी काळातला खानदानी आब तुम्हाला परत मिळवून देतो. याशिवाय तरतऱ्हेच्या टाइजचा सेटही तुमच्याजवळ हवा. म्हणजे फनी इव्हेंट्ससाठी वैचित्र्यपूर्ण िपट्र असलेला, पार्टीसाठी रंगीबेरंगी आणि रेघा असलेला सिल्कचा आणि काळा टाय फॉर्मल्ससोबत घालण्यासाठी.
एखाद्या पुरुषाच्या वापरातील अ‍ॅक्सेसरीजवरून त्याच्याबद्दल बरेच अंदाज करता येतात. तेव्हा कोणतीही कंजुषी न करता सढळ हाताने अ‍ॅक्सेसरीजवर खर्च करा. हाच खरा फंडा आहे.
इन शॉट, चवदार जेवणात मीठ जे काम करतं ते कपडय़ांच्या बाबतीत अ‍ॅक्सेसरीज करत असतात. आपल्या कपडय़ांना उठावदार आणि फॅशनला परिपूर्ण बनवण्यासाठी अ‍ॅक्सेसरीज हव्यात. तेव्हा अ‍ॅक्सेसरीजना विसरू नका.
अनुवाद : गीता सोनी 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:07 am

Web Title: fashion accessories
Next Stories
1 ‘व्ही’ डे सेलिब्रेशन गाइड
2 ओपन अप : प्रेमातली ‘डिमांड’
3 बॉलीवूड इस्टाइल
Just Now!
X