16 December 2017

News Flash

फॅशन पॅशन : स्मार्ट फॉर्मल्स

मी २२ वर्षांची विवाहित तरुणी असून माझा रंग गोरा आहे. उंची ५.३ फूट आहे

मृण्मयी मंगेशकर - viva.loksatta@gmail.com | Updated: March 7, 2014 1:10 AM

मी २२ वर्षांची विवाहित तरुणी असून माझा रंग गोरा आहे. उंची ५.३ फूट आहे आणि वजन ५३ किलो आहे. मी तशी थोडी जाड आहे. म्हणजे थोडं पोट पुढे आलं आहे. मी जीन्स- टीशर्ट, लाँग कुर्ते, साडी सगळंच आवडीने घालते. माझे केस खांद्याच्या थोडे खाली आणि कुरळे आहेत. मला कुठले कपडे फॉर्मल वेअर म्हणून शोभून दिसतील ते सांगा.
-अश्विनी गायकवाड

प्रिय अश्विनी,
पहिल्यांदा मला तुला हे सांगायचंय की, तू अजिबात जाड वगैरे नाहीयस. ५.३ फूट उंचीला ५५ किलो वजन हे जास्त नाही. तुझं पोट सुटलंय म्हणतेस ते खरं असू शकेल. तरीही, माझ्या मते तू खरं तर सगळ्या प्रकारचे कपडे व्यवस्थित कॅरी करू शकशील. पोट दिसू नये म्हणून थोडी काळजी घे. म्हणजे ते थेट पाहणाऱ्याच्या डोळ्यात येणार नाही. पुढे आलेलं पोट झाकण्यासाठी त्यासाठी कपडय़ांची नैसर्गिक वेस्टलाईन थोडी हलवणे हा एक उत्तम उपाय आहे. योकवाले ड्रेस वापर म्हणजे पोट लपले जाईल. वेस्टलाईनला ट्रान्सपरंट फॅब्रिकचे कपडे घाल त्यामुळेदेखील तुझं पोट सुटल्यासारखं वाटणार नाही.
फॉर्मल वेअरसाठी ऑकेजन बघून तू स्कर्ट- शर्ट किंवा चुणीदार- कुर्ता, शर्ट- ट्राउझर्स, प्लेन किंवा छोटय़ा बॉर्डरच्या साडय़ा काहीही घालू शकतेस.
शर्ट-स्कर्टवर ब्लेझर किंवा त्याच ताग्यातलं जॅकेट परफेक्ट दिसतं. आजकाल स्ट्रेटकट किंवा नॅरोकट सिंपल जीन्स आणि वर फॉर्मल शर्ट हा पेहरावदेखील फॉर्मल म्हणून गणला जातो.
पार्टीवेअरसाठी तुला भरपूर चॉईस आहे. लग्नाचं रिसेप्शन असेल, एखादी डिझायनर साडी आणि वर सेक्सी ब्लाऊझ घालू शकतेस. किंवा लेहंगा घालायलादेखील हरकत नाही. घरातच पार्टी असेल तर जीन्स आणि एखादा ग्लॅमरस टॉप घालता येईल. कॉकटेल पार्टी असेल तर छानसा इव्हनिंग गाऊन किंवा वन-पीस ड्रेस ट्राय करायला हरकत नाही. डिस्को किंवा डान्स पार्टीला शॉर्ट स्कर्ट आणि ग्लॅमरस टॉप घालता येईल.
आपल्या फॅशनविषयक शंका पुढील आयडीवर आम्हाला पाठवा.

First Published on March 7, 2014 1:10 am

Web Title: fashion passion smart formal