malikaप्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
हाय मी काजल,
माझी उंची ५ फूट १ इंच असून वजन ५४ किलो आहे. माझा वर्ण सावळेपणाकडे झुकणारा आहे. आमच्या ज्युनिअर्सनी आमच्यासाठी फेअरवेल पार्टी आयोजित केली आहे आणि ही पार्टी ‘बॉलरूम पार्टी’ या थीमवर आधारित असणार आहे. यासाठी मला तुमच्याकडून काही ड्रेसिंग, स्टायलिंग टिप्स मिळतील का?

हॅल्लो काजल,
गुड, फार चांगला प्रश्न आहे तुझा. तुमच्या पार्टीची थीम आहे बॉलरूम पार्टी.. बरोबर? तेव्हा या पार्टीसाठी तुझं ड्रेसिंगसुद्धा एकदम ग्रँड स्टायलिश झालं पाहिजे नाही का? बॉलरूम पार्टीज या सामान्यत: भव्य, मोकळ्या जागेत आणि तुलनेने उंच अशा बंद हॉल वजा खोलीत होतात. पाश्चात्त्य पद्धतीच्या संगीतावर, मंद प्रकाशात होणारी ही डान्स पार्टी असते. अर्थातच बॉलरूम डान्स यामध्ये केला जातो. बॉलरूम डान्सिंग जोडीनं करायचं नृत्य आहे. आता या सगळ्याचा विचार तुला तुझा पार्टीवेअर ठरवताना करायचा आहे. बॉलरूम पार्टीला कॅज्युअल वेअर कधीच घालत नाहीत, हे लक्षात ठेव. तुला शोभून दिसणाऱ्या ड्रेसच्या प्रकारांबद्दल बोलायचं झालं तर, मॅक्सी ड्रेस किंवा इव्हनिंग गाऊनसारखा ड्रेस हा प्रकार अशा पार्टीजसाठी गुड ऑप्शन ठरू शकतात. याचं मुख्य कारण म्हणजे मॅक्सी ड्रेस या पायघोळ ड्रेसच्या प्रकारात आपण उंच असल्याचा आभास निर्माण होतो. अर्थात यासाठी योग्य प्रकारची उंच टाचांची पादत्राणे मस्ट आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बॉलरूम थीम पार्टीला निमुळत्या टाचा असलेलीच पादत्राणे घालायला हवीत. यामुळे आपला लुक क्लासी, ग्रेसफुल दिसायला मदत होते. आता ड्रेसच्या रंगांबद्दल विचारशील तर काळा आणि पीच कलर हे उत्तम पर्याय आहेत. खरं सांगायचं तर काळ्या रंगाचा ड्रेस दिसतोही छान आणि कोणत्याही पार्टी इव्हेंटसाठी योग्य आहे. कारण हा निगा राखायलाही सोपा. आता ड्रेसचा गेटअप वाढवणाऱ्या अ‍ॅक्सेसरीजचा विचार करूया. ड्रेसचा रंग काळा असेल, तर त्यावर ठसठशीत नेकपीस, ग्रेट स्टाइल होईल आणि पूर्ण पार्टीत तू सर्वाचे लक्ष वेधून घेशील हे नक्की. पण तुझा ड्रेस जर मंद रंगसंगतीचा असेल तर मात्र नाजूक, हलकेफुलके दागिने, उदाहरणार्थ हिरा, सॉलिटेअर (एकच अखंड स्वतंत्र खडा जडवलेला दागिना), पातळसे ब्रेसलेट, यांत तुझा लुक कम्प्लिट चार्मिग दिसेल.        
या शिवाय बॉलरूम थीम पार्टीसाठी योग्य ड्रेस म्हणजे ‘लिटिल ब्लॅक ड्रेस’.. एलबीडी! (पूर्ण काळ्या रंगातील वनपीस प्रकारचा ड्रेस कमी लांबीचा, फारतर गुडघ्यापर्यंत असतो) खरं तर प्रत्येक तरुण मुलीच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी एलबीडी असायलाच हवा. अशा ड्रेसवर छान, साधे सिंगल लाइन पर्ल्स  आणि छोटंसं क्लच म्हणजे मस्त. यांत अजून स्टायलिंगचे प्रयोग करायचेच असतील तर तू वेगवेगळे हेअरबँड, हॅट वापरू शकतेस, मात्र त्यासाठी तुझे केस कुरळे किंवा वेव्ही असता उपयोगाचे नाही, ते अगदी सरळ असणे गरजेचे आहे. तुझे केसही जर स्ट्रेट असतील तर तू, बारीक सोनेरी साखळी लावलेला हेअरबँड किंवा टोपी ट्राय कर, कुल दिसेल. सो काजल, गेट रेडी, इट्स पार्टी टाइम डिअर, चिल & एन्जॉय.        
मलाइका अरोरा खान
(अनुवाद : गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com  

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.