प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
नमस्कार मी स्नेहल, मी २० वर्षांची आहे. माझं वजन ३९ किलो आहे. मी खूपच बारीक आहे. बारीक असल्यामुळे शॉर्ट कपडे घालायला मला जरा अवघडल्यासारखं होतं. मला शोभतील असे शॉर्ट लेन्थ कपडे सुचवा, ज्यात मी कॉन्फिडंट फील करू शकेन.
हाय स्नेहल,
सर्वप्रथम तू बारीक आहेस हे सत्य तू स्वीकार आणि त्याबद्दल तू आनंद मान. कारण जवळ जवळ ९० टक्के व्यक्ती तुझ्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वयानुसार नक्कीच तुझं वजन वाढेल आणि त्या वेळी कदाचित तू बारीक असण्याला मिस करशील. महत्त्वाचं म्हणजे, लाजू नकोस. तू शॉर्टं कपडे घालायला अजिबात संकोच करू नकोस. तुझ्यासारख्या बारीक व्यक्तींसाठीच ते असतात, असं म्हणायला हरकत नाही. शॉर्ट जंपसूट ट्राय कर. ते जरा लूज असतात त्यामुळे तू खूप बारीक वाटणार नाहीस. त्याबरोबर चांगला पर्याय म्हणजे शॉर्ट वन पीस ड्रेसेस.
डेनिम शॉर्ट्स तसेच कलरफुल शॉर्ट्स विथ क्रॉ टॉप्स हे कॉम्बिनेशन खूप छान दिसेल. एखाद्या लूज टॉप बरोबर डेनिम शॉर्ट स्कर्ट खूप मस्त दिसेल. ड्रेप टॉप्स किंवा शॉर्ट ड्रेप ड्रेसेससुद्धा चांगला पर्याय आहे. त्याला लेयर असल्यामुळे त्यात तू बारीक दिसणार नाहीस. छान ब्राईट आणि मिड टोन रंगांचे कपडे वापर आणि त्याचबरोबर व्हाइट कलर खूप वापर. तू त्यात बारीक दिसणार नाहीस आणि त्याचबरोबर एलीगंट दिसशील. डार्क कलर्स घालणं टाळ. जास्त टाईट कपडे घालू नको. त्यामुळे तू जास्त बारीक दिसशील. जास्त गॅदर, प्लीट्स असलेले कपडे वापर. कपडय़ांमध्ये लेअरिंग असू दे. स्पगेटी त्यावर लूज टीशर्ट आणि त्या जोडीला नी लेन्थ शॉर्ट्स असं काही तरी कायम करत राहा. जर तू तुझ्या पायांमुळे कॉन्शियस होत असशील तर स्टॉकिंग्स घालू शकतेस. लेस असलेल्या स्टॉकिंग्समुळे तुझे पाय जास्त बारीक दिसणार नाहीत. अशा काही क्लृप्त्या वापरून तू नक्कीच छान दिसू शकशील. स्कार्फ वापर, हेवी नेकपिसेस घाल किंवा छान कानातले घाल. मुळात आत्ताच तू शॉर्ट कपडे वापरून घे. मोठं झाल्यावर तू हे सगळं नाही घालू शकणार आणि तेव्हा या सगळ्या कपडय़ांना मिस करशील.
हॅव फन !!
(अनुवाद : प्राची परांजपे)