News Flash

फिट-नट : प्रतीक देशमुख

प्रतीकला फुटबॉल खेळाची विशेष आवड आहे. फुटबॉल खेळत असताना प्रतीकच्या पायाला इजा झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

प्रियांका वाघुले

‘शुभ लग्न सावधान’साठी विशेषत: आपल्या वजनात बदल करून घेणारा अभिनेता प्रतीक देशमुख फिट राहणे ही आपली पसंती असल्याचे सांगतो. प्रतीकला फुटबॉल खेळाची विशेष आवड आहे. फुटबॉल खेळत असताना प्रतीकच्या पायाला इजा झाली होती. त्या वेळी खरं म्हणजे पायाला इजा झाल्यामुळे फिटनेसमध्ये अडथळा येण्याचे हे मोठे कारण ठरू शकले असते. मात्र त्याऐवजी पायाचे दुखणे हेच फिटनेस वाढवण्यासाठीचे कारण ठरल्याचे तो म्हणतो.

हा अपघात आणि फिटनेसचे समीकरण आयुष्यात नवेच काही शिकवून गेले, असे तो सांगतो. एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यात त्रासदायक ठरू शकते, असे वाटते. तेव्हा त्यापासून तोंड फिरवण्यापेक्षा, तिथेच थांबण्यापेक्षा त्यावर मात करणे गरजेचे असते. एखाद्या गोष्टीवर मात करणे सोपे नाही, पण मनात जिद्द असेल तर अशक्य ते शक्य होते, या भूमिकेतूनच आपणही त्याच जिद्दीने प्रयत्नपूर्वक आपला फिटनेस वाढवल्याचे प्रतीक सांगतो. कलाकार म्हणून फिटनेस महत्त्वाचा आहेच, मात्र आपल्याला हवं तसं वागण्याची मोकळीकही आहे. त्यामुळे फिटनेसकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी पायाला झालेली इजा आठवत त्यासाठी तरी फिटनेस करायलाच हवा, हे सांगत तो सगळ्या प्रकारचे व्यायाम करत असल्याचे स्पष्ट करतो.

आठवडय़ातून कमीत कमी चार वेळा व्यायाम करायचाच हे त्याने पक्कं ठरवलं आहे. त्यामुळे व्यायामाच्या या वेळेत जिममध्ये मेहनतीने शरीर कमावणे आणि शरीर-मनाला आवश्यक असलेली ऊर्जा व्यायामातून मिळवणे हेच उद्दिष्ट त्याने समोर ठेवलं आहे. व्यायामामुळे दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते, असं प्रतीक सांगतो. त्याचबरोबर एकाच जीवनपद्धतीची सवय शरीराला लागू नये म्हणून त्यातही काही काळाने फेरबदल करत असल्याचं तो सांगतो. व्यायामाबरोबर आपल्या आहारावर आपला ताबा असणे त्याला जास्त महत्त्वाचे वाटते. समतोल, चौरस आहार घेण्यावर लक्ष केंद्रित करणे जमायलाच हवे, असे तो म्हणतो. शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचा पुरवठा करणारे आणि आपल्याला तरतरीत ठेवणारे अन्नपदार्थ आहारात असावेत, असे प्रतीक सांगतो. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि सातत्याने करण्याची जिद्द या तीन गोष्टी त्याच्या फिटनेससाठी महत्त्वाच्या असल्याचे त्याने सांगितले.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:32 am

Web Title: fitt celebrity pratik deshmukh abn 97
Next Stories
1 जगाच्या पाटीवर : शाश्वत विकासाच्या शोधात
2 आला पावसाळा प्रकृती सांभाळा..
3 शेफखाना : किनोआची कमाल!
Just Now!
X