13 August 2020

News Flash

युथफुल स्टायलिंग

प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.

| April 3, 2015 01:09 am

malikaप्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
हाय, मी शिवानी जोशी, मी एकोणीस वर्षांची असून माझी उंची ५ फूट २ इंच आहे आणि वजन ४६ किलो आहे. मला नवनवीन फॅशन्स करून स्टायलिश राहायला फार आवडेल. माझे केस लांब आणि सिल्की आहेत. मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाताना कोणत्या ड्रेसिंग स्टाइल्स, हेअर स्टाइल्स आणि फॅशन्स मला योग्य दिसतील? याबद्दल, आपल्याकडून काही टिप्स मिळतील का?
-हाय शिवानी

हे शिवानी,
वॉव, तुला नवनवीन फॅशन्स करून स्टायलिश राहायची इच्छा आहे.  गुड, फॅशनेबल राहाण्यासाठी हे तुझं योग्य वय आहे. फ्रेश आणि ट्रेंडी स्टाइल्स करून तुला नेहमी युथफुल आणि ताजेतवाने राहायला आणि दिसायला मदतच होईल. लेटेस्ट फॅशन कोणती हे जाणून घेण्यासाठी फॅशनचा विचार सतत मनात असला पाहिजे. आजूबाजूला कायम लक्ष असलं पाहिजे. इंटरनेट, वर्तमानपत्रं किंवा जेथून शक्य होईल तेथून स्टायलिंग आणि फॅशनबद्दल माहिती मिळवून, जागरूक राहाण्याचा प्रयत्न कर. सर्वप्रथम तुला सूट होईल, अशा ड्रेसिंग स्टाइलबद्दल बोलूया. एकूण वर्णनावरून तू लहानशी, नाजूकशी मुलगी असावीस बहुधा. तेव्हा स्केटर ड्रेस हा ड्रेसचा प्रकार तुला छान शोभून दिसेल (अंगासरशी बसणारा, कमरेला घट्ट आणि खाली घेरदार स्कर्ट किंवा ड्रेस)या ड्रेसवर ‘वेजेस’ योग्य दिसतील. तुझ्या बांध्याला शोभून दिसेल असा आणखी एक प्रकार म्हणजे हायवेस्टेड डेनिम शॉर्ट आणि क्रॉप टॉप. (फक्त छातीपर्यंतच्या उंचीचे लहान टॉप्स.) या प्रकारात ट्रायबल प्रिंट्स (वारली चित्र, महिरपी वगैरे) असलेले किंवा रंगीबेरंगी फुलाफुलांचे टॉप्स आणि गडद किंवा एकाच रंगातील शॉर्टस ही स्टाइल मित्रमैत्रिणींबरोबर एखाद्या म्युझिक किंवा कल्चरल फेस्टला जायला तुझ्यासाठी एकदम बेस्ट.  
अजून एक..  डेनिम मटेरिअल (निळ्या, काळ्या जीन्ससाठी वापरले जाते ते जाड कापड)चे कपडे हे आपल्या स्टाइलला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. कॅज्युअल वेअरसाठी डेनिम बेस्ट चॉइस ठरतो. डेनिमच्या कापडाचा शर्ट आणि डेनिमचीच जीन्स असा ड्रेस फार ग्रेसफुल दिसतो. यावर चामडय़ाचा बेल्ट आणि साधारण त्याच रंगातील वेजेस प्रकारचे शूज किंवा सँडल्स. ही स्टाइल तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये हिट झालीच म्हणून समज. सध्याची इन फॅशन म्हणजे स्पोर्टी वेअर. स्नीकर्स प्रकारचे शूज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या यांचा तुला ‘स्पोर्टी’ दिसण्यासाठी वापर करता येईल. हे झाले फक्त कपडय़ांबद्दल, पण निरनिराळ्या हेअरस्टाइलनेही तुझ्या फॅशनेबल लुकला पूर्णत्व येईल. तू म्हणतेस तुझे केस लांब आणि सिल्की आहेत, हे फारच उत्तम, म्हणजे तुला हेअरस्टायलिंगसाठी खूप ऑप्शन्स आहेत. केसांचा फिशटेल ब्रेड (यात केसांची वेणी घातली जाते जिचा शेवटचा भाग माशाच्या शेपटीसारखा भासतो.) हा प्रकार करता येईल यामुळे तुझा लुक क्लासी आणि क्युट दिसेल आणि तू कंफर्टेबलदेखील असशील. नाहीतर केसांच्या कुरळ्या बटांत लपलेला साइड ब्रेड किंवा पोनी हीसुद्धा ग्रेट हेअरस्टाइल होईल. सर्वात शेवटी अ‍ॅक्सेसरीजना विसरून कसे चालेल? कारण राइट ज्वेलरी फॉर राइट लुक. सध्याचा ट्रेंड आहे लेअर्ड नेकलेसचा.  तसेच मेटल किंवा काच यांच्या चित्रविचित्र आकाराच्या बांगडय़ा, ब्रेसलेट्स, इअरिंग्ज अशा अ‍ॅक्सेसरीजचा ही नक्की विचार कर. साधारणपणे  पांढऱ्या टीशर्टवर हे सर्व फार छान दिसेल. सो शिवानी,  एवढे सगळे फॅशन फंडे फॉलो केलेस की तुझ्या फ्रेंड्सच्या ग्रुपची तू फॅशन आयकॉन होणार हे नक्की.
मलाइका अरोरा खान
 (अनुवाद : गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
www.thelabelcorp.com, www.theclosetlabel.com
आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या ईमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2015 1:09 am

Web Title: fashion tips from malaika arora 8
Next Stories
1 दिल की धडकन
2 इनक्रेडिबल इंडिया
3 चिजी अचिजा!
Just Now!
X