|| तेजश्री गायकवाड

‘सस्टेनेबल फॅशन’ आणि ‘फास्ट फॅशन’ म्हणजे नक्की काय?  ‘सस्टेनेबल विरुद्ध फास्ट’ यांच्यातला नेमका फरक काय? अशा प्रश्नांची उत्तरं मागच्या दोन लेखांतून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. यानंतरचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सस्टेनेबल फॅ शन पुढे न्यायची कशी? फास्ट फॅ शनचे भवितव्य काय?भारतीय फॅ शन इंडस्ट्रीबरोबरच आंतरराष्ट्रीय फॅ शन उद्योगातही आपला दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीयफॅ शनडिझायनर्सचं यावर काय मत आहे? याच सगळ्या गोष्टी आपण आजच्या ‘सस्टेनेबल फॅ शन आणि फास्ट फॅ शन’ या विषयावरील लेखमालिकेतील शेवटच्या लेखात समजून घेणार आहोत.

job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
Pebble company launches worlds slimmest Bluetooth calling smartwatch Royale with sleek and elegant design
‘या’ कंपनीने लाँच केलं सर्वात स्लिम स्मार्टवॉच; कॅलक्युलेटरपासून ते ब्लूटूथ कॉलिंगपर्यंत असणार फीचर्स खास
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
couple romance at noida delhi metro station
VIDEO : मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसले कपल; एकमेकांना किस करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी संतापले

फॅशनइंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या अगदी प्रत्येक घटनेमध्ये ‘सस्टेनेबल’ आणि ‘फास्ट’ हे दोन शब्द आपल्याला आवर्जून आणि सातत्याने ऐकायला मिळत आहेत, परंतु दोन्हींच्या संकल्पना समजून घेतल्यानंतरही ‘फास्ट फॅशन’च्या काळात ‘सस्टेनेबल फॅ शन’टिकूच कशी शकते, असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. एकीकडे ‘फास्ट फॅ शन’च्या नावाखाली रात्री घालायच्या कपडय़ांपासून ते अगदी इव्हिनिंगला बाहेर जाण्यासाठी, सणवारांसाठी, घरी वापरण्यासाठी, ऑफिससाठी आपल्याकडे व्हरायटी कपडे असतात आणि हवेही असतात. मग एवढय़ा प्रकारची व्हरायटी कपडय़ांमध्ये वापरणारे आपण भारतीय ग्राहक सस्टेनेबल फॅशनचा पुरस्कार किंवा दैनंदिन जीवनात त्याचा स्वीकारकसा करू शकतो, हा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा वेळी फॅशन इंडस्ट्रीमध्ये रोजच्या रोज नवे ट्रेण्ड्स आणणाऱ्या, या उद्योगाला सातत्याने आपल्या कलेक्शनमधून पुढे नेणाऱ्या फॅ शन डिझायनर्स, तज्ज्ञांनी यावर काय विचार केला आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा टीम’ने केला.

‘फोस्ट फॅशन’ आणि ‘सस्टेनेबल फॅ शन’ या दोन्ही संकल्पना फॅशन डिझायनर्सकडूनच आलेल्या आहेत. मेन्स वेअरचा मास्टर आणि असंख्य प्रकारच्या प्रिंट्सचा वापर करणारा, ग्राहकाला गारमेंट्सबरोबर संपूर्ण लुक देण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा फॅशनडिझायनर अजय कुमार. अजय कुमार यांच्या मते, आपण भारतीयांनी मुळात ‘सस्टेनेबल फॅ शन’या संकल्पनेचा अर्थच चुकीचा घेतला आहे किंवा तो तसा चुकीच्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांसमोर मांडला गेला आहे. ‘सस्टेनेबल फॅ शन’म्हणजे निव्वळ खादी, हातमाग आणि त्यासाठी काम करणारे कारागीर एवढय़ापुरताच मर्यादित अर्थ आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असतो, पण मुळात तसं नाही. ‘सस्टेनेबल’ म्हणजे दीर्घ काळासाठी टिक णारी गोष्ट असा आहे. त्यामुळे फक्त हातमागावरचे कापड वापरून तयार केलेले कपडे, उरलेल्या कपडय़ांतूनच तयार केले जाणारे कपडे म्हणजे ‘सस्टेनेबल फॅशन’आहे असा सोईस्क र अर्थ काढला जातो. तयार केलेला कपडा दीर्घकाळ टिकून राहणे, तो तयार होताना निसर्गाला त्रास होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेऊन कापडनिर्मिती करणं हे यात जास्त महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं. आपल्याच कलेक्शनचे उदाहरण देत त्यांनी सस्टेनेबल फॅ शनची संकल्पना अधिक स्पष्ट केली. त्यांच्या ब्रॅण्डचा यूएसपी आहे चेक्स आणि स्ट्राइप प्रिंट्स. त्यांना कलेक्शन बनवताना चेक्स आणि स्ट्राइप मॅच होतील हे बघूनच कपडे डिझाइन करावे लागतात. अशा वेळी डिझाइन मॅच करण्यासाठी खूप कपडा वाया जात असेल असंही अनेकांना वाटतं. ‘‘माझ्या कलेक्शनमध्ये तुम्ही ज्या प्रिंट्स बघता त्या करताना पाणी प्रदूषित होऊ न निसर्गाची हानी होऊ शकते; परंतु यातूनही मार्ग काढत आम्ही काही वेगळ्या गोष्टींचा वापर के ला आहे, ज्यामुळे पर्यावरणस्नेही पद्धतीने या प्रिंट्स करता येतात, हे आम्हाला अभ्यासाअंती लक्षात आलं. आम्ही प्रिंट्ससाठी डीस्टल प्रिंट्सचा वापर करतो. जे करताना सगळ्यात कमी पाण्याचा वापर होतो. चेक्स प्रिंट किंवा स्ट्राइप प्रिंट मॅच करून कपडे बनवताना सुरुवातीला आम्ही खूप कापड वाया घालवायचो, पण आपण खूप कचरा तयार करतोय हे आमच्या वेळीच लक्षात आलं. मग आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रॉडक्शन करायला सुरुवात केली,’’ असं ते सांगतात. ‘‘आम्ही योग्य त्या प्रिंट एक्स्पर्टचा वापर करत कापडावर प्रिंट करून घेऊ  लागलो. अगदी यासाठी ब्लॉकप्रिंटसारखा पारंपरिक पद्धतीचाही वापर आम्ही करतो आहोत. अशा पद्धतीने तज्ज्ञांच्या मदतीने कमीत कमी कचरा निर्माण होईल, अशा पद्धतीने प्रॉडक्शन झालं तर साहजिकच सस्टेनेबल फॅ शनला आपला हातभार लागेल,’’ अशी माहितीही त्यांनी दिली. याशिवाय रिसायकल, अपसायकल, रियूज अशा संकल्पनाही सस्टेनेबल फॅ शनचा महत्त्वाचा भाग असून याचा जास्तीत जास्त वापर व्हायला हवाच, असं ते म्हणतात. मात्र प्रदूषण टाळण्यासाठी निव्वळ हातमागावरचे कपडेच वापरणे किंवा तयार करणे म्हणजे ‘सस्टेनेबल फॅ शन’ हा गैरसमज दूर झाला पाहिजे, असं स्पष्ट मत अजय कुमार यांनी व्यक्त केलं. ‘सस्टेनेबल फॅ शन’च्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या कॉटन, खादी, जूटसारख्या कापडांनाही निसर्गात संपूर्णपणे नष्ट होण्यास वेळ लागतोच. त्यामुळे ‘फास्ट फॅ शन’साठी तयार केले जाणारे कपडेही सस्टेनेबल असू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

‘फास्ट फॅ शन’सारखी संकल्पना त्याची वाढती मागणी बघता नष्ट होणारी नाही. त्यामुळे ते कपडे तयार करतानाच त्यात सस्टेनेबिलिटी आली, तर सस्टेनेबल फॅ शनबद्दलचे अनेक प्रश्न नक्की सुटतील. डिझायनरकडून होणाऱ्या प्रॉडक्शनबरोबरच आपल्यासारख्या ग्राहकांनीही ‘सस्टेनेबल फॅ शन’प्रति थोडं जागरूक व्हायला हवं, असं मत फॅ शनडिझायनर उज्ज्वल सामंत यांनी व्यक्त केलं. ‘‘भारतीय आर्थिक गोष्टीमध्ये फॅ शन इंडस्ट्रीचा एक मोठा वाटा आहे. अगदी रोज अनेक जण या इंडस्ट्रीचा भाग बनत आहेत. रोज नवीन फॅ शन येते आहे. अनेकविध पर्याय खुद्द डिझायनर ग्राहकांना देत आहेत. शिवाय, सस्टेनेबल फॅ शनही काळाची गरज बनली आहे हे आपल्याला दिसतं आहे. अशा वेळी एक सुज्ञ ग्राहक म्हणून आपण किती आणि काय घ्यायला हवं हे निश्चित ठरवणं गरजेचं आहे. खिशाला परवडतं आहे आणि मार्केटमध्ये आहे म्हणून जरी आपण त्या गोष्टी घेतल्या तरी त्याचा स्मार्ट वापर आपण नक्कीच करू शकतो. एखादा आऊटफिट वेगवेगळ्या पद्धतीने पेअर करणं, रिसायकल, अपसायकलसारख्या संकल्पना वापरून ड्रेस डिझाइन करणं, आज वापरलेले ड्रेस काही दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा वापरणं, जेणेकरून तुम्हाला काही तरी नवीन घातल्याचा फील येईल, अशा गोष्टींमुळेही नक्कीच सस्टेनेबल फॅ शनटिकून राहण्यास मदत होईल आणि ‘फास्ट फॅ शन’च्या जमान्यात त्याच पद्धतीचे व्हरायटी कपडेही तुम्हाला मिरवता येतील, असं उज्ज्वला यांनी सांगितलं.

एकंदरीतच फॅशन इंडस्ट्रीकडून होणारं रोजचं प्रॉडक्शन थांबवणं शक्य नाही, कारण यावर देशाची आर्थिक उलाढालही अवलंबून असते; परंतु पर्यावरणाचा विचार करता सस्टेनेबल फॅ शनपुढे नेणं ही गरजच आहे. त्यामुळे ते न विसरता, आपापल्या पातळीवर सस्टेनेबल फॅ शन कशी अंगीकारता येईल, याचा आपण विचार करायला हवा. फॅशन डिझायनर्स, ब्रॅण्ड ओनर्स आपापल्या पद्धतीने सस्टेनेबल फॅ शनच्या उत्पादननिर्मितीवर भर देत आहेत. पर्यावरणस्नेही कापड, प्रिंट्स, डाय यांचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर सातत्याने जोर दिला जातो आहे. येत्या काळात त्याचे परिणाम नक्की दिसतील. त्यांना निर्मिती करतानाच आपली उत्पादने सस्टेनेबल असतील यावर भर द्यावा लागणार आहे. मात्र ग्राहक म्हणून आपणही ‘फास्ट फॅ शन’ची हौस भागवताना आपल्या कपडे खरेदीच्या सवयी बदलणं, त्यावर काहीएक नियंत्रण आणणं याचबरोबर ‘जुने ते नवे’ या उक्तीने सातत्याने नव्या-जुन्यांचा अदलाबदल करून वापर करणं, रिसायकलिंग अशा पर्यायांचा विचार केला तर सस्टेनेबल फॅ शन अधिक ‘फास्ट’ दृढ होईल..!