News Flash

पहिलं प्रेम, पहिली कविता

आयुष्यात पहिल्या गोष्टी खूप स्पेशल असतात. पहिलं प्रेम, पहिला पगार, पहिला मोबाइल वगरे वगरे सगळीच पहिलाई!! हे असं वाचून ‘टीपी’ सिनेमाचे डायलॉग वगरे आठवायला लागले

| February 14, 2014 01:09 am

आयुष्यात पहिल्या गोष्टी खूप स्पेशल असतात. पहिलं प्रेम, पहिला पगार, पहिला मोबाइल वगरे वगरे सगळीच पहिलाई!! हे असं वाचून ‘टीपी’ सिनेमाचे डायलॉग वगरे आठवायला लागले असतील. पण, खरंच पहिलं प्रेम मग ते खरं असो किंवा टाइमपास.. त्याचं महत्त्व काही औरच. भले ते यशस्वी होवो अगर नाही त्याला आयुष्यभर सोबत घेऊनच जगावं लागतं आणि त्यातच तर खरी मजा आहे. प्रेम या विषयाने पुस्तकांपासून ते चित्रपटविश्व व्यापून टाकलंय. हल्ली तर फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवरही प्रेम होऊ शकतं रादर होतंच.. आणि मग ओघाने येते ती प्रेमकविता. तुम्हाला पटणार नाही परंतु ही स्माइलीज आणि इमोटीकॉन्स जेव्हा अपुरे पडू लागतात तेव्हा शब्दच आधार देतात आणि अजूनही फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात लोक प्रेमात पडल्यावर कविता करतात.
प्रेमकविता करणारे अनेक प्रेमवीर-वीरांगणा आजही आहेतच की.
आज आपल्याकडे आहेत बेधडक प्रेम करणारा ‘तो’ आणि त्याच्या प्रेमाचं उधाण झेलणारी ‘ती’. अशाच काही ‘तिच्या’ आणि ‘त्याच्या’ पहिल्यावहिल्या प्रेमाच्या आणि प्रेमकवितेच्या गोष्टी..

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यातही प्रेमात पडताना कविता करणारे असतील का? याचं उत्तर ‘आहेत’ असं आलं. स्माइलीज आणि इमोटीकॉन्स जेव्हा अपुरे पडू लागतात तेव्हा शब्दच आधार देतात. पहिल्या प्रेमाच्या आणि प्रेमकवितेच्या या तीन काव्यमय गोष्टी दाखल्यासाठी.

गोष्ट १
एका कॉलेजात असूनही एकमेकांना अनोळखी असणारे प्रिया आणि राजन. दूर गेल्यावरच खऱ्या अर्थाने एकमेकांच्या जवळ आले व मुंबई-पुणे-मुंबई प्रवासानेच आणलं ह्य़ांच्या प्रेमकथेला वेगळ्याच वळणावर. भौगोलिक अंतरंही त्यांच्या ओढीला मिटवू शकली नाहीत. त्याच्यासोबतची ‘मी’ वेगळीच असते आणि तिच्यासोबतचा ‘मी’ असतो वेगळा.. हे हळूहळू प्रकर्षांने जाणवू लागलं होतं. स्पेशल-स्पेशल होत चाललेल्या तिच्यासाठी काहीतरी लिहायचं म्हणून मग त्याने कागदावर पेन टेकवलं आणि,
‘‘पूर्णविराम शेवटचा देऊनी मी प्रेमकवितेकडे पाहिले
बहुधा तिथे लाजणारा तो चेहरा तुझाच होता..’’
खरं तर हा त्याच्या कवितेचा शेवट पण त्यांच्या नात्याची गोड सुरुवात.!!!

गोष्ट २
मीनल आणि मोहित- दोन ध्रुवांची टोकं वाटावीत इतके वेगळे. पण कवितेच्या समान धाग्याने बांधले गेलेले. कवितांची देवाणघेवाण करतानाच तिच्यासाठी आपण कोणीतरी वेगळेच होत चाललोय ह्य़ाची जाणीव त्याला होत होती.
मात्र स्वीकारायला जड जात होतं. त्याची ही घालमेल त्याच्याच शब्दात.
‘‘हृदयाने केला निर्धार, जायचं आता चोरीला
मी होतो आलबेल, म्हटलं चोरायला वेड लागलंय का पोरीला..??’’
कवितेतून त्याने मांडलेली गोष्ट चाणाक्ष तिने हळूच ओळखली आणि त्याने कविता वाचून दाखवताच ती चटकन हो म्हणाली.

गोष्ट ३
मित्रमत्रिणींच्या घोळक्यात, इंजिनीअरिंगची बोअर जर्नल्स इंटरेिस्टग बनवतानाच समीर आणि सान्वी मात्र एन्जॉय करायचे एकमेक२ांचं तिथे असणं. परीक्षेआधी ‘केलायेस गं तू अभ्यास, टेन्शन घेऊ नकोस’ असं म्हणत तिच्या पाठीवर विश्वासाची थाप देणारा समीर आणि ‘ए प्लीज सीरियसली अभ्यास कर ना रे’ असं म्हणणारी सान्वी.. ह्य़ांच्यात एक वेगळंच टय़ुिनग जमू लागल होतं. खरं तर दोघंही बदलत होती एकमेकांसाठी. पण त्याने प्रपोज केल्यावर मात्र ती झटक्यात नाही म्हणाली.
‘‘मी हरवण्याचा रस्ता तुझ्यापर्यंत पोहोचत नाही
पण मग तुला बघून माझा रस्ता का हरवावा’’
असं म्हणत स्वत:च्याच वागण्याचा अर्थ शोधत राहिली सान्वी आणि जेव्हा साऱ्याचाच अर्थ उमगला तेव्हा वरच्या ओळी अशा बदलल्या..
‘‘मी हरखून तुझ्यात कधीतरी हरवते ही
पण मग तुलाच पाहून मला माझा रस्ता गवसतोही’’
समाजाची सर्व बंधनं झुगारून त्यांना आयुष्यभर एकत्र राहायचं होतं.
‘‘माझ्या वैभवाचा प्रश्न जेव्हा उद्भवेल
तेव्हा माझी मिळकत बनून माझी म्हणवून घेशील ना रे
आयुष्याच्या तराजूत मग सुख मलाही तोलता येईल..!!’’
असं म्हणत ती आज त्याच्या आयुष्याचा भाग बनलीये आणि लग्नबंधनात अडकून जन्मजन्मांतरी एकत्र राहायची शपथ ही घेतलीये.
फार गुडी-गुडी वाटतंय ना हे सगळं? पण आहेच.. कारण वेडय़ागत प्रेम करण्यात कसला आलाय वेडेपणा, मोजून मापून प्रेम करण्यालाच काय म्हणतात शहाणपणा??

(गोष्टींतली पात्रं खरी आहेत आणि त्यांच्या कविताही. पण त्यांच्याच आग्रहामुळे नावं बदलली आहेत.)
चित्र : अनुप्रिया अंधोरीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:09 am

Web Title: first love first poem
Next Stories
1 व्हिवा वॉल : व्हॅलेंटाइन्स डे
2 अप टू डेट : फॅशनला परिपूर्ण करणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज
3 ‘व्ही’ डे सेलिब्रेशन गाइड
Just Now!
X