05 August 2020

News Flash

फिट-नट : अंकित मोहन

फिट राहण्यासाठी जे वाटेल ते करण्याची जिद्द उरी बाळगल्याचे तो सांगतो.

अंकित मोहन

प्रियांका वाघुले

काही कलाकार आणि त्यांचा फिटनेस हा कायम चर्चेचा विषय असतो. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर याच्याकडून फिटनेसचे फंडे जाणून घेतलेच पाहिजेत, हा विचार पहिल्यांदा मनात उमटतो. मराठीत असे कलाकार तुलनेने कमी असले तरी सध्या हिंदी आणि मराठी दोन्हीकडे झळकणारे असे काही कलाकार आहेत, जे फिटनेसच्या बाबतीत सरस आहेत. हिंदी मालिकांमधून काम करणारा आणि ‘फर्झद’सारख्या मराठी सिनेमातून मराठीमध्ये उत्तमरीत्या पुढे आलेला अभिनेता अंकित मोहन याच फिट कलाकारांपैकी एक आहे. फिट राहण्यासाठी जे वाटेल ते करण्याची जिद्द उरी बाळगल्याचे तो सांगतो.

नियमित व्यायाम करणे ही शरीराची गरज असते. त्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते, असे तो म्हणतो. जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तसा तो वेळ व्यायामासाठी देत असल्याचे अंकित आग्रहाने सांगतो. आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा वेळ आपल्या स्वत:साठी देणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा विचार तो करतो. त्यामुळे यात व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र व्यायामासाठी कधी तरी वेळ काढून उपयोग नाही, तर कोणत्याही गोष्टीसाठी सातत्य महत्त्वाचे असते. त्यामुळे तसे सातत्य आपल्या व्यायामातही असले पाहिजे हे सांगताना तोही सेटवर असो वा बाहेर व्यायामातील सातत्य चुकवत नाही, असे आवर्जून सांगतो.

फिटनेससाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगवर तो भर देतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये स्कॉट्स आणि डेडलिफ्ट हे शरीरातील मोठय़ा भागांवर काम करणारे ठरतात. शरीरातील महत्त्वाच्या मोठय़ा भागांना जसे की पाय, पाठ या व्यायाम प्रकारात सामावून घेतले जाते. ज्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव कार्यरत होतात आणि शारीरिक क्षमता वाढली जाते. त्यामुळे जिममध्ये स्कॉट्स आणि डेडलिफ्ट हे आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये असल्याचे अंकित सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 4:35 am

Web Title: fit artist ankit mohan abn 97
Next Stories
1 जगाच्या पाटीवर : औषधमात्रे तन प्रतिकारशक्ती
2 अराऊंड द फॅशन : ‘फॅशन’ अ‍ॅवॉर्ड गोज टू ..
3 शेफखाना : यूटय़ूबची फुडी दुनिया
Just Now!
X