गायत्री हसबनीस – viva@expressindia.com

गेल्या वर्षभरात बदललेल्या परिस्थितीमुळे फिटनेसला आपल्या लाईफस्टाईलमध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. फिट राहण्यासाठी जिम, योगा, झुम्बापासून ते अगदी रोजच्या रोज चालणे-धावणे, सायकलिंग असे अनेक पर्याय पडताळून पाहिले जात आहेत. फॅ शन आणि फिटनेस दोन्हीच्या बाबतीतला आदर्श म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा ओळखली जाते. तरुणींनी कु ठलाही न्यूनगंड मनात न ठेवता फिटनेससाठी वेळ दिला पाहिजे, आपली हेल्दी लाईफस्टाईल आणि फॅ शन स्टेटमेंटही स्वत:च विकसित के ली पाहिजे, असा सल्ला मलायकाने या महिला दिनाच्या निमित्ताने तरूणींना दिला आहे.

फिटनेसमध्ये चोख असलेली मलायका अरोरा स्वत:ची स्टायलिश आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्व ही ओळख कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. ग्लॅमर जगतात फॅ शन आणि फिटनेस दोन्ही समीकरणे साधण्यात यशस्वी ठरलेल्या मलायकाची स्टाईल स्टेटमेन्ट आजही चर्चेचा विषय असते. तिच्या मतेलॉकडाऊनमुळे जगभरात प्रत्येकाची फॅशनची व्याख्या बदललेली आहे आणि हा बदल सकारात्मकच असल्याचे ती सांगते. लॉकडाऊन आणि त्यानंतर सुरू झालेले न्यू नॉर्मल लाईफ यामुळे फॅ शन ट्रेण्डमध्ये झालेले बदलही महत्त्वाचेच आहेत, असं ती सांगते. स्टाईल स्टेटमेन्ट, लुक आणि ग्लॅमर या तिघांच्या अनुषंगाने विविध प्रकारची फॅशन आपण आजमावू शकलो असं म्हणत मलायका सध्या स्ट्रीट स्टाईल फॅशनला प्राधान्य असल्याचं सांगते.  लाऊंजवेअर आणि अ‍ॅथ्लेझर (athleisure) या ट्रेण्डचा येत्या काही दिवसांत दबदबा असेल, अशी माहिती तिने दिली. ‘गेलं संपूर्ण वर्ष आपल्यासाठी कठीण होतं. त्यातूनही बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या ज्याचा प्रभाव फॅ शन इंडस्ट्रीवरही पडला. फॅशनच्या क्षेत्रातही खूप चांगले बदल होत राहिले. लॉकडाऊनमुळे सगळे घरी बसून होते तरीसुद्धा फॅशन काही थांबली नाही. उलट फॅशन आणि कम्फर्टनेस दोन्हीही एकत्रितपणे अनुभवता आले,’ असे ती सांगते.

फॅ शनचा एखादा प्रकार बाजारात रुळला की तोच फॉलो करणारा असा एक मोठा वर्ग असतो, तर दुसरीकडे असाही एक तरुण वर्ग पहायला मिळतो जे स्वत:ची अशी स्टाईल स्टेटमेन्ट विकसित करण्यावर भर देतात. खासकरून फॅब्रिक, रंग आणि पॅटर्न्‍समध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो. मलायका नक्की फॅशन कशी फॉलो करते?, असा प्रश्न तिला विचारताच सर्वात जास्त कम्फर्टेबल फील देणारे कपडे परिधान करायला मला आवडतात, असे तिने सांगितले. एखाद्या ड्रेसमध्ये आपण कम्फर्टेबल असलो की तो कम्फर्ट आपल्या व्यक्तिमत्त्वातही जाणवतो. आपण ज्या पद्धतीचे कपडे परिधान करतो त्यातून आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे, याकडे तिने लक्ष वेधले. फॅ शनच्या बाबतीत नवनवे ट्रेण्ड्स आजमावून पाहण्याचा आपला प्रयत्न असतो, कु ठलेही रूढ फॅ शन ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा स्वत:च प्रयोग करून पाहणे जास्त आवडत असल्याचेही तिने सांगितले.  मलायका सध्या ‘रिबॉक’ या फिटनेस ब्रॅण्डच्या नव्या कलेक्शनचे प्रतिनिधीत्व करते आहे. रिबॉकचे अ‍ॅथ्लेझर वेअर आणि जिमवेअर मला प्रचंड आवडतात, ते कम्फर्टेबलही वाटतात आणि खूप ट्रेण्डीही दिसतात, असे तिने स्पष्ट के ले.

मलायकाचा फिटनेस फंडा

एक आघाडीची कलाकार आणि नृत्यांगना म्हणून मलायका प्रसिद्ध आहे. ती स्वत:ला विकसित करण्यासाठी खूप वेळ देते, फिटनेससाठीही ती आवर्जून वेळ काढते. आपलं काम आणि फिटनेस बॅलन्स करताना मलायका प्रांजळपणे सांगते, ‘फिटनेसचा माझ्या कामाशी खूप मोठा संबंध आहे. कामासारखा व्यायाम नाही आणि व्यायामासाठी काम हवंच. कामामुळे मला खूप फिट राहता येतं. मुळातच फिट आणि हेल्दी लाईफस्टाईल असल्याने माझ्या कामातूनच मला १०० टक्के शक्ती आणि उर्जा मिळते. मी सकाळी ऊठून नियमित योगा करते तसेच वर्क—आऊटचे इतर प्रकारही करते. थोडक्यात सांगायचे झाले तर दिवसभर हेल्दी जेवण घेणं आणि न विसरता दररोज सकाळ – संध्याकाळ व्यायाम करणं हे मी कधीच सोडत नाही. माझ्या तंदुरुस्त जीवनशैलीचा तो एक भागच आहे, त्यामुळे सदैव मी कामाच्या ठिकाणी शारिरीक आणि मानसिकरीत्या उत्साही आणि आनंदी असते’. आपल्या फिटनेसचं गुपितही ती मनमोकळपणाने सांगते, ‘फिटनेस तुमच्या आत्मविश्वासावरच अवलंबून असतो आणि आत्मविश्वास असेल तरच स्त्रीचं सौंदर्य खुलून येतं. तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नसते, आपण सगळ्याजणी आतूनच खूप सुंदर असतो. तुमचे शरीर असो, काम असो वा तुमचा फिटनेस.. कोणत्याही बाबतीत मुलींनी मनात न्यूनगंड बाळगता कामा नये. तुमच्याजवळ जे आहे त्याचा अभिमान बाळगा’,  असा मोलाचा सल्ला मलायकाने महिला दिनाच्या निमित्ताने समस्त तरुणींना दिला आहे.