05 August 2020

News Flash

फॅशनचे रंग बरसे!

होळी म्हणजे रंगांचा महोत्सव.

|| तेजश्री गायकवाड

होळी म्हणजे रंगांचा महोत्सव. मात्र होळी आणि त्यापाठोपाठ येणारी रंगपंचमी हे एकाच वेळी वातावरणात रंग भरणारे असतात. तर फॅ शनचा विचार करता क लरफुल कपडय़ांबरोबरच सफेद रंगातील डिझायनर वेअर्सही तितकेच महत्त्वाचे ठरतात. पांढऱ्याशुभ्र कपडय़ांवर पिचकारीतून रंग बरसतात तेव्हा खऱ्या अर्थाने रंगपंचमी साजरी होते. अर्थात, कपडय़ांचा रंग कोणताही असला तरी रंग बरसणारच हे लक्षात घेऊन या होळीसाठी फॅशनचे कुठले ट्रेड्स फॉलो करता येतील हे लक्षात घेऊ या..

यंदाही मागच्या वर्षीप्रमाणे रंगांची उधळण इंडोवेस्टर्न फॅशनेबल कपडय़ांमधून होणार आहे. तरुणाईचा कल नेहमीच काही तरी नवीन आणि हटके करण्याकडे असतो आणि यासाठी तरुणाई नवनवीन ट्रेण्ड्स, फॅ शनवरती लक्ष ठेवून असते. हेवी कपडय़ांपेक्षा होळीलाही हलके, कम्फर्ट देणारे, नंतर कधीही वापरता येतील आणि कमी किमतीत सहज उपलब्ध असणाऱ्या कपडय़ांवर त्यांचा भर असतो. त्यामुळे सध्या तरुणाई इंडोवेस्टर्न, वेस्टर्न, फ्यूजन अशा सगळ्याच प्रकारची फॅशन फॉलो करताना दिसते आहे.

घागरा / स्कर्ट्स

इंडोवेस्टर्न आउटफिट्समध्ये घागरा नाही असं होऊच शकत नाही, कारण सध्या घागरा आणि स्कर्ट्स हेच नवीन ट्रॅडिशन झालं आहे. पटोला, इकतचे घागरे अनेक वर्षांपासून ट्रेण्डमध्ये आहेत आणि ते ट्रेण्डमध्येच राहतील. पण याशिवाय यंदा घागऱ्यामध्ये कलमकारी वर्क, मिथिला आर्ट केलेले घागरे ट्रेण्डमध्ये आहेत. अनारकली घागरे आणि सक्र्युलर कट घागरेही नेहमीप्रमाणे इन फॅशन आहेत. पण यंदा अनारकलीच्या कळीमध्ये वेगवेगळे डिझाइन किंवा कलरच्या कळी जॉइंट करून अनारकली घागऱ्यांना थोडा हटके लुक देण्यात आला आहे. प्रिंटमध्ये ओव्हरऑल प्रिंट, फक्त बेल्ट किंवा बॉटमला प्रिंट असलेला घागरा तर अगदी मानवी आकार असलेले मोटिफसुद्धा यंदा ट्रेण्डमध्ये आहेत. फेस्टिवल सीझनमध्ये हमखास स्कर्ट घातले जातात. ट्रॅडिशनल स्कर्ट्सवरती वेस्टर्न टॉप किंवा वेस्टर्न स्कर्ट्सवरती ट्रॅडिशनल टॉप असं कॉम्बिनेशन घालू शकतो. ट्रॅडिशनल प्रिंट्स किंवा कपडय़ापासून बनवलेला स्कर्ट आणि त्यावरती केप, शर्ट, ऑफशर्ट टॉप, कोल्ड स्लीव्ह टॉपही घालता येईल. आणि वेस्टर्न प्लेन स्कर्टवरती फ्रंट कट टॉप, ब्लाऊ ज, टी-शर्ट घालू शकता. या दोन्ही लुकवरती नेकपीस, जॅकेट्स, स्टोल, ओढणी वापरता येईल.

कुर्ती

गेल्या दोन वर्षांपासून सगळ्यात जास्त ट्रेण्डमध्ये आहे ती म्हणजे कुर्ती. कुर्ती घर, ऑफिस, कॉलेज ते अगदी पार्टीपर्यंत सगळीकडे वापरली जाते. मग ही कुर्ती फेस्टिव्ह सीझनमध्ये वापरली जाणार नाही असं कसं होईल? शॉर्ट लेन्थ ते अगदी अ‍ॅकल लेन्थपर्यंतच्या कुर्तीही ट्रेण्डमध्ये आहेत. फ्रंट कट कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती,  शॉर्ट कुर्ती, असमान हेमलाइन असेली कुर्ती, अनारकली कुर्ती, हाय-लो कुर्ती, शॉर्ट पेपलम कुर्ती, जॅके ट स्टाइल कुर्ती असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या कुर्ती तुम्ही स्कर्ट्स, स्ट्रेट पॅण्ट, लेगिंग्जबरोबर पेअर करू शकता.

सलवार कमीज

बेसिक पटियाला सलवार  आणि त्यावरती घातली जाणारी शॉर्ट कुर्ती किंवा कमीज नेहमीच ट्रेण्डमध्ये असते. पण यंदा हीच पटियाला सलवार वेगळ्या रूपात म्हणजेच धोती पॅण्ट्सच्या रूपात बाजारात आली आहे. धोती पॅण्ट्सची फॅशन काही वर्षांपूर्वी बाजारात आली होती. आता तीच फॅशन थोडा हटके लुक घेऊन पुन्हा ट्रेण्डमध्ये आली आहे. या धोती पॅण्ट्सवरती तुम्ही क्रॉप ट्रॅडिशनल टॉप, कुर्ती, केप, फ्रंट आणि साइड कट कुर्ती घालू शकता. ट्रेण्डमध्ये असणारी प्लाझो आणि कुर्ती किंवा टॉपही तुम्हाला घालता येईल. कुर्ती आणि स्ट्रेट पॅण्ट्सचाही पर्याय नक्की ट्राय करून बघा.

लुक्स विथ जीन्स

जीन्स आणि तरुणाई यांचं नातं नवीन नाही. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी आणि कितीही अनकम्फर्टेबल वाटणाऱ्या जीन्सला तरुणाई नेहमीच पसंती देते. म्हणूनच हे काही लुक्स जे तुम्ही जीन्सबरोबर करून फ्यूजन लुक मिळवू शकता.

  • जीन्सवरती एखादा प्लेन क्रॉप टॉप घाला. आणि त्यावरती भरजरी वर्क केलेला दुपट्टा घ्या. हा दुपट्टा तुम्ही गुजराती साडीप्रमाणेही ड्रेप करू शकता. यावरती ट्रॅडिशनल किंवा वेस्टर्न असा कोणताही बेल्ट घालायला विसरू नका.
  • जीन्स आणि त्यावर नॉर्मल लेन्थची कुर्ती. या साध्याशा लुक वर तुम्ही हेवी वेस्ट बेल्ट, मोठे कानातले, नेकपीस घाला.
  • जीन्स आणि प्लेन इनर किंवा सॅण्ड्रोवरती तुम्ही पोनचो तयार करून घालू शकता. यासाठी तुम्ही मोठय़ा ओढणीचा वापर करू शकता. किंवा ओढणीच्या दोन टोकांना गाठ मारून तुम्ही ओढणी जॅकेटप्रमाणेही घालू शकता. फक्त यावरती टॅडिशनल कवडय़ांचा बेल्ट किंवा गोंडय़ाचा बेल्ट नक्की घाला.
  • ब्लाऊज किंवा चोळीसुद्धा तुम्ही जीन्सवरती घालू शकता. फक्त यावरती योग्य ती ज्वेलरी घालायला हवी.
  • टँक टॉप आणि जॅकेट, जीन्स हे कॉम्बिनेशन अनेकांच्या पसंतीस उतरतं. प्लेन टँकवरती भरजरी लाँग किंवा शॉर्ट साइज जॅकेट घाला. आणि यावर तुम्ही नाजूकसा वेस्ट बेल्ट, लाँग नेकपीस आणि हेवी कानातले घालू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2019 12:07 am

Web Title: fashion cloth in holi festival
Next Stories
1 सातत्यशील प्रयत्न हाच यशमंत्र – अमृता खानविलकर
2 समाजमाध्यमांतील एकतर्फी सूर
3 हार्दिक जोशी
Just Now!
X