24 September 2020

News Flash

चॅनेल Y: ‘यू’वर फिटनेस

‘यूटय़ूब’वरची फिटनेस चॅनल्स बरीच लोकप्रिय आहेत.

‘यूटय़ूब’वरची फिटनेस चॅनल्स बरीच लोकप्रिय आहेत. त्यातली फिटनेस टय़ुटोरिअल्स अनेक जण बघतात. यामध्ये अनेक व्यायामप्रकार शिकवले जातात. त्यातही योगाची प्रात्यक्षिकं भारतात आणि भारताबाहेरही लोकप्रिय आहेत.

फिटनेसबाबतची जागरूकता वाढतेय तशी फाइव्ह, सिक्स, सेव्हन, एट.. असं काऊंटिंग करत गाण्यांवर ताल धरत घाम गाळण्यासाठी सगळ्यांची धडपड चाललेली दिसतेय. बिझी शेडय़ूलमधून कसाबसा वेळ काढून अनेक पावलं व्यायामशाळेकडे वळत आहेत. पण ऑफिस, घर, नातीगोती, प्रेझेंटेशन्स, डेडलाइन्स या रगाडय़ात काही जणांना जिमसाठी वेळ काढणं अवघड जातं. घरच्या घरी व्यायाम करावा वाटतं. अशा फिटनेस फ्रीक तरुणाईच्या मदतीसाठी अनेक यूटय़ूब चॅनल्स उपलब्ध आहेत.
घरच्या घरी करायचे व्यायाम आणि डाएटबाबतचा सल्लाही देणारे व्हिडीओज हिट आहेत. डाएट प्लॅन कसा असावा, शाकाहारी-मांसाहारी डाएट इथपासून नव्या कोऱ्या कॉलिफ्लॉवर डाएटपर्यंतची तंतोतंत माहिती, डाएटच्या पदार्थाच्या रेसिपीजसुद्धा यूटय़ूबच्या या मेन्यूकार्डमध्ये आहेत. मुलांसोबतच मुलींमध्येही आता नुसतं फिटनेसच नव्हे, तर बायसेप्स, ट्रायसेप्सचे सुसाट वारे वाहत आहेत. याला क्रेझ, आवड किंवा मग तोडीस तोड देण्याची वृत्ती म्हणा किंवा फिटनेस अ‍ॅडिक्शन. व्हिडीओ बघून व्यायाम करणाऱ्या तरुणाईची संख्याही वाढत आहे. यूटय़ूबवर योगा, बूट कॅम्पिंग, वेट ट्रेनिंग अशा व्हिडीओजची स्ट्रिमिंग जोरावर आहेत. शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू यांसारख्या फिटनेस दिवासुद्धा यूटय़ूबच्या माध्यमातून अनेकांसोबत संवाद साधताना दिसतात. फिटनेस एक्सपर्ट, न्यूट्रिशनिस्टदेखील यूटय़ूब चॅनल्सवर आहेत. त्यात यूटय़ूबचा आणखी एक फायदा म्हणजे ऑफलाइन फीचरचा. सूर्यनमस्काराच्या प्रत्येक पायरीपासून प्राणायाम, विविध आसनांचा रीतसर व्यायाम करण्याची शिकवणी यूटय़ूबवरून अगदी मोफत घेता येते.
फिटनेस रॉकर्स इंडिया, शिल्पाज योगा, युवर टाइम वर्कआऊट, एक्सएचआयटी डेली यांसारखे देशी-विदेशी चॅनल्स तुमचे अ‍ॅब्ज आणि शरीर पीळदार करण्यासाठी नानाविध एक्स्पर्ट ट्रिक्स देत आहेत. तर मराठमोळ्या संग्राम चौगुलेचीही यूटय़ूबवर चांगलीच हवा आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी, सोप्या मार्गाने वजन कमी करण्यासाठीच्या ट्रिक्स शिकण्यासाठी सर्वाधिक सर्च यूटय़ूबवर केला जातो.
यूटय़ूबवर फक्त योगासनं, व्यायाम एवढय़ापुरताच हा फिटनेस मर्यादित नसून डिजिटल वेअरेबल्सच्या शाब्दिक उच्चारापासून तो वापरण्यापर्यंत सारं काही स्पष्ट भाषेत समजावलं जातंय. म्हणूनच कारण काही असो, सेलेब्रिटींचं प्रोत्साहन किंवा मग ‘स्टे फिट’चा मनावर भिनलेला कानमंत्र, ‘यू’वर फिटनेस इज ऑलवेज इम्पर्ॉटट!
यूटय़ूब चॅनल्सवरून फिटनेसबाबत माहितीचा महापूर वाहतो आहे. अनेक विचारांचे, विषयांचे तज्ज्ञ तिथे सल्ले देताना दिसतात. पण त्यातले अनेक सल्ले शास्त्रीय आधाराशिवाय दिलेले असतात. त्याच्या सत्यासत्यतेची पडताळणी केलेली नसते. आपल्या प्रकृतीला काय झेपेल असा पर्याय निवडणे अवघड असते. म्हणूनच यूटय़ूबवरच्या फिटनेस चॅनल्सचा एक प्रेरणा, मोटिव्हेशन म्हणूनच वापर करावा. पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक असा व्यायाम असूच शकत नाही. त्यासाठी सुयोग्य आहार आणि जोडीला व्यायामाचं सातत्य आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:16 am

Web Title: fitness tutorials on youtube
Next Stories
1 डाएटचं फॅड
2 ‘योगायोगा’ची गोष्ट
3 कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा
Just Now!
X