News Flash

ताजा, हिरवा नारळ : पाण्याखेरीजही बरंच काही

ताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता? वर्षांनुर्वष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या

| April 12, 2013 07:17 am

ताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता? वर्षांनुर्वष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं केवळ पाणीच नाही तर इतरही गोष्टी लाभदायक असतात. ताज्या, हिरव्या नारळाचे हे गुणधर्म पाहू. ताज्या, हिरव्या नारळाची मलईसुद्धा कशी गुणसंपन्न असते, ते पाहू.
कोवळ्या अवस्थेत असताना नारळ ताजा आणि हिरवा असतो. सामान्यत: या फळामध्ये ९० टक्के पाणीच असतं. ताज्या, हिरव्या नारळाचं पाणी पोषक असतंच, पण त्याहीपेक्षा पोषक असते ती मलईच! नारळाची मलईही परिपक्व होत जाते. पण पूर्णावस्थेला पोहोचलेल्या नारळातल्या मलईपेक्षा ताज्या, हिरव्या नारळातल्या मलईत जास्त गुणधर्म असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत भरपूर खनिजं असतात, पण फॅटस्, शर्करा आणि कोलेस्टेरॉल अत्यंत कमी असतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या ११ औन्स मलईत केवळ ६५ कॅलरीज असतात. पण त्याहीपेक्षा त्यात पोषक घटकच अधिक असतात.
एका ताज्या, हिरव्या नारळाची मलई खाल्ल्यास दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारं मँगेनीज मिळतं. हे खनिज रक्त साकळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं, जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत आणखी एक महत्त्वाचं खनिज असतं, ते म्हणजे मॅग्नेशिअम. हे खनिज ऊर्जानिर्मितीसाठी तसेच मूत्रिपडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं.
नारळाच्या घट्ट खोबऱ्यापेक्षा मऊ असणारी मलई खायला अत्यंत सोपी असते. त्यामुळे ती पोषणाचा उत्तम स्रोत ठरते. रोगप्रतिकार यंत्रणा तसेच प्रदाहक घटकांना अवरोध करणाऱ्या घटकांना अधिक सक्षम बनवण्यात ही मलई कामी येते. मलईतून निघणाऱ्या तेलामध्येही भरपूर पोषक घटक असतात, जे केसांच्या पोषणासाठी उपयुक्त असतात. ताज्या, हिरव्या नारळाल्या मलईचे गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्याच्याही पलीकडे जाणारे आहेत. हे तेल अत्यंत शुद्ध आणि हलकं असतं. त्यामुळे या तेलातून आजच्या जगतातल्या केसांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादनं बनवता येतात.
केसांच्या देखभालीसाठीची उत्पादनं विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य तेलांपासून बनवली जातात. त्यांच्यातल्या फॅटी अ‍ॅसिड घटकांमुळे ती एकमेकांपेक्षा वेगळी असतात. काही तेलं सॅच्युरेटड फॅटी अ‍ॅसिड्सनी समृद्ध असतात, पण त्यांच्या अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडस् कमी असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या तेलामध्ये अत्यंत अभिनव आणि संतुलित ट्रायग्लिसराइड रचना असते, जी केसांना पूर्ण पोषण पुरवते.
हे तेल हलकं असल्याने ते सहजपणे पसरतं आणि केसांमध्ये लवकर शोषलं जातं. त्यामुळे केसांना आवश्यक ते पोषण मिळतं. त्याचा सौम्य आणि ताजा सुगंध तेल लावण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवतो. एकंदरीतच, ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईचं तेल असं एक आधुनिक तेल आहे जे निसर्गत:च हलकं आहे आणि पोषकही आहे. मग आता हे रहस्य सर्वासमोर आलंच आहे तर ताज्या, हिरव्या नारळाच्या या गुणधर्माचा उपयोग करून घेऊ आणि त्याच्यामार्फत आरोग्य आणि सौंदर्याचे फायदे मिळवून घेऊ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 7:17 am

Web Title: fresh green coconut much more than water
टॅग : Viva
Next Stories
1 मिकीज् फिटनेस फंडा : मुलांमधली स्थूलता टाळण्यासाठी सुपर फूड्स
2 क्लिक
3 रेडी टू फेस समर
Just Now!
X