प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.

नमस्ते, मी अजिंक्य. नाशिक येथे राहतो. माझी उंची ५.३ असून वजन ५८ किलो आहे. माझा वर्ण गोरा आहे आणि उत्तम बॉडी बिल्ट आहे. मला काही चांगले पर्याय सुचवा.

हॅलो अजिंक्य,
तुझं मेल बघून बरं वाटलं. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनीसुद्धा नीटनेटकं राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तू वेल बिल्ट आहेस हे खरंच  छान आहे. तू नक्कीच त्यासाठी मेहनत घेत असशील. तुझी उंची आणि वजन प्रपोर्शनेट आहे. पण उंची थोडी कमी असल्यामुळे  काही प्रमाणात लुक मॅनेज करणं तुझ्यासाठी अवघड होत असेल, पण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यात तू छान आणि कॉन्फिडण्ट फील करू शकशील.
पहिल्यांदा एखादा छानसा स्टायलिश हेयर कट करून घे. दोन्ही साइड्स आणि डोक्याच्या मागच्या बाजूचे केस बारीक करून डोक्यावर मोठे केस अशा प्रकारचा हेअर कट केलास तर तुझी उंची मोठी दिसायला मदत होईल आणि एक छान कुल लुक मिळेल. तुझी वेल बिल्ट बॉडी असल्याने वेल फिटेड शर्ट्स आणि टी-शर्ट्स वापर. जेणेकरून तू बारीक आणि उंच दिसशील. तुझा वर्ण गोरा असल्यामुळे नेव्ही ब्लू, ग्रीन, रेड, व्हाइट, ब्लॅक, केली ग्रीन हे कलर्स तुला खूप छान दिसतील. भडक रंग वापरणं पूर्णपणे टाळ. पेस्टल शेड्समधील म्हणजे लेमन, मिंट ग्रीन, पाउडर ब्लू, पीच हे रंग खूप छान दिसतील. तसेच व्हर्टकिल डिझाइन्स, स्ट्राइप्स वापरलेस तर उंच दिसायला मदत होईल. शर्ट्स आणि टी-शर्ट्स नेहमी टक इन करत जा आणि सोबर बकल असलेला डार्क लेदर बेल्ट त्याबरोबर वापर.
बॉटम्समध्ये जीन्स किंवा पॅण्ट्स वापरशील त्या चांगल्या फिटिंगच्याच ठेव. जेणेकरून तू बारीक आणि त्यामुळे उंच दिसशील. शॉर्ट्स आणि थ्री फोर्थ वापरू नकोस. त्यामुळे तुझी उंची अजूनच कमी दिसेल. नेवी ब्लू, बेज, खाकी, क्रीम असे बेसिक रंग बॉटम्समध्ये वापर. कॅनव्हास शूज विथ लेसेस आणि व्हाइट सोल्स खूप ट्रेंडी आणि युथफूल दिसतील. लोफर्स किंवा सिम्पल लेदर सॅण्डल्स तर खूप छान. सिम्पल पण तरीही क्लासी लुक मिळेल. एखादं मस्त घडय़ाळ एकदम छान दिसेल. चांगल्या गोष्टी विकत घे. जेणेकरून तुझ्या उंचीकडे फारसं लक्ष जाणार नाही. मे बी एखादी लेदर बॅग, सन ग्लासेस अशा वस्तूंवर खर्च कर.
पोश्चरकडे विशेष लक्ष दे. ताठ बस, सरळ चाल, पोक न काढता चाल आणि उभा राहा. चेस्ट आउट, चिन अप अशा ठेवणीमुळे आणि या सगळ्यांमुळे एकूणच उंचीचा आभास  निर्माण होईल. बी कॉन्फिडण्ट, स्टे कुल.
अमित दिवेकर
(अनुवाद – प्राची परांजपे) -viva@expressindia.com